एक दिवस नेहमीप्रमाणे ऑफीसमध्ये आलेला प्रत्येक कर्मचारी समोरच्या बोर्ड वाचून आश्चर्य चकित होत होता.

"तुमची या कंपनीमधील प्रगती रोखणाऱ्या व्यक्तीचा काल मृत्यु झाला आहे, त्याच्या अंत्ययात्रेत नक्की सामिल व्हा.  "

सुरवातीला प्रत्येकाला कुठल्या न कुठल्या सहकाऱ्या बद्दल वाईट वाटलं.

पण नंतर उत्सुकता वाढली, माझी प्रगती रोखणारा नक्की कोण????

यासाठी प्रत्येकजण शवपेटीच्या जवळ जाऊ लागला.
शवपेटीत डोकावून बघताच प्रत्येकाचे डोळे विस्फरले, शरीर स्तब्ध झाले, तोंडातून शब्द फुटेना.

कारण शवपेटीत एक मोठा आरसा ठेवला होता. प्रत्येकजण त्यात स्वतःला बघत होता.

शवपेटीच्या जवळच एक बोर्ड ठेवला होता,

"या जगात तुम्हाला जर कोणी प्रगती पासून रोखु शकतो तर तो फक्त अन फक्त तुम्ही स्वतः"

कंटाळा, आळस, नाकर्तेपणा, कारणे सांगणे, प्रत्येक गोष्टीमधून पळवाट काढणे हे फक्त तुम्ही फक्त स्वतःसाठी करत असता.

तुमचे आयुष्य कधीही मित्र, कंपनी, जॉब, बॉस बदलल्यामुळे बदलत नाही.

ते बदलते फक्त आणि फक्त तुम्ही बदलता तेव्हाच.

आयुष्याच्या शेवटापर्यंत दुसऱ्याला कितीही दोष दिला तरी तुमची परिस्थिती बदलणाार नाही.
दुसऱ्याच्या आड़ तुमचा नाकर्तेपणा किती दिवस झाकाल?

तुम्ही तेव्हाच मोठे होवू शकता; जेव्हा तुम्ही स्वतः मोठे व्हायचं ठरवाल. अन्यथा या जन्मात तुम्हाला मोठे करणे कुणालाही शक्य नाही.

पुर्वी लोक   घराच्या   दारावर   एक   माणूस   ठेवायचे.
कारण   कुणी   कुत्रं   घरात   घुसू   नये.
आजकाल   घराच्या   दारावर        कुत्रं   उभं   ठेवतात.   कारण
कुणी   माणूस   घरात    येऊ  नये.
---------------------------------------
पुवीॅ   माणूस   जेवण   घरी 
करीत   होता.  आणि    शौचालय   बाहेर    होत.
आता   जेवण   बाहेर   करतो
आणि   शौचालय   घरात  आहे. _________
पुवीॅ   लग्नात   घरच्या    स्रिया   जेवण   बनवायच्या.
आणि   नाचणार्‍या   बाहेरून यायच्या.  आता   जेवण   बनवणाऱ्या    बाहेरून   येतात. आणि   घरातल्या   स्रिया   नाचतात.
_________
पुवीॅ   माणूस   सायकल   चालवायचा    तो    गरीब   समजला   जायचा.
आता    माणूस   कारने 
जिममध्ये  जातो  अन् सायकल
चालवतो !
---------------------------------------------
पुर्वी माणुस चुलीवर स्वैपाक करायचा  मग LPG वर स्वैपाक करायला लागला.
आता चुलीवरच जेवण खायला ढाबा शोधायला जातो !
---------------------------------------------
पुर्वी वायरीच्या फोनने लांबची माणसे ही जोडली जायची.
आता बिनवायरीच्या मोबाईलने जवळच्या नात्याचे दोर ही कच्चे केलेत!
--------------------------------------------
पुर्वी माणसं कशी शहाणी होती.
आता माणसं येडी अन् हातातले फोन स्मार्ट झालेत !
-----------यालाच -----------म्हणत्यात --------------------परिवर्तन--------
दृष्टीकोन

एक (तरुणी) आई डायनिंग टेबलाजवळ चिंतीत होऊन बसुन होती. कारण नेहमीचेच!
मार्च एंड असल्यामुळे इनकम टॅक्स भरणे भाग होते.
घरातील सर्व कामे तर करायचीच होती वर उद्या होळीच्या निमित्ताने बरेच पाहुणे जेवायला येणार होते.
या सगळ्या गोष्टींमुळे ती त्रस्त झाली होती.

जवळच तिची १० वर्षांची मुलगी आपल्या वहीत काहीतरी लिहीत होती.
तिने मुलीला विचारले, "काय करतेयस?"
मुलगी म्हणाली,
"आज teacher नी होमवर्क दिला आहे. विषय आहे 'negative thanks giving आणि सांगितले आहे की अशा गोष्टींवर निबंध लिहा ज्या आपल्याला सुरूवातीला आवडत नाहीत पण नंतर आवडायला लागतात"

आईनं आश्चर्य व्यक्त करून वही बघायला घेतली! बघुया आपल्या मुलीने काय लिहीलय!
मुलीने लिहीलं होतं;

- मी माझ्या वार्षिक परिक्षेला धन्यवाद देते कारण त्या नंतर उन्हाळी सुट्टी चालू होते ..

-मी त्या सर्व कडू आणि खराब चवीच्या औषधांना धन्यवाद देते कारण त्या घेतल्यावरच माझी तब्येत चांगली होते.

- मी गजराच्या घड्याळाला धन्यवाद देते कारण पहाटे पहाटे तेच मला मी अजूनही जिवंत असल्याचे सांगत असते .

वाचता वाचता आईच्या मनात विचार आला की "अरे माझ्याकडे पण अशा अनेक गोष्टी आहेतच की; ज्यांच्या साठी मी धन्यवाद व्यक्त करू शकते"
विचार करता करता खूप बाबी समोर आल्या

"income tax द्यावा लागतो याचाच अर्थ सुदैवाने माझ्याकडे चांगल्या पगाराची नोकरी आहे"

"घरी भरपूर काम करावं लागतं, म्हणजेच माझ्याकडे एक घर, एक हक्काचे आश्रयस्थान आहे .."

" सणासुदिला मला खूप माणसांसाठी जेवण बनवावे लागते म्हणजेच माझ्या कडे भरपूर नातेवाईक आहेत जे माझ्या सुख दुःखाचे साथीदार आहेत."

गोष्टीचे तात्पर्य -
प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा ..

चला आपणही असाच positive attitude ठेऊन आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस सोनेरी बनवूया.
👳🏼‍♀ पुणेकर: ही शाई पाण्याने जाईल?
👴🏼 मतदान केंद्र अधीकारी : नाही

👳🏼‍♀ पुणेकर: तेलाने?
👴🏼 अधीकारी : नाही

👳🏼‍♀ पुणेकर: साबणाने?
👴🏼 अधिकारी : नाही

👳🏼‍♀ पुणेकर: किती दिवस अशीच राहणार?
👴🏼 अधिकारी : साधारण वर्षभर..

👳🏼‍♀ पुणेकर: मग माझ्या केसांनाही लावाल? दर पंधरा दिवसांनी केस काळे करायचा जाम कंटाळा आलाय.
दुपारच्या कडक उन्हाच्या वेळी मी व्हरांड्यात बसलो होतो. तेवढ्यात, माझ्या घराच्या कंपाउंडमध्ये एक थकल्या सारखा दिसणारा परंतु, धष्टपुष्ट कुत्रा शिरला.

त्याच्या गळ्यातील पट्ट्याकडे आणि सुदृढ़ शरीराकडे पाहुन वाटते होते की, हा कुणा चांगल्या घरचा पाळीव कुत्रा आहे.

मी त्याला जवळ बोलावून त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.

तो शेपुट हालवत तिथेच बसून राहीला.

मी उठून घरात निघालो, तसा तोही मागोमाग हाॅल मध्ये आला आणि खिडकीशेजारील एका कोपऱ्यात शहाण्यासारखा पाय दुमडून, पुढील दोन पायात तोंड खुपसून बसला.

पाहता पाहता झोपीही गेला.

मी पण हाॅलचे दार बंद करून सोफ्यात बसून राहिलो.

तासाभराने तो उठून दाराकडे निघाला. मी ही उठून दार उघडले.

तो सरळ कंपाउंड बाहेर गेला. बहुधा, त्याच्या घरी गेला असावा!

दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच वेळेला तो आला.

तसाच हाॅलच्या कोपऱ्यात झोपला. तासाभराने उठून निघून गेला.

मग हे रोजचेच झाले.

तो यायचा, झोप काढायचा अाणि निघून जायचा. असे कित्येक आठवडे झाले.

मला उत्सुकता लागुन राहिली, हा नेमका कुणाचा आहे ?

मी एके दिवशी त्याच्या पट्टयात एक चिठ्ठी लिहुन अडकवली,
"तुमचा कुत्रा माझ्याकडे रोज येऊन झोप काढतो, हे तुम्हाला माहीत आहे का?"

दुसऱ्या दिवशी पुन्हा रोजच्याच वेळेला तो कुत्रा आला. पण, यावेळी त्याच्या पट्ट्याला एक चिठ्ठी दिसत होती. मी ती काढून वाचू लागलो.....

"टॉमी एक चांगल्या घरचा कुत्रा आहे. इथे माझ्या सोबतच राहातो. पण, माझ्या बायकोच्या अखंड वायफळ बडबडीला कंटाळून, थोडीशी तरी झोप मिळावी म्हणून रोज तुमच्याकडे येतो....उद्यापासुन मी पण त्याच्या सोबत येत जाऊ का ?
चिठ्ठी लावून कळवणे!"
सौ. पुणेकर : मला सगळे सडके, खराब आंबे द्या.

आंबेवाला बंधू : खराब ???

सौ. पुणेकर : हो हो. खराब, नासके आणि सडके !

बंधू: (सर्व खराब आंबे एकत्र करून) हे घ्या...

सौ. पुणेकर : हं .ठेवा बाजूला... आता उरलेल्या पैकी अर्धा डझन द्या !

आंबेवाल्याने खराब आंब्याचा रस पिऊन जीव दिला
एक 6 वर्षाचा मुलगा आपल्या 4 वर्षाच्या लहान बहिणीसोबत बाजारातून जात असतो. अचानक त्याला जाणवते की त्याची बहीण मागे राहिली आहे.

तो थांबतो व मागे वळून पाहतो तर त्याला दिसते की, त्याची बहीण एका खेळण्याच्या दुकानासमोर उभी राहून अतिशय कुतूहलाने काहीतरी पहात आहे.

तो मुलगा मागे जातो व तिला विचारतो, "तुला काही हवे आहे का?" ती एका बाहुलीकडे बोट दाखविते. तो मुलगा तिचा हात धरतो व एका जबाबदार मोठ्या भावा प्रमाणे तिला ती बाहुली देतो. ती बहीण अत्यानंदीत होते....

हे सर्व तो दुकानदार पहात असतो व त्या मुलाचे प्रगल्भ  वागणे पाहून आश्चर्यचकित होतो.....

आता तो मुलगा काउंटर कडे येतो व त्या दुकानदाराला विचारतो "सर, किती किंमत आहे या बाहुलीची?"

दुकानदार एक शांत माणूस असतो व त्याने जीवनाचे अनेक चढ उतार पाहिलेले असतात. तो त्या मुलाला प्रेमाने व आपुलकीने  विचारतो " बोल तू काय देशील ?"

मुलगा आपल्या खिशातील सर्व शिंपले जे त्याने व त्याच्या बहिणीने नुकतेच समुद्रकिनाऱ्यावर गोळा केलेले असतात ते बाहेर काढतो व दुकानदाराला देतो. दुकानदार ते घेतो व जणूकाही पैसे मोजत आहे या अविर्भावात मोजायला सुरु करतो. शिंपले मोजून झाल्यावर त्या मुलाकडे पाहताच मुलगा म्हणतो " कमी आहेत का ?"
दुकानदार म्हणतो " नाही नाही, हे बाहुलीच्या किमतीपेक्षा जास्त आहेत.  ज्यादाचे मी परत करतो. असे म्हणून तो केवळ 4 शिंपले घेतो व बाकी सर्व शिंपले त्याला परत करतो.
मुलगा एकदम आनंदात ते शिंपले आपल्या खिशात ठेवतो व बहिणीसोबत निघून जातो.

हे सर्व त्या दुकानातील कामगार पहात होता व त्याने आश्चर्याने मालकाला विचारले, " मालक ! इतकी महागडी बाहुली तुम्ही केवळ 4 शिंपल्यांच्या मोबदल्यात दिलीत ?"

दुकानदार एक स्मित हास्य करीत म्हणाला,
"आपल्यासाठी हि केवळ शिंपले आहेत. पण, त्या मुलासाठी हि शिंपले अतिशय मौल्यवान आहेत. आणि आत्ता या वयात त्याला नाही समजणार पैसे काय असतात. पण जेंव्हा तो मोठा होईल ना, तेंव्हा नक्कीच समजेल. आणि जेंव्हा त्याला आठवेल कि आपण पैश्यांच्या ऐवजी शिंपल्यांच्या मोबदल्यात बाहुली खरेदी केली होती, तेंव्हा त्याला माझी आठवण होईल आणि तो हा विचार करेल कि हे विश्व चांगल्या माणसांनी भरलेले आहे.