अपमृत्यू

होते चढते जीवन : झाली पण माती
आता ममतेच्या तुटल्या कोमल ताती
आता मरणाचा पडला निर्दय फासा
अतृप्तच गेली नवसंसारपिपासा

डोळे मिटलेले, पडली मान पहा ही
आहे उघडे तोंड, तरी बोलत नाही
छाती फुगलेली दिसते उंच जराशी
निर्जीव तरी हे धरले हात उराशी

अद्याप गताशाच जणू झाकत आहे
अद्याप उसासाच जणू टाकत आहे


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

कर्तबगारी

शत्रुंची दाणादाण उडवल्यावर मेजर बहद्दूरसिंगांनी संताला विचारले, "या लढाईत तू काय कर्तबगारी दाखवलीस?"

"सर", संता म्हणाला, "मी शत्रूच्या एका सैनिकाचा पायच कापला."

"पायाऎवजी तू त्याच मुंडकच उडवायला पाहिजे होतस." मेजर साहेब म्हणाले.

संता म्हणाला, "सर मुंडक आधिच कुणीतरी उडवल होतं...."

रानराणी

तू पूस डोळ्यातले पूरपाणी
रानराणी !

निमिषभर रहा तू
त्वरित परत जा तू
राहील चित्तातल्या गूढ पानी
ही कहाणी

करुण हृदयगाने
भर नंतर राने
दुरात येतील ते सूर कानी
दीनवाणी


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

सुंदरता

सुंदरतेचे मोहक दारुण
घडले दर्शन ओझरतेही
तर मग पुढते हे जग बुडते
एकच उरते ओढ अशी ही

क्षण बघतो जो कुणी बिचारा
चिन्मय तारा त्या गगनाची
तो वा-यागत जातो वाहत
छेडत छेडत तार मनाची

नभमुकुरांवर दुरांत दिसते
बिंबच नुसते हिचे जुगारी
उठतातच तर मग सिंधूवर
व्यथित अनावर लहरी लहरी

तिमिरामध्ये नीलारुण घन
मुकेच नर्तन ही करताना
मलय निरंतर करतो हुरहुर
सोडत वरवर श्वास पहा ना!

हे श्रावणघन-गर्जित सारे
वादळवारे, विद्युतरेषा -
ती मिळण्याची विश्वमनाची
कैक दिनांची व्यथित दुराशा


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

अकलेच्या गोळ्या

एक दारुडा बारमध्ये आपल्या हातातल्या करड्या रंगाच्या तिन गोळ्यांडे एकटक पाहत बसला होता. तेवढ्यात तिथे संतासिंग आला. संताने त्या दारुड्याला विचारले, '' या कशाच्या गोळ्या आहेत?''

दारुड्याने उत्तर दिले, '' अकलेच्या गोळ्या ... या गोळ्या खाल्याने माणसाची अक्कल वाढते''

'' असं आहे का? ... मग मला एक दे की'' संताने त्याच्या हातातली एक गोळी घेवून खाल्ली आणि वरुन पटकन पाणी पीले.

थोड्या वेळाने संता म्हणाला, '' मी एक गोळी खाल्ली आहे खरी .. पण मला तर काही फरक वाटत नाही आहे''

'' तुला कदाचित अजुन गोळ्या घ्याव्या लागतील... तेव्हा कुठे फरक पडेल'' दारुडा म्हणाला.

म्हणून संताने अजून एक गोळी घेवून वरुन पाणी पिवून गिळली.

थोड्या वेळाने संताने त्या दारुड्याच्या हातातली तिसरी गोळी घेतली आणि तो त्या गोळीकडे निरखून पाहू लागला. त्याने त्या गोळीचा बारीक तूकडा तोडून तो हळू हळू चघळून त्याची चव बघू लागला.

अचानक त्या गोळीचा तूकडा तोंडातून थूकून टाकत संता म्हणाला, '' काबे... याची चव तर म्हशीच्या शेणासारखी लागत आहे''

तो दारुडा म्हणाला, '' बघ... आता कशी तूझी अक्कल वाढत आहे''

मनोगत

चंद्र बुडत असताना ये तू
वर असताना मोहक तारे
जग निजले असताना ये तू
दाट धुके पडल्यावर सारे

नाजुक वाहत, ही तरुराजी
विचलित करतो कोमल वारा
स्पर्शित कर हनु तशीच माझी
पुलकित कर हा देहच सारा

मग लगबग हे उघडत लोचन
थरकत थोडी स्पर्शसुखाने
मी पाहिनच नीट तुला पण
किंचित लाजत चकित मुखाने

शांत निरामय जग असताना
तरुपर्णांची कुजबुज ऐकत
त्याहूनहि पण हळूच, साजणा,
सांग तुझे तू मधुर मनोगत!

चंद्र बुडत असताना ये तू
वर असताना मोहक तारे
जग निजले असताना ये तू
दाट धुके पडल्यावर सारे


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

यौवनयात्रा

अशी हटाची अशी तटाची
उजाड भाषा हवी कशाला?
स्वप्नांचे नव गेंद गुलाबी
अजून फुलती तुझ्या उशाला

अशीच असते यौवनयात्रा
शूल व्यथांचे उरी वहावे
जळत्या जखमांवरी स्मितांचे
गुलाबपाणी शिंपित जावे

जखमा द्याव्या जखमा घ्याव्या
पण रामायण कशास त्याचे?
अटळ मुलाखत जर अग्नीशी
कशास कीर्तन रोज धुराचे?

उदयाद्रीवर लक्ष उद्याची
पहाट मंथर तेवत आहे
तुझ्याचसाठी लाख रवींचे
गर्भ सुखाने साहत आहे!


कवी - कुसुमाग्रज