सांगायचं नसतं कुणाला काहीही....

दुःख आपल्याच हास्याच्या पडद्याआड लपवायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....

ते मनातल्या मनात पचवायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....

पचलं तर ठीक , नाही तर तसंच आत साठवायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....

साचलंच जरी पर्वता एवढं , तर तेही सर करायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....

सुख द्यायचं , सुख वाटायचं , पुढ्यात वाढलेलं दुःख तसंच स्वीकारायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....

दुःख झुरत बसायचं नाहीच , झुगारायचंहि नाही , त्याच्या खोलात घुसायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....

गौतम बुद्धां सारखं दुःखाचं खरं कारण शोधायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....

धुक्यातली धूसर वाटही संपतेच , फक्त पुढे चालत राहायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....

काही तरी मिसिंग आहे...

आज बरंच काही कदाचित खूप काही आहे माझ्या कडे ...
पण तरी काही तरी मिसिंग आहेच...

असून पैसे आज माझ्या कडे,
पण तो 'कुल्फीवाला मामा' मिसिंग आहे...

खूप मित्र आहेत माझे पण,
ती 'कंचे खेळायची जागा' आज मिसिंग आहे...

आज ही ती शाळा तिथेच आहे,
पण माझा तो 'बाक' आज मिसिंग आहे...

सकाळी तर दर रोज उठतो मी,
पण ती झोप मोडणारी 'चिमण्यांची जोडी' आज मिसिंग आहे...

आईच्या हातची आंघोळ,
ती आजीच्या गप्पांनी रंगलेली रात्र,
आज कुठे तरी मिसिंग आहे..

आज बरंच काही कदाचित खूप काही आहे माझ्या कडे ...
पण तरी काही तरी खरच आज मिसिंग आहेच...

भेट आपली शेवटची

भेट आपली शेवटची हसून निरोप घेत आहे |
वरून शांत असलो तरी हृदयातून रडत आहे |

जात आहेस सोडून मला, नाही अडवणार मी तुला |
असशील तिथे सुखी राहा, ह्याच माझ्या शुभेच्छा तुला |

निरोप तुला देतांना अश्रू माझे वाहतील |
काळजाच्या तुकड्यांना सोबत वाहून नेतील |

त्या वाहणाऱ्या अश्रुतही प्रतिबिंब तुझेच असेल |
नीट निरखून पहा त्यांना, प्राण त्यात माझा दिसेल |

वाट आपली दुभंगली आता पुन्हा भेटणे नाही |
प्रवास जरी एक आपला मार्ग एक होणे नाही |

आठवण तू ठेवू नकोस, मी कधीच विसरणार नाही |
भेटणे तुझे अशक्य तरी वाट पाहणे सोडणार नाही |

जातेस पण जातांना एवढे सांगून जाशील का?
भेटलोच जर कधी आपण ओळख तरी देशील का?

जाता जाता थोडे तरी मागे वळून पाहशील का?
प्रत्येक्षात नाही तरी डोळ्यांनी काही बोलशील का?

बोलली नाही तू जरी, नजर तुझी बोलेल |
गोंधळलेल्या अंत:कर्णाची खबर मला सांगेल |

कोठेतरी हृदयात इतिहास सारा आठवशील |
तो आठवण्या पुरता तरी, तू नक्कीच माझी राहशील |

नजरेने जरी ओळखलेस तू, शब्दांनी मी बोलणार नाही |
तुझ्या माझ्या आयुष्यात नसती वादळ आणणार नाही |

नेहमीच पराभव झाला तरी, हक्क तुझ्यावर सांगणार नाही |
पण तुझी शप्पत सांगतो.... पुन्हा प्रेम करणार नाही.......!!!!!

पोरी म्हणजे पोरीच असतात

या पोरी म्हणजे पोरीच असतात,
कधी गोड बुंदी कधी तिखट कचोरी असतात...

जाणून घ्यायला थोड्या कठीणच असतात
सुंदर दिसणाऱ्या आपल्या नशिबात नसतात...

ज्यांना आपल्यात इंटरेस्ट अश्या थोड्या कमीच असतात,
आपल्याला आवडणाऱ्या सहसा आधीच एंगेज असतात...

नखरे ह्यांचे तसे खूप असतात,
पक पक पक पक यांच्या तोंडाला टाळे नसतात,
आमच्या मनात टपरीवरची रु.५ ची कटिंग,
त्या मनात कॅफे डे ची रु.२५ ची कॉफी घेऊन असतात...

सांभाळतात आम्हाला म्हणून
त्यांना गुन्हे सगळे माफ असतात,
पण काही हि म्हणा....या पोरी एकदम भारी हसतात...
घायाळ करतात....परवानगी न घेता एकदम मनात बसतात....
झंप्या नापास होतो म्हणुन गुरुजी त्याच्या पालकांना बोलवितात.

गुरुजी : मी झंप्याला विचारले कि जर माझ्याजवळ ५ केळी आहेत आणि त्यातील मी ३ केळी खाल्ली तर खाली किती केळी राहिली ? तर २ केळी राहिली हे साधे त्याला सांगता आले नाही.

झंप्याची आई : काय रे मास्तरड्या, २ केळासाठी पोराला नापास केलं व्हय. उद्या २ डझन केळी पाठवुन देते, करुन टाक पोराला पास.
एक परदेशात कामाला असलेला मुलगा स्थळं बघण्यासाठी भारतात आलेला असतो.
कांदे-पोह्यांच् या कार्यक्रमासाठी तो आणि आई-बाबा एका मुलीच्या घरी येतात.
औपचारिक गप्पा-टप्पा झाल्यावर मुलाला आणि मुलीला जरा ओळख वाढावी यासाठी बाल्कनीत एकांतात पाठवतात.
मग असेच १-२ प्रश्न-उत्तरे झाल्यावर मुलगा विचारतो , "इंग्लिश जमते का ? "
.
.
.
.
.
.
.
मुलगी - हो ,पण सोड्याबरोबर
झंप्या : मी तुझ्याबरोबर लग्न नाही करू शकणार

गर्लफ्रेंड : का ?

झंप्या : घरचे विरोध करत आहेत.

गर्लफ्रेंड - घरी कोण कोण आहे?

झंप्या : बायको आणि २ मुले