येशील का रे?

एकदा पाहिले लागली माया
माझी रे कोवळी वाळली काया !
नवीन लोचन आले
आणखी अधीर झाले
वाटते तुला रे, पडली भूल
प्रीतीचे पहिले नाजूक फूल !

एकली बागेत हिंडत होते
हासत हासत आलास तेथे
पाहिले–पाहिले तूही
गेले मी लाजून बाई !
प्रीतीच्या नाजूक लागल्या झळा
जाळीत मैनेचा चढला गळा

नदीच्या किनारे होते रे, उभी !
हळूच चांदण्या हसल्या नभी
आले हे भारुन ऊर
हिंडले हिंडले दूर
वेगळ्या आपल्या मिळाल्या वाटा
नदीच्या पाण्यात नाचल्या लाटा

थांबला जरासा गेलास दूर
आतूर आशेचा सुकला नूर
सुकले चांदणे जळी
सुकली चाफ्याची कळी
अवती भवती नव्हते दुवे
वाळून चुंबिले पाऊल तुझे

तुझाच सांगते लागला ध्यास
तुझ्याच नावाचे चालले श्वास
डोळ्यांत कोंडले आसू
नको रे जीवन नासू
एकदा पाहिले लागली माया
माझी रे, कोवळी वाळली काया


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

इशारा

संध्येचे, सखये, तरंग पिवळे चुंबीत होते नभा
होती मंगल सांजवात सदनी लावीत तू बैसली
दाराशीच तुझ्याकडे बघत मी होतो मजेने उभा
काळी चंद्रकळा, शशांकवदने होतीस तू नेसली !

तेव्हा जे वठले हळुहळु तुझ्या संगीत ओठांवर
गाणे ते पहिले अजून घुमते चित्तात माझ्या, सखे !
होती ती घटिका निरामय, तुझा होता गळा सुंदर
ते सारे श्रुतिसंहिताच मजला, झाले तुला पारखे

नाचवी लहरी जलावर तशी प्रीती तुझी पावन –
पाण्याच्या लहरीपरीच ठरली आता अशी नाचरी
माझा नाश करावयास असला झालीस तू कारण
मी माझा नुरलो, उदास फिरतो ओसाड माळावरी

जीवाचे जळ घालूनी फुलविले — तू जाळिले नंदना
आता हास पुढे निरंतर तुला जाळील ही वंचना !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

शिवाजीचा पाळणा

तुज जोजविते माय जिजाई बाळा । नीज रे नीज लडिवाळा ।

मध्यरात्रीचा प्रहर लाडक्या आला । झोप का येईना तुजला ॥

झोके देते गीत गात अंगाई । तरी डोळा लागत नाही ।

बाळा असला थांबिव चाळा आता । थकले मी झोके देता ॥

तू महाराष्ट्राचा त्राता । मनी धरली कसली चिंता ।

पाठिशी भवानी माता । माउलिया जीवीचा जिव्हाळा ।

नीज रे नीज लडिवाळा ॥१॥

चल ठेव दुरी हातामधली ढाल । निद्रा करी बाळा खुशाल ।

झोपली कशी बारा मावळी थेट । शिवनेर जुन्नर पेठ ॥

नि:शब्द कशी पसरली रे शांती । या मराठी भूमीवरती ॥

बागूलबुवा आला काळा काळा । झडकरी झोप रे बाळा ॥

कोकणच्या चौदा ताली । झोपल्या घाटाखाली ।

आणि रात्र बहुतचि झाली । किती सांगु तुला समजावू वेल्हाळा ।

नीज रे नीज लडिवाळा ॥२॥
ते म्हणाले, 'प्रेम अमुचा विषय नाही!'
मी म्हणालो, 'का? तुम्हाला ह्रदय नाही??'

एकदा तूही भिडव डोळे जगाशी
रोज झुकणे पाप आहे, विनय नाही

ध्वस्तले कित्येक आडोसे मनाचे
थांबला पण आसवांचा प्रलय नाही

आजही आहे अबाधित व्यसन माझे
राहिली तुजलाच माझी सवय नाही

गारद्यांचा काय मी द्यावा भरवसा
शब्द त्यांचा शब्द आहे, अभय नाही

माणसांनी निवड केली श्वापदांची
लोकशाहीचा मुळी हा विजय नाही

स्वाभिमानाचेच केवळ तेज आहे
भोवती माझ्या निराळे वलय नाही

सोडली मैफ़िल अता मी काजव्यांची
यापुढे गावात त्यांच्या उदय नाही..



कवी - वैभव जोशी
लग्न समारंभा मध्ये
१ मुलगा-"यार , ती पिवळी वाली माझी ."
.
.
.
२ मुलगा - अच्छा ? ठिक आहे, लाल वाली माझी मग.
.
.
.
३ मुलगा - २ मुलला हरामखोरा , काहि तर लाज ठेव
लाल वालिच्याच लग्नाला आलो आहोत आपण.
Gf : मला विसरुन जा
माझा साखरपुडा झाला आहे
मुलगा लंडन मध्ये राहतो त्याची स्वत:ची कंपणी आहे ....
.
.
.
.
.
.
गोटया : चल जाऊ दे, झाल ते झाल ...
फक्त माझ्या साठी लंडनहून एक मोबाईल फोन पाठव ,
मी ऐकलय तिथ मोबाईल फोन स्वस्त मिळतात .......

जगणं आहे सुंदरशी कला!

एक गंमत सांगू तुला?
जगणं आहे सुंदरशी कला!

तुटेल एवढं ताणायचं नसतं,
उसवलेलं नातं विणायचं असतं!

एक गंमत सांगू तुला?
जगणं म्हणजे अधांतरी झूला!

धोक्यांनी डगमगायचं नसतं,
एकमेकांना सावरायचं असतं!

एक गंमत सांगू तुला?
जगणं असावं रंगमंच खुला!

मुखवट्यांना भुलायचं नसतं,
चेह-यांना ओळखायचं असतं!

एक गंमत सांगू तुला?
स्वत:तच बघ मला!

एकमेकातलं उणं बघायचं नसतं,
सूर जमवून जीवनगाणं गायचं असतं!


कवी - प्रल्हाद दुधाळ