कोणी सांप्रत लक्ष्य लावुनि जरा पाहील माझेकडे,
ध्यानाची निरखील पाठ तर तो निस्तेज माझ्या मुखीं;
देव्हार्यांत मनाचिया बसुनियां आहेस जी तूं सखी,
त्या तूझ्यावरी तें जडून रुसलें या बाह्य शून्या गडे !
नक्षत्रें, सुमने, सुवर्णनिधिही, मोत्ये, हिर्यांचे खडे,
सन्ध्या आणि उषा, नसे रविशशी, विद्युल्लताही निकी,
ऐसे दिव्य पदार्थ जोडुनि तुझ्या रूपास मी पारखीं;
सारेही दिसती फिके !--- तुजहुनी मातें सुधा नावडे !
माझ्या गे स्मरणीं तुझें गुण, मुखीं तीं इक्षुखंडें जशी,
होतीं नीरस तीं परी गुण सदा तुझे गोडीस देती सदा;
ज्या मत्क्लृप्ति तुझ्याविशीं, चघळितों त्या स्वांघ्रिं जैशीं मुलें;
तेणें रक्त मदीय आटत असे, निद्रा न येई मशीं !
उत्कष्ठा ह्रदयीं---मनोज्ञ तव ती पाहीन मूर्ति कदा ?
वेडापीरच जाहलों जिवलगे आहे वियोगामुळें !
कवी - केशवसुत
वृत्त - शार्दूलविक्रीडित
- १२-११-१८९८