आई - हे देवा मुलगा दे... ... ...
बाप: हे देवा मुलगी दे... ... ... ...
वारंवार हे ऐकून देव क्रोधीत झाले आणि म्हणाले... ... ... ... 'शांत बसा, कन्फ्यूज करू नका ...नाही तर असे आउटपुट देईल की तुम्ही आयुष्यभर   रडत राहाल आणि तो टाळ्या वाजवत राहील...

‘फक्त दुचाकी वाहनाकरिता पार्किंग’

संता रस्त्याच्या कडेला कारचे चाक काढत होता, एवढय़ात बंता तेथे आला-
बंता : काय रे, गाडीचं चाक का काढतो आहेस?
संता : फालतू प्रश्न विचारण्यापेक्षा मला मदत का करत नाहीस? आणखी एक चाक काढायचं बाकी आहे. समोरचा बोर्ड बघ.
बंताने समोर बोर्डाकडे बघितले त्यावर लिहिले होते- ‘फक्त दुचाकी वाहनाकरिता पार्किंग’

पिपाणी आणि ड्रम

‘‘हॅलो! कोण?’’
‘‘मी गोंविदराव बारमुते, तुमचा शेजारी’’
‘‘हं, बोला’’
 ‘‘आहो बोला काय? तुमच्या चिरंजीवाना तुम्ही पिपाणी आणून दिलीत. दिवसभर फुंकत बसतो. कान किटले ना अगदी, त्याला एखादी वेळ ठरवून द्या ना!’’
‘‘नाही दिली तर काय करणार’’
‘‘काय करणार? मी माझ्या बंडूला ड्रम आणून देईन’’

राजसा, आता

राजसा,
आता
कुणाची चोरी !

जरासा थांब
सख्या, तू सांब
उमा मी गोरी !

कशाची लाज:
बुडाली आज
जगाची थोरी

कशाची रीत
उफळली प्रीत
करीत शिरजोरी

धरू ये फेर
इथे चौफेर
हवा ही भोरी


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

ती कळी आणि ती साखळी

फुलून हसताच तूला मी दिली नवी कळी
खुडून एक एक तू झुगारलीस पाकळी
कितीतरी जपून मी दुवा दुवाच जोडला
करून घाव तू मधे दुभंगलीस साखळी

सुरंग कोवळी कळी, कशी जुळेल ती पुन्हा?
जुळेल एकदा, तरी कशी फुलेल, सांग ना?
दुवा दुभंगलास तू, कसा मी अभंग करु?
पुन्हा अखंड साखळी कशी जुळेल, साजणा!

विशीर्ण, जीर्ण पाकळ्या तशाच वेचते पिशी
दुभंग साखळी तरी जपून ठेवते अशी
कळी तशीच साखळी विलोकते पुनःपुन्हा
पुसून ऊन आसवे विसावंते कशीबशी


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

हुरहूर

मी धरुं धिरावा कसा? वखत हा असा
दे मला जरा भरवसा, हरिणपाडसाऽऽ रे!

हरवला सखा सोबती
हुरहुरू बघावं किती?
थरथरुन किती मी भिले बघून हा ससाऽऽ रे!

ही समदी शेती सुनी
भवताली नाही कुणी
मग फिरुं कशी मी अशी नवी राजसाऽऽ रे!

नवतीत शोक आगळा
बघ, भरुन आला गळा
आतले कुणाला पुसू मुक्या दशदिशाऽऽ रे!


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

ओढ

स्वार्थसंगर हा म्हणा अथवा म्हणा व्यवहार की
चालली हिरहीर अन किरकीर ही तर सारखी
ओरडो विव्हळो कुणी तुडवून या पतितांस हे
धावतात पुढे पुढे सगळे करून धकाधकी

येथल्या मुलखात मी तर एक वाटसरु नवा
मानवेल कशी मला पण येथली जहरी हवा?
स्नेहशून्यच लोक हे सलगी करु भलती कशी?
देश हा परका इथे ममतेस मोबदला हवा

चाललो इकडून मी तिकडे असाच किती तरी
शेवटी पण ही कधी सरणार सांग मुशाफिरी!
एक आपुलकी हवी, असला नको परकेपणा
लागली हुरहूर रे, पण पोहचेन कधी घरी?


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ