30-35 ठीक आहे हो,

40 पार झालं की कशातच मन लागत नाही...

कुठंही बाहेर पडावस वाटत नाही, 

फिरायला वगैरे पण भीती वाटते..


तिशी च्या आत कसं, लगेच कुठं ही निघता यायचं...

थकवा नाही, कायम उत्साही वगैरे..!

20-25 तर अति स्वीट...

गोंडस गोंडस वगैरे...एकदम टवटवीत... आयुष्याची मज्जाच मज्जा वगैरे....

कसलीच भीती नाही..!


45 पार झाल्यावर तर काय होईल देव जाणो..!!


असो,


ह्या #तापमानात घरीच वामकुक्षी घेणंच योग्य.!!!🫣


काळजी घ्या उष्णता फारच वाढत आहे.!!! 😉


🤣😂🤣😂😊

 तीन दरोडेखोर एका घरात शिरले. ते त्या बाईला म्हणाले, "आम्हाला तुमच्या घराची व्यवस्था बिघडवायची नाही आणि तुम्हाला इजा करायची नाही, म्हणून आम्ही इथे सोफ्यावर बसलो आहोत. तुमच्याकडे जे काही पैसे आणि दागिने आहेत ते घेऊन या."


त्या बाईने पैसे आणि दागिने आणले. दरोडेखोरांचा म्होरक्या म्हणाला, "तुमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या पतीने भेट म्हणून दिलेली हिऱ्याची अंगठी कुठे आहे?"


ती गप्प राहिली आणि अंगठी आणून त्यांना दिली.


"तुमच्या बहिणीने दुबईहून पाठवलेले घड्याळ घेऊन या." बहिणीने दिलेली भेटवस्तू देताना तिच्या डोळ्यात अश्रू होते.


"आता तुमच्या परवानगीने आम्ही 'नेस्कॅफे'ची इन्स्टंट कॉफी पिऊ."


कॉफी प्यायल्यानंतर दरोडेखोरांचा म्होरक्या म्हणाला, "आता कालचा उरलेला अननसाचा केक घेऊन या."


 जेव्हा दरोडेखोरांनी सर्व सामान नेले, तेव्हा ती बाई संकोचून म्हणाली, *"तुम्ही लोक खूप व्यावसायिक आणि नीतिमत्ता असलेले दरोडेखोर आहात. आमच्या घरातल्या वस्तूंबद्दल तुम्हाला कसे कळले?"*


*दरोडेखोरांच्या म्होरक्याने चेहऱ्यावर मास्क नीट करत म्हटले, मॅडम, आम्ही तुमचे 'फेसबुक फ्रेंड्स' आहोत.*


आम्ही तुमच्या पोस्ट्स नियमितपणे वाचतो. आम्ही तुमचा स्टेटससुद्धा तपासतो. 🫣


सोशल मीडियावर सर्व काही पोस्ट करणाऱ्या सर्वांना समर्पित


🤣😂🤣😂😊

 पत्नी नवऱ्याकडे वळून म्हणाली: "मी तुमच्याशी बोलत होते आणि तुम्ही सहा वेळा जांभई दिली, मी तुम्हाला कंटाळा आणतेय का?" 😡


नवरा म्हणाला: "त्या जांभया नव्हत्या. ते बोलण्याचे सहा अयशस्वी प्रयत्न होते." 🫣


🤣😂🤣😂😊

गर्मीचा कहर

रात्री बेडरुम मध्ये 2-3 मच्छर फिरतांना दिसले....


मी उठून ऑल आऊट लावणार तेवढ्यात एक मच्छर म्हणाला..


*"काका तुमची शपथ, चावणार नाही....* 🙏

*बस थोडा वेळ AC मध्ये बसु द्या"* 🫣


🤣😂🤣😂😊

 माझ्या शेजारणीचा नवरा आठवड्याभरापूर्वी कामानिमित्त दुबईला गेला आहे...🛩️


काल त्याची पत्नी त्यांची बेडरूम साफ करत असताना तिला त्याचा पासपोर्ट सापडला...🫣


🤣😂🤣😂😊

 *समोरच्याला कधीही कमी समजू नका.*😇


*कदाचित  ते* 😉


*तुमच्यापेक्षाही जास्त येडं असेल.*🫣


🤣😂🤣😂😊

 कालू प्रवचनाला गेला आणि मार खाऊन परत आला. त्याच्या मित्राने विचारले, "अरे दादा, हे कसे झाले?"🤔


कालू म्हणाला, "माझी काहीच चूक नसताना मला मार बसला." 🥴


महाराज असा उपदेश करत होते की, पती-पत्नी एकाच सायकलच्या दोन चाकांसारखे असतात. 😇


मी उभा राहून विचारले, "जर आपण आपल्या शेजाऱ्यासोबत मिळून एक रिक्षा बनवली, तर तुमचा काही आक्षेप असेल का?"😉


मी  काही चुकीचा प्रश्न विचारला तर नाही ना? 🫣


🤣😂🤣😂😊