पुण्याचा प्रसिद्ध वाडा आहे शनिवार वाडा .

एक दिवस सायंकाळी 5 वाजता वाड्याच्या आजूबाजूला बऱ्याच प्रेक्षकांची गर्दी झाली होती. ह्याच गर्दीत एक जोडपं एकमेकांशी भांडण्यात व्यस्त होतं. साधारण पणे 200 लोकं त्यांच्या ह्या तमाशाची मजा घेत होते. काही लोकं याचा वीडियोही बनवत होते. 

भांडणाचं कारण हे होतं की बायको नवऱ्याजवळ हट्ट करत होती . "आज तुम्ही कार खरेदीच करा. मी थकलेय तुमच्या मोटर सायकल वर बसून बसून." 

नवरा बोलला ये वेडे उगीच जगासमोर तमाशा करू नकोस. गपगुपान मला चावी दे.

बायको बोलली नाही देणार . तुमच्याकडे एवढा पैसा आहे त्यामुळे तुम्ही आज कार घेतली तरच घरी येईल.

नवरा बोलला "अगं बाई तुझ्या पाया पडतो. बरं घेवूयात कार आता तरी चावी दे " 

बायको:  नाही देणार.

नवरा:  "बरं नको देवूस मी आता गाडीचं लॉकच तोडतो."

बायको ओरडली "जा तोडा पण ना चावी देणार ना तुमच्या सोबत येणार."

नवरा:  "असं असेल तर हे घे मी कुलुप तोडतोय.  जा तुझी मर्जी आता माझ्या घरी येवू नकोस. "

बायको: जा जा नाही यायचं मला तुमच्यासारख्या कंजुष माणसासोबत.

नवऱ्याने लोकांच्या मदतीने मोटरसायकलचे लॉक उघडले त्यावर बसला व बायकोला म्हणाला "तू येणारेस की जाऊ मी ?"

तिथं उभ्या असलेल्या लोकांनी त्याच्या बायकोला समजावलं " अगं जा बाई , एवढ्याशा गोष्टीमुळे कशाला स्वतःच्या संसाराचं वाटोळं करतेस?"

मग बायकोने नवऱ्याकडनं वचन घेतलं की "तो ही बाईक विकून लवकरच कार घेईल" दोघांचा समेट झाला व दोघं तिथनं निघून गेले.

मस्त आहे ना गोष्ट? 

पण अजून संपली नाही बरंका .

तर मित्रांनो,

बरोबर आर्ध्या तासाने परत त्या ठिकाणी गर्दी झाली.

एक माणूस जोरजोरात व डोक्यावरचे केस ओढून ओढून बोंबलत होता की "कोणी तरी माझी मोटरसायकल दिवसा ढवळ्या चोरून नेली. "

त्यानंतर संपूर्ण वाड्याच्या आजूबाजूला शांतता पसरली .

😂😂

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा