एका शहरातला एक तरुण मुलगा खूप मेहनती खूप विचारी खूप अभ्यासू त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. नंतर लग्न झाले. नवीन नवीन संसार. सुरुवातीचे दिवस छान गेले. पण हळूहळू घरात बारीक सारीक कुरबुर सुरू झाली. जेवणावरून बाहेर फिरायला जाण्यावरून. काहीवेळा कारणे खूप क्षुल्लक असायची पण वाद पेटायचा. मग घरात अबोला. एकूण वातावरण बिनसू लागलेले..
असाच एकदा तो वैतागून घरून ऑफिसात निघालेला होता. तर गाडी काढताना पार्किंग मध्ये एक तेजस्वी पुरुष समोर उभा दिसला. त्या पुरुषाने स्वतःहून या तरुणाला विचारले बेटा दुःखी दिसतोय. काय झालं ? मी काही मदत करू का ?
हळव्या स्वभावाच्या त्या तरुणाला एकदम गहिवरून आलं त्याने कबुली दिली की होय महाराज मी दुःखी आहे. पण मला सुखी व्हायचं आहे. एक तरी क्षण एक तरी मिनिट मला सुख पाहायचे आहे काय करू?
तो तेजस्वी पुरुष म्हणाला नक्की सुखी होशील. मात्र त्यासाठी माझ्यासोबत आत्ता अर्धा तास यावं लागेल जमेल का ?
तरुण म्हणाला हो चालेल
मग ते दोघे एकत्र पायी पायी निघाले जवळच एक बाग होती तिथे तेजस्वी पुरुष आत गेला मागोमाग तो तरुणही गेला गेट जवळच एक जडसा दगड पडला होता तेजस्वी पुरुषाने तो दगड उचलून तरुणाच्या हाती देऊन मागोमाग चालत यायला सांगितले तरुण तो दगड हातात घेऊन निघाला. पाच मिनिटांनी त्याच्या हाताला रग लागली म्हणून त्याने दगड दुसऱ्या हातात घेतला अशीच पंधरा मिनिटे गेली आता तरुणाचे दोन्ही हात दुखू लागले तरी चालणे सुरू होतेच. शेवटी अर्ध्या तासाने तरुणाची सहन शक्ती संपली दगड दोन्ही हातानी पकडून तो त्या तेजस्वी पुरुषाला म्हणाला आता सहन होत नाहीये.
यावर तो पुरुष म्हणाला आता तो दगड खाली ठेव..
त्याबरोबर तरुणाने दगड लगेच टाकला. हुश्श केले. घामाघूम झालेला चेहरा पुसला.ओझे कमी झाल्याने तो थोडा ताजातवाना झाला त्याच क्षणी तेजस्वी पुरुष म्हणाला हाच तो सुखाचा क्षण आहे. ओझे कमी झाल्याने तू आत्ता स्वःताला खूप सुखी समजतोय ना ?
तरुण म्हणाला होय महाराज
मग तो पुरुष म्हणाला जीवनाचे देखील असेच आहे तो दगड म्हणजे दुःख / निराशा आहे तो दगड एक मिनिट हातात ठेवला थोडे दुखले पाच मिनिटे अजून ठेवला अजून जास्त दुखले. अर्धा तास ठेवल्यावर सहन करण्या पलीकडचे दुखले.आता हे आपल्यावर आहे की आपण तो दगड कितीवेळ हातात ठेवणार ? तुम्ही तो दगड जितक्या लवकर खाली ठेवाल तितक्या लवकर सुखी व्हाल आणि जमलेच तर असले दगड उचलूच नको आयुष्यात कधीच तू दुःखी होणार नाहीस..
जगात आपल्याला दुखवू शकेल अशी एकच व्यक्ती असते ती म्हणजे आपण स्वतः दुसरे कुणीही कितीही ठरवले तरी दुःखी करू शकत नाही..

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा