लंडे गुंडे हिरसे तट्टु ह्यांचीं संगत धरु नको । नरदेहासी येऊन प्राण्या दुष्ट वासना धरुं नको ॥ध्रु० ॥
भंगी चंगी बटकी सठकी ह्यांच्या मेळ्यांत बसुं नको । बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मागी सोडुं नको ॥
संसारामधिं ऐस आपला उगाच भटकत फिरुं नको । चल सालसपण धरुनि निखालस बोला खोटया बोलुं नको ॥
पर धन पर नार पाहुनि चित्त भ्रमुं हें देऊं नको । अंगीं नम्रता सदां असावी राग कुणावर धरुं नको ॥
नास्तिकपणांत शिरुनि जनाचा बोल आपणा घेऊं नको । भली भलाई कर कांहीं पण अधर्म मार्गीं शिरुं नको ॥चाल॥
मायबापावर रुसूं नको । दूर एकला बसूं नको । व्यवहारामधिं फसूं नको ॥चा० प० ॥
परी उलाढाली भलभलत्या पोटासाठीं करुं नको ॥ लंडे गुंडे० ॥१॥
बर्म काढुनि शरमायाला उणें कुणाला बोलुं नको । बुडवाया दुसर्याचा ठेवा करुनिया हेवा झटुं नको ।
मी मोठा शाहाणा धनाढयही गर्व भार हा वाहुं नको । एकाहुन एक चढी जगामधिं थोरपणाला मिरवुं नको ॥
हिमायतीच्या बळें गरिबागुरिबाला तूं गुरकावुं नको । दो दिवसांची जाइल सत्ता अपेश माथां घेऊं नको ।
बहुत कर्जबाजारी होऊनि बोज आपला दवडुं नको । स्नेह्यासाठीं पदरमोड कर परंतु जामिन होऊं नको ॥चाल॥
विडा पैजेचा उचलुं नको । उणी तराजू तोलुं नको ॥ गहाण कुणाचें डूलवुं नको ॥ असल्यावर भीक मागूं नको ॥ चा० प० ॥
नसल्यावर सांगणें कशाला गांव तुझा भिड धरुं नको ॥ लंडे गुंडे० ॥२॥
उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठीं करुं नको ॥ बरी खुशामत शहाण्याची ही मूर्खाची ती मैत्रि नको ॥
कष्टाची बरी भाजि भाकरी तूप साखरेची चोरि नको ॥ आल्या अतिथा मुठभर द्याया मागें पुढती पाहूं नको ॥
दिली स्थिती देवानें तींतच मानीं सुख कधिं विटूं नको ॥
कवी - अनंत फंदी