*नागरीक मी भारत देशाचा*

*हातात सगळं आयतं पाहिजे !* 


वीज कधी वाचवणार नाही

बील मात्र माफ पाहिजे !

झाड एकही लावणार नाही

पाऊस मात्र चांगला पाहिजे !


तक्रार कधी करणार नाही

कारवाई मात्र लगेच पाहिजे !

लाचेशिवाय काम करणार नाही

भ्रष्टाचाराचा मात्र अंत पाहिजे !


कचरा खिडकीतून बाहेर टाकीन

शहरात मात्र स्वच्छता पाहिजे !

कामात भले टाईमपास करीन

दर वर्षी नवा वेतन आयोग पाहिजे !


धर्माच्या नावाने भले काहीही करीन

देश मात्र धर्मनिरपेक्ष पाहिजे ! 

मतदान करताना जात पाहीन

म्हणेल, जातीयता बंद झाली पाहिजे !


कर भरताना पळवाटा शोधीन

विकास मात्र जोरात पाहिजे !

नागरीक मी भारत देशाचा

हातात सगळं आयतं पाहिजे !

 देव मानावा की मानू नये 

या भानगडीत मी पडत नाही

आपल्या मान्यतेवाचून

देवाचं काय अडत नाही


ज्यांना देव हवा आहे

त्यांच्यासाठी तो श्वास आहे

ज्यांना देव नकोच आहे

त्यांच्यासाठी तो  भास आहे..

आस्तिक नास्तिक वादात

मी कधीच पडत नाही....

आपल्या मान्यतेवाचून

देवाचं काय अडत नाही....


हार घेऊन रांगेत कधी

मी उभा रहात नाही...

पाव किलो पेढ्याची लाच 

मी देवाला कधी देत नाही

जो देतो भरभरून जगाला

त्याला मी कधी देत नाही

आपल्या मान्यतेवाचून

देवाचं काय अडत नाही...


जे होणारच आहे ....

ते कधी टळत नाही...

खाटल्यावर बसून

कोणताच हरी फळत नाही

म्हणून मी कधी ...

देवास वेठीस धरीत नाही

आपल्या मान्यतेवाचून

देवाचं काय अडत नाही...


देव देवळात कधीच नसतो

तो शेतात राबत असतो

तो सीमेवर लढत असतो

तो कधी आनंदवनात असतो

कधी हेमलकसात असतो...

देव शाळेत शिकवत असतो

कधी देवच  शिकत असतो

म्हणून ....

मी देवळात कधी जात नाही

आपल्या मान्यतेवाचून

देवाचं काय अडत नाही...



(कवी अज्ञात. आवडली म्हणून आपल्या आनंदासाठी पाठवली)

 😃 मजेशीर कविता 😃


बशी म्हणाली कपाला

श्रेय नाही नशिबाला 

पिताना पितात बशीभर

अन म्हणताना म्हणतात कपभर...!


कप म्हणाला बशीला 

तुझा मोठा वशिला

धरतात मला कानाला

अन् लावतात तुला ओठाला...!!!

 

☕ या चहा प्यायला. ☕

 🍁 कप - बशी🍁


स्त्री आणि पुरुष यांचे प्रतीक असलेली कप बशी. स्त्रीआणि पुरुष कप-बशीप्रमाणे एकरूप, परस्पर पूरक आहेत. त्यांना एकटे अस्तित्व नाही. दोघे जोडीनेच वावरतात. बशी ही स्त्रीचे तर कप हे पुरूषाचे प्रतीक आहे. कप भर चहाने घटकाभर उत्साह वाटला तरी बशीभर चहाने अंतरात्मा शांत राहतो. कपाप्रमाणे पूरूष ताठ तर स्त्री बशीप्रमाणे विनम्र असते. कप पोरकट असतो, म्हणून त्याचा कान धरावा लागतो. पण कपातून सांडले तर बशी सांभाळून घेते. एकमेकांना सांभाळण्यास पूरक जन्मभर टिकणारी अन्यथा फुटण्याला निमित्त शोधणारी अशी ही जोडी

 "कप - बशी".

🙂🙃

फक्त हिमतीने लढ👊


घरटे उडते वादळात  

बिळा, वारूळात पाणी शिरते 

कोणती मुंगी ? कोणतं पाखरू ? 🐜🕊

म्हणून आत्महत्या करते ?


प्रतिकुल परिस्थितीत ही वाघ लाचारीने जगत नाही 

शिकार मिळाली नाही म्हणून 

कधीच अनूदान मागत नाही 🐅


घरकुला साठी मुंगी 

करत नाही अर्ज 

स्वतःच उभारते वारूळ 

कोण देतो गृहकर्ज ?🎭


हात नाहीत सुगरणी ला 

फक्त चोच घेउन जगते 

स्वतःच विणते घरटे छान 

कोणतं पॅकेज मागते ?🕴


कुणीही नाही पाठी 

तरी तक्रार नाही ओठी 

निवेदन घेउन चिमणी 

फिरते का कोणत्या योजनेसाठी ?


घरधन्याच्या संरक्षणाला 

धाऊन येतो कुत्रा 

लाईफ इन्शुरन्स काढला का ? 

अस विचारत नाही मित्रा

🐕

राब राब राबून बैल 

कमाउन धन देतात 

सांगा बरं कुणाकडून 

ते निवृत्ती वेतन घेतात ?🐂


कष्टकर्याची  जात आपली 

आपणही हे शिकलं पाहिजे 

पिंपळाच्या रोपा सारखं 

पाषाणावर टिकलं पाहिजे🤕


कोण करतो सांगा त्यांना 

पुरस्काराने सन्मानित 

तरीही मोर फुलवतो पिसारा 

अन कोकिळ गाते मंजुळ गीत🐧


🐝मधमाशीची दृष्टी ठेव 

फुलांची काही कमी नाही 

मधाच्या पोळ्यासाठी मित्रा 

कोणतीच रोजगार हमी नाही


घाबरू नको कर्जाला 

भय, चिंता फासावर टांग 

जिव एवढा स्वस्त नाही 

सावकाराला ठणकाऊण सांग😎


काळ्या आईचा लेक कधी 

संकटापुढे झुकला का ? 

कितीही तापला सुर्य तरी 

समुद्र कधी सुकला का ?🌊💦


निर्धाराच्या वाटेवर 

टाक निर्भीडपणे पाय 

तु फक्त विश्वास ठेव 

पुन्हा सुगी देईल धरणी माय🎑


निर्धाराने जिंकु आपण 

पुन्हा यशाचा गड 

आयुष्याची लढाई 

फक्त हिमतीने लढ👊

 एका आजीच्या १०० व्या वाढदिवशी तिला व्हीलचेअर मध्ये बसवून लॉन वर सर्व कुटुंबियांसमवेत आणतात.

  

आजीला फारसं बोलता यायचं नाही. पण शक्यतो ती आवश्यक तेव्हा लिहून आपले म्हणणे सांगत असे.


लॉनवर खुर्चीवर बसल्याबसल्या थोड्या वेळाने आजी उजवीकडे कलंडू लागली,


म्हणून काही कुटुंब सदस्य तिच्या जवळ तत्परतेने गेले,


आणि तिच्या उजव्या बाजूला ऊशा ठेऊन तिला नीट बसती केली.


थोड्यावेळानंतर ती पुन्हा तिच्या डाव्या बाजूला कलंडू लागली, 


घरच्यांनी आता डाव्या बाजूस ऊशा लाऊन तिला सरळ बसविले.


लवकरच ती पुन्हा पुढे झुकू लागल्याने कुटुंबातील सदस्यांनी पुन्हा तिला पुढे मऊशार तक्का लावला.


आणि नंतर तिला नीट बसवण्यासाठी तिच्या कंबरेखाली एक आणखी ऊशी बसवली.


उशीरा आलेला आजीबाईंचा भाचा त्यांच्याजवळ येऊन म्हणाला,


'हाय, आज्जी,

तू तर अगदी महाराणी शोभते आहेस! 


सगळे अगदी छान बडदास्त ठेवतायत ना?' 


आजीने हळूहळू तिच्याकडील नोटपॅड बाहेर काढून भाच्याला एक नोट लिहिली:


"कसली मरणाची बडदास्त?


 मेले पादायला पण देत नाहीयेत."😩😩😂😂😂😂😂

 मेट्रीक पास झालो तेंव्हा


नंबर पेपरात घावला

अन सारा गांव कसा

माह्या स्वागताले धावला


कोनं केला सेकहेंड

कोन घेतला मुका

सार्याईन पोटात घातल्या

माह्यावाल्या चुका


गांवची मरीमाय

तवाच मले पावली

मामाची एक पोरगी

मह्यावर भावली


एका हाती हेंडल

एका हाती पेपर

सायकवर निंघाला

गांवातला टॉपर


मी पुळे अन माग पोट्टे

अशी निघाली वरात

पेलता पेलेना गर्दी

होती माह्या घरात


पास झालो तवा

सहावी सप्लीमेंट्री

होनार होती आता

कॉलेजात एंट्री


तवाच गर्दीतुन

नम्या आला हापत

मी चरकलो मनात

आनली काय आफत


नम्या म्हने पेपरात

जांगळबुत्ता झाला

पासच्या यादीत तुवा

चुकुन नंबर आला


~~सतीष देशमुख,पणज

९६०४९१२३५१

माणूस होशील का ?

ज्ञानपीठ विजेत्या लेखिका कै. महाश्वेता देवी यांची एक सुंदर कविता. कुणीतरी भल्यामाणसाने त्याचं केलेलं अतिशय सुरेख मराठीत भाषांतर. 

✒️✒️

आलास..?

ये, दार उघडंच आहे ...आत ये.

पण क्षणभर थांब....!!


दारातील पायपुसण्यावर 

अहंकार झटकून ये...!!


भिंतीला बिलगून वर चढलेल्या 

मधुमालतीच्या वेलावर

नाराजी सोडून ये...!!


तुळशीपाशी मनाचे सारे ताप सोडून ये,

बाहेरच्या खुंटीला सारे व्याप टांगून ये...!!


पायातल्या चपलांबरोबर 

मनातली नकारात्मकताही काढून ठेव ..!!


बाहेर खेळणाऱ्या मुलांकडून

थोडा खेळकरपणा मागून आण,

गुलाबाच्या कुंडीतलं थोडं हसू

चेहेऱ्याला लावून आण...!!


ये...


तुझी सारी दुःखं, सारे प्रश्न 

माझ्यावर सोपव.

तुझ्या दमल्या-भागल्या जीवाला

प्रेमाच्या चार गोड शब्दांचे विंझणवारे घालते...!!


ही बघ....


तुझ्यासाठीच ही संध्याकाळ अंथरली आहे मी.

सूर्य क्षितिजाला बांधलाय आणि 

आकाशी गुलालाची उधळण केलीयं...


अन्


प्रेम आणि विश्वासाच्या मंदाग्नीवर

चहा उकळत ठेवलाय.

तो घोट घोट घे....


ऐक ना ...

इतकंही अवघड नाहीये रे जगणं !          

फक्त, तू *माणूस* बनून ये...!!