एक बेवडा रात्रीची सायकल🚴 घेऊन कब्रीस्तान मधी घूसला
.
अन दूसर्या साईड ने बाहेर निघाला अन घाम पुसत बोलला…😰😰
.
.
च्यामायला कोनता रोड होता
काय माहीत…
येवढे स्पिड़ ब्रेकर असत्यात व्हय…
एक माणूस रात्री 2:00 ला डॉक्टरच्या घरी जातो आणि डॉक्टरला उठवून विचारतो...

"डॉक्टर साहेब, घरी यायची तुम्ही किती फी घेता..? "

डॉक्टर : फक्त 250 रुपये..!
   
माणुस : तर चला मग.

डॉक्टर गाडी काढतात आणि दोघेजण घराकडे निघतात.

माणूस: डॉक्टर साहेब..... इथे थांबा. माझे घर आले...!
             
डॉक्टर : OK, चला लवकर, मला पेशंट दाखवा..!

माणूस : हे घ्या 250 रूपये. रात्री रिक्षावाले घरी जायला 500 रुपये मागत होते  म्हणून तुम्हाला विचारले. ...!!
.
.
.



कोण म्हणतं दारू घेतल्यावर डोकं चालत नाही....!!

"पोटात दुखते"

एक दिवस पार्थ कामावरून घरी येतो राधिका झोपलेली असते तिच्या पोटात दुखत असते ती पार्थला सांगायचा प्रयत्न करते पण त्याचे मन दुसऱ्या कामात असते.

त्याची आई स्वयंपाक करता करता त्याला बोलते "मलाच स्वयंपाक करायचा होता तर बायको कशाला केली,तिला कसला कंटाला येतो बाकीच्या बायका नौकरीवरून आल्यावर काम करतच नाही का ?"

आईचे बोलणे ऐकून पार्थ रागात राधिकाला उठवतो आणि स्वयंपाक करायला लावतो तिचा एकही शब्द ऐकून न घेता म्हणतो ,"पोट दुखल्याने माणूस मरत नाही".

त्याची आई आऩंदी असते,"याला म्हणतात खरा पुरूष".
राधिका ढसाढसा रडते पण स्वयंपाक करते ७-८ लोकांचा आणि सगळे काम करून झोपी जाते जेवन न करता,पार्थच्या मनात राग असतो म्हणून तो तिच्याशी काहीच बोलत नाही ,ती हुंदके देऊन रडत असतेआणि

पार्थ कानात बोळे टाकून झोपी जातो व म्हणतो ,"काय सारख छोट्या छोट्या गोष्टीला रडू येत तू जा बाई एकदाचीच निघून जा माझ्या जिवनातून "

राधिका रडता रडता एक जोराचा हुंदका देते आणि शांत होते ," बर झाल एकदाची झोपली आता मला शांत झोप येईल.
सकाळी बराच वेळ झालेला असतो पण ती काही ऊठत नाही पार्थ रूम मधून बाहेर येतो त्याच्या आईची बडबड सुरूच असते,पण आता पार्थ आईला समजवायचा प्रयत्न करतो ,"अग आई तिला खरच बर नसेल,रोज सगळ करून जाते ना ती."

"शेवटी बायकोचाच झालास ना आiता आमच कशाला ऐकशील," आईकडे दुर्लक्ष करून पार्थ रूम मधे जातो राधिकाला प्रेमाने हाक मारतो ३-४ दा पण ती काही ऊठत नाही तो तिला हलवतो तेव्हा त्याला जाणवते की ती एकदम गार पडली आहे आणि त्याला response देत नाहीये.

तो लगेच तिला दवाखान्यात नेतो,डॉक्टर तिला मृत सांगतात पार्थला हादरा बसतो.
reports आल्यावर डॉक्टर सांगतात की ulcer फुटल्यामुळे तिचा मृत्यु झाला तुम्ही जर लगेच काल आनलं असत तर ती वाचली असती ,body मध्ये poision पसरल्यामुळे रात्री ११.३० ला तिचा मृत्यु झाला.

पार्थला तिचा शेवटचा हुंदका आठवतो आणि तो रडायला लागतो त्याला स्वतःचा राग येतो.

" राधिका सगळे नाते सोडून माझ्या सोबत आली माझे सगळे नाते जपले आणि मी तिला समजून न घेता तिच काहीही न ऐकता तिच्याशी असा वागलो,माझ्यामुळे ती गेली" पण आता तो काही करू शकत नव्हता ती नेहमीसाठी त्याला सोडून गेली होती आता तीनेही त्याच्याशी अबोला धरला होता आणि तोही कायमचा.

मित्रहो:-
व्यक्ती जिवंत असेपर्यंत त्याची काळजी घ्या त्याला समजून घ्या ,त्याच्या मरणानंतर रडून काही अर्थ नाही कारण मरणानंतर शत्रूही रडतात.

आपल्या घरातील व्यक्तिवर खुप प्रेम करा...
आज तुम्ही त्यांना जवळ केले तर उद्या ते तुम्हाला जवळ घेतील..
राग आल्यास शांततेने समाजवा..प्रेमात

आज ती सुन आहे..तुमची

उद्या तुमची मुलगीही कोणाची तरी सुन होणार आहे...हे विसरु नका....

सुखी व्हायचय ?

एका शहरातला एक तरुण मुलगा खूप मेहनती खूप विचारी खूप अभ्यासू त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. नंतर लग्न झाले. नवीन नवीन संसार. सुरुवातीचे दिवस छान गेले. पण हळूहळू घरात बारीक सारीक कुरबुर सुरू झाली. जेवणावरून बाहेर फिरायला जाण्यावरून. काहीवेळा कारणे खूप क्षुल्लक असायची पण वाद पेटायचा. मग घरात अबोला. एकूण वातावरण बिनसू लागलेले..
असाच एकदा तो वैतागून घरून ऑफिसात निघालेला होता. तर गाडी काढताना पार्किंग मध्ये एक तेजस्वी पुरुष समोर उभा दिसला. त्या पुरुषाने स्वतःहून या तरुणाला विचारले बेटा दुःखी दिसतोय. काय झालं ? मी काही मदत करू का ?
हळव्या स्वभावाच्या त्या तरुणाला एकदम गहिवरून आलं  त्याने कबुली दिली की होय महाराज मी दुःखी आहे. पण मला सुखी व्हायचं आहे. एक तरी क्षण एक तरी मिनिट मला सुख पाहायचे आहे काय करू?
तो तेजस्वी पुरुष म्हणाला नक्की सुखी होशील. मात्र त्यासाठी माझ्यासोबत आत्ता अर्धा  तास यावं लागेल जमेल का ?
तरुण म्हणाला हो चालेल
मग ते दोघे एकत्र पायी पायी निघाले जवळच एक बाग होती तिथे तेजस्वी पुरुष आत गेला मागोमाग तो तरुणही गेला गेट जवळच एक जडसा  दगड पडला होता तेजस्वी पुरुषाने तो दगड उचलून तरुणाच्या हाती देऊन मागोमाग चालत यायला सांगितले तरुण तो दगड हातात घेऊन निघाला. पाच मिनिटांनी त्याच्या हाताला रग लागली म्हणून त्याने दगड दुसऱ्या हातात घेतला अशीच पंधरा मिनिटे गेली आता तरुणाचे दोन्ही हात दुखू लागले तरी चालणे सुरू होतेच. शेवटी अर्ध्या तासाने तरुणाची सहन शक्ती संपली दगड दोन्ही हातानी पकडून  तो त्या तेजस्वी पुरुषाला म्हणाला आता सहन होत नाहीये.
यावर तो पुरुष म्हणाला आता तो दगड खाली ठेव..
त्याबरोबर तरुणाने दगड लगेच टाकला. हुश्श केले. घामाघूम झालेला चेहरा पुसला.ओझे कमी झाल्याने तो थोडा ताजातवाना झाला त्याच क्षणी तेजस्वी पुरुष म्हणाला हाच तो सुखाचा क्षण आहे. ओझे कमी झाल्याने तू आत्ता स्वःताला खूप सुखी समजतोय ना ?
तरुण म्हणाला होय महाराज
मग तो पुरुष म्हणाला जीवनाचे देखील असेच आहे तो दगड म्हणजे दुःख / निराशा आहे तो दगड एक मिनिट हातात ठेवला थोडे दुखले पाच मिनिटे अजून ठेवला अजून जास्त दुखले. अर्धा तास ठेवल्यावर सहन करण्या पलीकडचे दुखले.आता हे आपल्यावर आहे की आपण तो दगड कितीवेळ हातात ठेवणार ? तुम्ही तो दगड जितक्या लवकर खाली ठेवाल तितक्या लवकर सुखी व्हाल  आणि जमलेच तर असले दगड उचलूच नको आयुष्यात कधीच तू दुःखी होणार नाहीस..
जगात आपल्याला दुखवू शकेल अशी एकच व्यक्ती असते ती म्हणजे आपण स्वतः  दुसरे कुणीही कितीही ठरवले तरी दुःखी करू शकत नाही..

गरूडभरारी म्हणजे काय ?

गरूडाचं आयुष्य असतं 70 वर्षाचं,पण तो 40 वर्षाचा होईपर्यंत त्याची चोच बोधट आणि वाकडी होते. त्याची नखं निकामी होतात. त्याच्या पंखातील बळ कमी होतं. सावज पकडणं त्याला जमत नाही. जीवनातील शौर्य संपलं . आता खाण्यापिण्याची भ्रांत अशी अवस्था होते. नखं नसलेला आणि आयाळ नष्ट झालेल्या म्हाता-या सिंहासारखं किंवा दात काढलेल्या सापासारखं जगणं पदरी येतं. कमालीचं नैराश्य जगणं असह्य होऊन जातं.
पण गरूडाचं काळीज वेगळचं असतं. उंच उंच उडत गरूड एका पहाडावर जातो एकटाच. खडकावर चोच आपटून आपटून तो मोडून टाकतो. एखाद्या ऋषींनी तपश्चर्येला बसावं असे दिवस काढतो त्या पहाडावर.
त्याला कुणी शिकवत नाही. हळूहळू पुन्हा अणकुचीदार चोच येऊ लागते; मग त्या चोचीनं तो स्वत:ची नखं उपसून काढतो. किती वेदना होत असतील; पण तो ते सहन करतो. नखं पुन्हा येतात तर त्या नखांनी तो स्वत: चे पंख उपसून फाडून काढतो. बिनपंखांचा गरड पुन्हा एकटा राहतो. काही काळानंतर त्याला पुन्हा पंख येतात, चोच तोवर मोठी होते, नखं धारदार होतात.
आणि मग तो जगप्रसिध्द गरूड आकाशात उंच भऱारी मारतो. तितक्याच ताकदीनं आत्मविश्वास आणि शौर्यानं तो पुढील 30 वर्षॆ जगतो.
स्वत:ची नखं उपसणं ही तपश्चर्या, वेदना परिवर्तनासाठी सहन करणं ही तितिक्षा (वेदना हसतमुखानं सहन करणं म्हणजे तितिक्षा) . एखाद्या योद्ध्याचं शौर्य आणि ऋषीचं तप अंगी बाळगणा-या त्या राजपक्ष्याची भरारी ही जगभऱ गरूडभऱारी म्हणून मानानं ओळखली जाते.

ही कथा ऐकताना माझ्या अंगावर रोमाचं उभे राहिले. वाटून गेलं हा गुण माणसात आला तर माणसं दात काढलेल्या सापासारखं सरपटत बसणार नाहीत. नविन परिवर्तनाला सामोरं जाताना अंगावरून काय मुलायम मोरपीस फिरणार नाही तर त्या गरूडासारखं रक्तबंबाळ व्हावं लागेल हे माणसानं जाणलं पाहिजे.
परिवर्तन हे तितिक्षेच्या झाडाला आलेलं फूल आहे हे समजलं पाहिजे.
🎭
"रडतोस काय माणसा , बदलाला सामोरं जा. परिवर्तनाची तुतारी फुंक आणि भोग परिवर्तन . नवनिर्मितीचं बीजं तितिक्षेत असतात. तोड ती तुझी नैराश्याची बोथट झालेली चोच, उपट तुझी ती आळसानं बोथट झालेली नखं ; फाड तुझ्या त्या नाकर्तेपणाचे आणि पुन्हा एकटा वाट बघ. या सृष्टीचं सृजनत्व नक्कीच तुला नवसंजीवनी देईल. निराशेचं तुटलेलं मुंडकं हातात घेऊन शौर्याचं खड्ग पुन्हा एकदा तळपव त्या काळ्या खडकावर आणि सज्ज हो पुन्हा एकदा गरूडभरारी घ्यायला .
नेहमी छोट्या छोट्या
चुका सुधरायचा प्रयत्न करा,
कारण मनुष्याला डोंगराने नाही
तर छोट्या दगडानेच ठेच लागते.
ऑफीस सुटल्यावर घरी   निघालो , खूप भूक लागली होती. पण आई व बायको दोघींही घरी नव्हत्या म्हणून रस्त्यात पाणी पुरीची गाडी दिसली म्हणून पाणीपुरी खाण्यासाठी थांबलो. पाणीपुरीवाल्याकडे गर्दी होती. गपचूप आपला नंबर येईपर्यंत वाट बघण्यापालिकडे काही हातात नव्हते.
पाणीपुरीवालाच्या बाजूला एक आजोबा त्यांचा नंबर यायची वाट बघत उभे होते. पायात पांढरा शुभ्र पायजमा, वर हाफ शर्ट, चेहऱ्यावर निर्विकार भाव, आणि हसरा चेहरा, वय वर्ष साधारण ६५-७०.

आजोबा मस्त पाणीपुरी च्या पिशवीत हात घालून एक एक कोरडी पुरी तोडांत कोंबत होते.  माझा नंबर आला. पाणीपुरीवाल्यासमोर द्रोण हातात घेऊन उभा राहिलो. व एकामागोमाग एक पाच पाणीपुऱ्या खाल्ल्या. पोटातली आग जरा शांत झाली होती. आजोबांचा मात्र पुऱ्या खाण्याचा कार्यक्रम चालूच होता. पाणीपुरीवाला चांगलाच वैतागला होता.
"बाबूजी प्लेट देता हुँ। बराबरसे खाओ ना" आजोबांनी नुसतेच गालातल्या गालात हसून पुऱ्या खाणे चालूच ठेवले.
एक प्लेट पाणीपुरी खाऊन माझे तोंड खवळले होते. म्हणून आजून एक पाणीपुरीची प्लेट सुरु केली.

आजोबा मात्र तल्लीन होऊन पिशवीमधल्या पुऱ्या मटकावत होते.
"ओ आजोबा नीट घेऊन खा की?" मी बोललो. आजोबा हू नाही की चू नाही. वाटले काहीतरी गडबड आहे. माझी दुसरी प्लेट संपत आली. आजोबा तिथेच उभे.

तेवढ्यात  मागून एक माणूस स्कुटीवर  आला.
"काळजी करू नकोस, बाबा सापडले!!" कोणाशी तरी मोबाईलवर बोलत होता. गळ्यात ऑफिस बॅग, पायात साधी चप्पल, चाळीशीतला असावा तो, आणि  त्याच्या चेहऱ्यावर त्याचे बाबा सापडल्याचा आनंद दिसत होता.!
त्याने गाडी बाजूला घेवून स्टँडला लावली.

"काय बाबा आज पाणीपूरी का?         खायची का अजून???"
त्याने आजोबांना विचारले. आजोबांचे त्यावर काहीच उत्तर नाही. त्याने आजोबांना गाडीवर बसवले. व पाणीपुरीवाल्याला नम्रपणे विचारले की, आजोबांनी किती पुऱ्या खाल्ल्या आणि त्याचे पैसे देऊन टाकले. हे सगळे बघून मला नवलच वाटले.
"हे आजोबा कोण आहेत तुमचे?" मी विचारले.
"वडील आहेत माझे." त्याचे उत्तर.
"त्यांना काही त्रास आहे का?" माझा पुढचा प्रश्न.
"हो त्यांना अल्झायमर आहे."
अत्यंत शांतपणे त्याने सांगितले. त्याच्या बोलण्यात कुठेही दुःख, ताण, त्रास नव्हता. अगदी सहजतेने तो बोलत होता.
" मग हे आजोबा असे कुठेही जातात का?"
" हो, आत्ताच बघा ना, पाच किलोमीटर  चालत आलेत."
मी शॉकच झालो.
"मग तुम्ही यांना शोधता कसे?"मी विचारले.
"आम्ही यांच्या खिशामध्ये कायम एक मोबाईल ठेवतो आणि त्यात एक GPS ट्रॅकर लावला आहे. त्याच्या साहाय्याने शोधतो ह्यांना  मी."
"असे वारंवार होत असेल" मी आश्चर्याने विचारले.
तो स्मितहास्य करून म्हणाला "महिन्याला एक दोन वेळेस"
"काळजी घ्याआजोबांची! बाप रे काय हा वैताग" मी बोललो. त्यावर तो गृहस्थ म्हणाला, "बाबाही मी लहानपणी खेळायला गेलो की मला शोधून आणायचे ,याञेत हरवलो तर शोध शोध शोधायचे. त्यात काय येवढं."

त्याने त्याच्या वडिलांना व्यवस्थित गाडीवर बसविले आणि निघून गेला.             

खूप काही शिकण्यासारख होतं त्या माणसाकडून. इतका दुर्दम्य आजार वडिलांना असून सुद्धा किती शांत होता तो. बिलकुल चिडचिड नाही की  कुठल्याच प्रकारचा मनस्ताप नाही.
उतारवयात आपल्या वडिलांना लहान बाळाप्रमाणे सांभाळणाऱ्या त्या माणसाला मनोमन सलाम ठोकून मी पुढे निघालो...               

खरंच आपल्यालाही जगता येईल का हो असं.!!