नवं पाखरू

स्क्रीनवरच्या नजरा आधी गर्रकन फिरतात...
टवकारले जातात कान... आणि भलेभलेही हरतात...

इश्यूत घुसलेल्या विश्वामित्रांचीही तपश्चर्या होते भंग...
पांढर्‍या केसांवर चढतो गुपचुप गोदरेज हेअर डायचा काळा रंग..

विवाहित टीम लीडलाही हलकेच स्वतःच्या बायकोचा पडतो विसर..
छप्पर उडालेल्या मॅनेजर्सवरही तिच्याच यौवनाचा असर..

टीममधल्या सगळ्यांशीच मग हळूहळू तिची ओळख होते..
"च्यायला कसली भारीय" म्हणत चर्चा भलतंच वळण घेते..

एके दिवशी इनबॉक्समध्ये फाटकन् मेल येऊन पडतो..
लग्नपत्रिका पाहून तिची ओठांपाशीच घास अडतो..

प्रोजेक्टमधलं नवं पाखरू भर्रकन कधीच उडून जातं..
छप्पर उडालेलं बावळट ध्यान मग गुपचुप घरचा डबा खातं..

द्रांक्षांना मग आंबट म्हणत शोधली जाते नवी शिकार..
नवं पाखरू यायचा अवकाश.. प्रोजेक्टमध्ये पारधी आहेत चिक्कार..


कवी - संदेश कुडतरकर
रामभाऊ मेडिकलच्या दुकानात जातो.
रामभाऊ (दुकानदाराला) : एक विषाची बाटली द्या...
दुकानदार - प्रिस्क्रिप्शनशिवाय विष देता येत नाही.
रामभाऊ :( दुकानदाराला लग्नाची पत्रिका दाखवत) हे घ्या.
दुकानदार : बास कर मित्रा.....रडवशील का!
 
बाटली मोठी देऊ का छोटी???
"हा शर्ट किमती दिसतोय?"
"तो माझा नाही !"

"पॅन्ट पण छान आहे ..!"
"तीही माझी नाही ..!!"

"मग तुझे काय आहे..?"



.
.
.
.
.
.
.
.
.
"लौन्ड्री ...!!!"

इम्पोटेड अतिरेकी

गंपू ला त्याची आई एकदा खूप मारते, खूप म्हणजे खूप...
.
नंतर गंपू बाबांकडे जातो आणि विचारतो...
.
गंपू : बाबा, तुम्ही पाकिस्तानात गेला आहात का कधी ?
.
बाबा : नाही, रे.... पण का काय झाल????
.
.
गंपू : मग तुम्ही हा अतिरेकी कसा आणला...

देवाचा मोबाईल

किती करू मी तुझा धावा
तुझा मोबाईल नंबर दे रे देवा
नाही माणस कलीयुगी खरी
येता जाता चालती कुरबुरी
मुखी राम बगल मे छुरी
नाही कळत त्यांचा कावा||१||

अवतरलास तू द्वापारी
खूण होती तुझी बासरी
पण जमाना आला नवा
आता नाही चालणार तुझा पावा
तुझा मोबाईल नंबर दे रे देवा||२||

चारी युगात तुझा बोलबाला
फार नाही मागायचं मला
घाई गर्दीत शोधू कुठे तुला
आहे एकच उपाय ठावा
तुझा मोबाईल नंबर दे रे देवा|||३||


कवियत्री - प्रभा मुळे

वीज येते आणिक जाते


वीज येते आणिक जाते ..!!
येताना सर्व वास्तू उजळिते,
आणि जाताना मिट्ट काळोख करते !
गावागावांना ती अशी छळते,
आणि काही शहरांच्या कुशीत शिरते !

कोणाच्या राजकारणाने ती झळाळते?
येणे जाणे कधी न सरणे,
विद्यार्थ्यांच्या ऐन परीक्षेत गुल होणे,
पिकाला पाणी देताना ती नसणे,
कारखाने व गिरण्यांची गोची करणे,

रात्री रस्त्यावरून चालताना तिचे जाणे,
तरुणांचे उगीचच तरुणींपाशी अडखळणे !
येताना ती कसली रीत,
गुणगुणते ती जाण्याचे गीत !
जाते कधीमधी आणि फिरून ये,

येण्यासाठीच दुरु नये !
तिच्या असण्याने तिची उधपट्टी करणे,
ती नसल्याने डोळ्यात असावे येणे !
प्रेमात येते तर कधी निघून जाते,
आणि जाण्याने तिच्या सबुरी संपवीते !
विज येते आणिक जाते......!!!


कवी - जगदीश पटवर्धन

ती येते आणिक जाते

ती येते आणिक जाते
येताना कधि कळ्या आणिते
अन्‌ जाताना फुले मागते
येणे-जाणे, देणे-घेणे
असते गाणे जे न कधी ती म्हणते

येताना कधि अशी लाजते
तर जाताना ती लाजविते:
कळते काही उगीच तेही
नकळत पाही काहीबाही,
अर्थावाचुन असते ’नाही’, ’हो’, ही म्हणते

येतानाची कसली रीत:
गुणगुणते ती संध्यागीत,
जाताना कधि फिरून येत,
जाण्यासाठिच दुरुन येत,
विचित्र येते, विरून जाते जी सलते

कळ्याफुलांच्या मागे येते
कोमट सायंचेहरा घेते
उदी उदासी पानी भरते
"मी येऊ रे ?" ऐकू येते
मध्यरात्रभर तेच तेच प्रतिध्वनि ते


कवी /गीतकार : आरती प्रभू
गायक : महेंद्र कपूर
संगीत : हृदयनाथ मंगेशकर