वर्हाडी ठसका

काय सांगू राजाभाऊ, जमाना नाही बरा
आन् साधंसुधं पोट्ट पाहून पोट्टी मारते डोरा || धृ ||

सूट बूट अत्तर लावून कालेजात जाते
आन् इडली-डोसा दोघांमंदी गुपूर गुपूर खाते
निकालात मात्र तिचा असते canvas कोरा
आन् साधंसुधं पोट्ट पाहून पोट्टी मारते डोरा || १ ||

"हम आपके है कौन" ला असते लाईन भारी
कालेजातल्या टपरीवर थकीत रायते उधारी
बिल देऊन बापाचा होते उजडा चमन सारा
आन् साधंसुधं पोट्ट पाहून पोट्टी मारते डोरा || २ ||

बाईकवाल्या पोट्ट्याची भारी असते मजा
पिंकी,रिंकी बसते माग,पुढं असती विज्या
अंगात असतो जवानीचा तुफान गरम वारा
आन् साधंसुधं पोट्ट पाहून पोट्टी मारते डोरा || ३ ||

एका वर्षात कमीत कमी चार पाच तरी होते
इंटरव्हल मंदी शाहरुख बाद सलमान एन्ट्री घेते
एका डिग्रीत होते अश्या पाच पंचवीस येरझारा
आन् साधंसुधं पोट्ट पाहून पोट्टी मारते डोरा || ४ ||

आलतू फालतू पोट्ट्यायची होते मजा मस्त
बाजार करून प्रेमाचा केल यायनं सस्त
चटके मात्र बसते याचे खर्या इमानदारा
आन् साधंसुधं पोट्ट पाहून पोट्टी मारते डोरा || ५ ||

1 टिप्पणी: