कदाचित माहीत नसेल, पण मराठी  एक वैज्ञानिक भाषा आहे.  तिचं कोणतंही अक्षर असं का आहे, त्यामागे ही काही कारण आहे. इंग्लीश मधे ही गोष्ट नाही दिसत.

___________________________

क, ख, ग, घ, ङ - यांना  *कंठव्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार करताना ध्वनि कंठातून निघतो.एकदा करून बघा.


च, छ, ज, झ,ञ- यांना *तालव्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार करताना जीभ टाळू ला लागते. 

एकदा करून बघा 


ट, ठ, ड, ढ , ण- यांना  *मूर्धन्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार  जीभ मूर्धा ला लागल्याने होतो.एकदा म्हणून बघा. 


त, थ, द, ध, न- यांना *दंतव्य* म्हणतात.यांचा उच्चार करताना जीभ दातांना लागते.

एकदा म्हणून बघा.


प, फ, ब, भ, म,- यांना *ओष्ठ्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार ओठ जुळल्याने  होतो. एकदा म्हणून बघा .

_____________________________


आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान  वाटतो पण तो का , ते पण लोकांना सांगा.एवढी वैज्ञानिकता इतर कुठल्या ही भाषेत नसेल.


जय मराठी !

क,ख,ग काय म्हणतात बघू जरा ....

•••••••••••••••••••••••••••••••••••

क - क्लेश करू नका 

ख- खरं बोला

ग- गर्व नको 

घ- घमेण्ड करू नका  

च- चिँता करत राहू नका

छ- छल-कपट नको 

ज- जवाबदारी निभावून न्या

झ- झुरत राहू नका  

ट- टिप्पणी करत  राहू नका

ठ- ठकवू नका  

ड- डरपोक राहू नका

ढ- ढोंग  करू नका

त- तंदुरुस्त रहा 

थ- थकू नका 

द- दिलदार बना 

ध- धोका देऊ नका  

न- नम्र बना 

प- पाप करू नका  

फ- फालतू कामे करू नका  

ब- बडबड कमी करा

भ- भावनाशील बना 

म- मधुर बना 

य- यशस्वी बना 

र- रडू नका 

ल- लालची बनू  नका

व- वैर करू नका

श- शत्रुत्व करू नका

ष- षटकोणा सारखे स्थिर रहा 

स- सत्य बोला 

ह- हसतमुख रहा 

क्ष- क्षमा करा 

त्र- त्रास देऊ नका 

ज्ञ- ज्ञानी बना  !!

 🌳🌳पापाचा गुरू कोण🌳🌳


एक पंडित काशीत अनेक शास्त्रांचे अध्ययन करून आपल्या गावात परतले.

संपूर्ण गावात बातमी पसरली की काशीहून कोणी एक पंडित, शास्त्रांचे

अध्ययन करून आला आहे आणि ते धर्मासंबंधी

कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ शकतात.


ही बातमी ऐकून गावातला एक शेतकरी त्याच्याकडे आला

आणि त्यांना विचारू लागला की

"पंडितजी तुम्ही आम्हाला हे सांगा की पापाचा गुरू कोण आहे?" 

प्रश्न ऐकून पंडित गडबडले.....


त्यांनी धर्म आणि आध्यात्मिक गुरुंबद्दल तर ऐकलं होतं.

पण पापचाही गुरू असतो हे त्यांच्या समजण्याच्या

आणि ज्ञानाच्या पलीकडे होते.


पंडितजींना वाटलं की त्यांचे अध्ययन अजूनही अपूर्ण राहिलं आहे.

त्यामुळे ते पुन्हा काशीस निघाले.

अनेक गुरूंना भेटले, पण त्यांना

त्यांच्या प्रश्नाचे उत्तर काही सापडले नाही.


अचानक एक दिवस त्यांची भेट एका गणिकेशी (वेश्येशी) झाली.

तिने पंडितजींना त्यांच्या अस्वस्थतेचे कारण विचारले,

तेव्हा त्यांनी तिला आपली समस्या सांगितली. गणिका म्हणाली, 

"हे पंडित! ह्याचं उत्तर आहे तर अत्यंत सोप्पं,

परंतु उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला काही दिवस

माझ्या बाजूच्या घरात राहावे लागेल.


पंडितजी ह्या ज्ञानासाठीच तर भटकत होते.

ते लगेच तयार झाले.


गणिकेने त्यांची आपल्या बाजूच्या खोलीत राहण्याची व्यवस्था केली.


पंडितजी कोणाच्याही हाताने बनवलेले अन्न खात नसत.

ते आपले नियम-आचार आणि धर्म प्रपंचाचे कट्टर अनुयायी होते.

गणिकेच्या घरात राहून ते आपले जेवण स्वतःच बनवत होते.


अशा प्रकारे दिवस जात होते.


परंतु प्रश्नाचे उत्तर अजूनही सापडले नव्हते.

ते उत्तराची प्रतीक्षा करू लागले.


एक दिवस गणिका त्यांना म्हणाली, "पंडितजी! आपल्याला स्वतः जेवण

बनवण्यात अनेक अडचणी येत असतील.

इथे तुम्हाला बघणारा तर कोणी नाही.

आपली इच्छा असेल तर मी स्नान करून आपल्याला भोजन

तयार करून देऊ शकते.


ती म्हणाली "जर तुम्ही मला ही सेवा करण्याची संधी दिलीत,

तर मी दक्षिणेमध्ये प्रतिदिन आपणांस पाच सुवर्णमुद्रा देईन".


स्वर्णमुद्रांचे नाव ऐकून पंडित विचार करू लागला.

शिजवलेले अन्न आणि त्याबरोबर पाच सोन्याची नाणीही !


अर्थात दोन्ही हातात लाडू आहेत.


तो म्हणाला जशी आपली इच्छा."


पंडित तिला म्हणाला, "फक्त एवढं ध्यानात ठेव की माझ्या खोलीत

जेवण घेऊन येताना तुला कोणी पाहू नये."


पहिल्याच दिवशी अनेक प्रकारची स्वादिष्ट पक्वान्ने बनवून

गणिकेने त्या पंडिताच्या समोर ठेवली.


पण जेव्हा पंडित खाण्यास हात घालू लागला तेव्हा

तिने लगेच पंडितांचे ताट स्वतःकडे खेचले.


तिच्या या वर्तनामुळे पंडित क्रुद्ध झाला

आणि म्हणाला "हा काय मूर्खपणा आहे?"


त्यावर गणिका म्हणाली "हा मूर्खपणा नाही, तर हेच आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे.


इथे येण्याच्या अगोदर आपण भोजन तर दूरच,

पण कोणाच्या हातातले पाणीही पित नव्हतात,


पण स्वर्णमुद्रांच्या लोभाने तुम्ही माझ्या हाताने बनवलेल्या

अन्नाचाही स्वीकार केलात !


तुमच्या प्रश्नाचं हेच तर उत्तर आहे की 'लोभ' हाच पापाचा गुरु आहे..

 *चिटी चावल ले चली,*

*बीच में मिल गई दाल।*

*कहे कबीर दो ना मिलै,*

*इक ले डाल॥* 


अर्थात : 


मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, 'क्या बात है  देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली.' पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली.


तेव्हा कबीर म्हणाले, 'वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.'


तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान डाळीने हिरावून घेतलं.


माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधान क्षणात हिरावून घेतात. 


साधं मोबाईलचं उदाहरण घ्या ना! एखादी व्यक्ती बचत करुन कसाबसा आवडीचा मोबाईल घेते, नि आठवडाभरातच त्याचं लेटेस्ट मॉडेल बाजारात येतं आणि त्याने घेतलेल्या मोबाईलचा आनंद, एका आठवड्यातच संपुष्टात येतो. तो मनाशी म्हणतो, 'इतके दिवस थांबलो होतोच, आणखी आठवडाभर थांबलो असतो, तर काय बिघडलं असतं.'


विकल्प माणसाच्या डोक्यात बिघाड निर्माण करतात. हे मर्म लक्षात घेऊन शोषण /शासन व्यवस्था विकल्पांची लयलूट करतात.


ती बघून, 'घेशील किती दोन करांनी'  अशी माणसाची अवस्था होते. त्याचं डोकं काम करेनासं होतं. अशी माणसं शोषण,शासन व्यवस्थांना हाकायला खूप सोपी पडतात. 


पूर्वी आजोबा-पणजोबांच्या काळातल्या वस्तुही, पुढील पिढ्या आनंदाने वापरत. त्यांना त्या जुन्या वाटत नसत. कारण तेव्हा इतके विकल्प नव्हते (आणि ऐपतही नव्हती.)


आज असंख्य विकल्पांनी, वस्तुंचा जुन्या होण्याचा कालावधीच क्षणिक करुन टाकला आहे. परिणामी लोक चांगल्या वस्तुही भंगारात टाकू लागले आहेत.


भौतिक वस्तुंचा हा नियम मानवी नातेसंबंधांनाही लागू झाला आहे, कारण माणूसही भौतिकच आहे. *नातं, मैत्री यांची नाळही, कधी नव्हे इतकी कमजोर झाली आहे.*


देवाने माणसाला दोन हात दिलेत, ते दोन्ही हातांनी गोळा करावे म्हणून नाहीत, तर *एका हाताने घ्यावं आणि दुस-या हाताने द्यावं,* यासाठी आहेत. *नुसतंच घेत राहिल्याने एकूणच असमतोल निर्माण होतो. मानवी जीवनातील अरिष्टास तो कारणीभूत ठरतो.*


म्हणून देवघेव सुरु राहिली पाहिजे. देवघेवीमुळे समतोल तर टिकून राहतोच, माणसाचं समाधान आणि आनंदही त्यामुळे टिकावू बनतो. 


*कबीरांच्या या दोह्यात असा मोठा अर्थ दडला आहे.*

 🕸🕸🕸🕸🕸🕸🕸


*.⛏.खणता राजा.⛏.*


आयुष्यभर जुगाड केले,

सत्तेसाठी *कोलांटउड्या,*

हातचं सगळंच गेलंय आता, 

रिकामपण सलतंय *गड्या।*


चव्हाणांचा लाडका म्हणून

तिकीट मिळताच राहीलो *ऊभा*

पहिल्याच फटक्यात निवडून येत

गाठली सरळ *विधानसभा।*


नंतर मात्र स्वार्थच साधला,

तत्वे-आदर्श ठेवले *टांगून,,*

लोकांत द्वेष पेरत गेलो

ऐकमेकांची 'जात' *सांगून।*


मग साऱ्या देशामध्ये

पाठीत खुपसलेला खंजीर *गाजला,*

राजकारणाच्या मार्केट मध्ये

शिक्का माझा तिथेच *वाजला।*


तीन वेळा नेतृत्वाची

गळ्यात पाडून घेतली *माळ,*

सत्तेचे मग व्यसन जडले

सामान्यांशी तूटली *नाळ।*


काळही मोठा अनुकुल होता

कुणी न धूर्त माझ्या *खेरीज,*

नितीमत्तेला वजा करित

सत्ताकारणाचीच केली *बेरिज।*


मोठ्या बाईचा अडसर जाताच

बस्तान हलवत गाठले *दिल्ली,*

महाराष्ट्रभर पेरुन ठेवली

आमच्याच जातीची *चिल्ली पिल्ली।*


त्यांना मोकळे रान दीले,

रोज करविला नवा *ऊच्छाद,*

सेक्यूलेरिझमचे ढोल बडवत 

पसरविला फक्त *जातियवाद।*


फडणवीस, शेट्टी, छत्रपती

सगळ्यांचीच मी काढली *जात,*

मोर्चे, संप आंदोलनात

माझीच कुमक, काडी नी *वात।*


धूर्तपणे वाटचाल करीत 

सिंहासनावर रोखली *नजर,*

निवडणूकांचा नेम धरुन

'विदेशी'पणाचा लावला *गजर।*


पून्हा एकदा पक्ष फोडून

सत्तेसाठी पिसला *डाव,*

ईथे मात्र अंदाज चूकला 

तोंडावरतीच पडलो *राव।*


खुर्चीसाठी यू-टर्न मारुन

त्यांचेच पून्हा धरले *पाय,*

मतदारांना कळलेच नाही

माझे नेमके चाललेय *काय।*


पन्नास वर्षे लावल्यात आगी,

कोणतीच अजून शमली *नाही,*

सत्तेसाठी अशी क्लृप्ती

कुणालाच अजून जमली *नाही।*


झोपलेली जनता एकदम

कशी कळेना जागी *झाली,*

सत्तेमधून बाहेर काढले

दिल्ली पाठोपाठ मुंबई *गेली।*


लोक असे शहाणे होता,

होतील आमचे सगळेच *वांधे,*

चव्हाट्यावर अब्रू येईल,

बंद होतील 'उद्योग' *'धंदे'।*


शेतकरी नी मराठ्यांचे,

विषय जणू *अमृततुल्य,*

दोन्हीला मग हवा देऊन,

वाढवून पाहीले *उपद्रवमुल्य।*


तेही डाव फेल झाले

तुरीचीही न शिजली *डाळ,*

उपसून उपसून पार थकलो,

'धरणात' होता एवढा *गाळ।*


राष्ट्रपतीच्या पदाचीही आता 

लागली होती *आस,*

मीरा, कोविंद पुढे आले

तोंडचा गेला तो ही *घास।*


आताशा काहीच काम नसते,

देत सुटतो वावदुक *सल्ले,*

दुकान कुठलेही असले तरी

भरत ठेवतो आपलेच *गल्ले।*


राजकारणाची आवक-जावक 

रोज घरीच मांडत *बसतो,*

'जाणता राजा' कुणी म्हणता,

मनातल्या मनात खुदकन *हसतो।*


*(जे कुणी कवी आहेत*

*त्यांना त्रिवार सलाम)*


 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


🕸🕸🕸🕸🕸🕸🕸

 कालाय तस्मै नमः...


परवा कुठल्यातरी स्पोर्ट्स चॅनलवर 100 मीटर ची पळण्याची शर्यत पहात होतो. त्यातील विजेता हार्डली काही सेकंदाच्या फरकाने ती शर्यत जिंकला. मी माझ्या धाकट्या मुलाला विचारलं की तो किती फरकानं जिंकला रे, तर तो म्हणाला 3.2 मिली सेकंदानं जिंकला. मी त्याला विचारलं की अजून कुणी त्यापेक्षा कमी फरकानं जिंकलाय का ? तो म्हणाला त्याला माहित नाही पण एखादा जिंकला असेल, तर तो फरक काही मायक्रो सेकंदाचा असेल. मी त्याला परत विचारलं त्याहूनही कमी फरकाने कोणी जिंकलं असेल का, ह्यावर मात्र त्यानं मला एक टिपिकल लुक दिला आणि म्हणाला बाबा तुम्हाला काय म्हणायचंय? मी त्याच्या लूक कडे पूर्णपणे दुर्लक्ष करून म्हणालो, की सेकंदाच्या कितव्या भागापर्यंत टाईम मोजता येतो किंवा टाईम मोजू शकतो? ह्या साठी मी विचारतोय ह्यावर मात्र त्यानं ताबडतोब "अलेक्साला" हाक मारून मला डिटेल्स दिली. ती म्हणजे मिली, मायक्रो, नॅनो, पिको, फेमटो, अटो, झेप्टो आणि योक्टो सेकंद. ते पाहून मी त्याला म्हणालो, अरे लेका ही तर डेसिमल युनिट्स आहेत. त्या सेकंदाच्या प्रत्येक भागाला काय म्हणतात ? त्यावर तो म्हणाला बाबा, आत्ताच्या जमान्यात आपण हे इथपर्यंत मोजू शकतोय ते बघा ना उगाच काहीही काय विचारताय ? सेकंदाच्या पलीकडं तुम्हाला देखील माहितीय का ? त्यानं आव्हानात्मक सुरात मला विचारलं. मी पण कॉन्फिडेंटली त्याला म्हणालो येस, मला माहितीय, रादर मी परवाच वाचलं, तुला माहीत करून घ्यायचंय की आपल्या पूर्वजांना 'टाईम' किंवा 'कालाची' सुक्ष्मता किंवा महानता किती माहिती होती ? ती सुद्धा 5000 वर्षांपूर्वी! हे ऐकल्यावर त्याच्या डोळ्यांत मला अविश्वास दिसला, पण मी कॉन्फिडेंटली सांगतोय म्हंटल्यावर त्यानं होकारार्थी मान डोलावली.


मी म्हणालो, हल्ली पुराणातली वानगी (वांगी ?)पुरणातच राहू दे असंच म्हणायची फॅशन झालीय. पण वेदांमध्ये, महाभारतात किंवा श्रींमद्भागवतात अगदी व्यवस्थित माहिती दिलीय, फक्त ती अंधश्रद्धेचा चष्मा बाजूला ठेऊन नीटपणे बघायला हवी. असो, अनायासे आलेली संधी मी थोडाच सोडणार होतो, शिवाय आपल्या वैदिक (हिंदू नव्हे) परंपरेबद्दल अधिक माहिती करून देण्यासाठी ची ही सुवर्ण संधीच होती. मग मी त्याला म्हटलं हे बघ, आपण एक दिवस म्हणजे 24 तासा पासून सुरु करू.


तर 24 तास म्हणजे 8 प्रहर म्हणजे 1 अहोरात्र

1 अह म्हणजे 1 रात्र म्हणजे 12 तास किंवा 4 प्रहर

1 प्रहर म्हणजे 3 तास किंवा 6 नाडीका

2 नाडीका म्हणजे 1 तास किंवा 60 मिनिटे किंवा 1 मुहूर्त

1 नाडीका म्हणजे 30 मिनिटे किंवा 15 लघु

1 लघु म्हणजे 2 मिनिटे किंवा 120 सेकंद म्हणजे 15 काष्ठा

1 काष्ठा म्हणजे 5 क्षण म्हणजे 8 सेकंद

1 क्षण म्हणजे 3 निमेष म्हणजे 1.6 सेकंद

1 निमेष म्हणजे 3 लव म्हणजे 0.53 सेकंद

1 लव म्हणजे 3 वेध म्हणजे 0.17 सेकंद

1 वेध म्हणजे 100 त्रुटी म्हणजे 0.056 सेकंद

1 त्रुटी म्हणजे 3 त्रसरेणू किंवा 0.00057 सेकंद

1 त्रसरेणु म्हणजे 3 अणु म्हणजे 0.00019 सेकंद

1 अणु म्हणजे 2 परमाणू म्हणजे 0.000063 सेकंद

1 परमाणु म्हणजे 0.000032 सेकंद अर्थात सेकंदाचा बत्तीस दशलक्षांवा भाग.


महाशय अतिशय लक्षपूर्वक ऐकत होते त्यामुळे त्यांची विस्फारित नजर आणि वासलेला आ s  बघून मीच म्हणालो, हा सेकंदाचा इतका छोटासा भाग आपल्या पूर्वजांनी का बरं शोधला असावा? म्हणजे एकतर त्यांनी त्या काळी म्हणजे हजारोंवर्षांपूर्वी अतिवेग धारण केलेला असावा किंवा पेशी विभाजन किंवा अणु विभाजन यांसारख्या अतिसूक्ष्म हालचाली ते निरीक्षित असावेत नाही का ?

त्याला तश्या संभ्रमावस्थेत सोडूनच मी फ्रेश होण्यासाठी उठलो.


अपेक्षेप्रमाणे प्रमाणे चिरंजीव माझ्या मागे आले आणि म्हणाले आपण कालाची सुक्ष्मता बघितली आता मला कालाची महानता पण नक्कीच ऐकायचीय ते सुद्धा जेवायच्या आधी. मला समाधान वाटलं. किचन मध्ये डोकावून जरा अंदाज घेतला आणि त्याला सांगायला  सुरुवात केली.


आपण बघितले की 

24 तास म्हणजे 8 प्रहर म्हणजे 1 अहोरात्र

अश्या 15 अहोरात्री म्हणजे 1 पक्ष (कृष्ण आणि शुक्ल)

अश्या दोन पक्षांचा 1 मास (चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन)

असे 2 मास मिळून 1 ऋतु (वसंत, ग्रीष्म, वर्षा, हेमंत, शरद आणि शिशिर)

3 ऋतूंचे 6 मास म्हणजे 1 अयन (उत्तरायण आणि दक्षिणायन)

असे 6 ऋतु मिळून 12 मास म्हणजे 1 संवत्सर

अशी 100 संवस्तरे म्हणजे सामान्य मनुष्याच्या आयुष्याची परम मर्यादा !

मी असे म्हंटल्यावर तो म्हणाला हा, म्हणजे 100 च्या पुढे त्यांना मोजता येत नव्हते. पण आत्ता आपल्याला तर किलो, मेगा, गिगा, टेरा, पेटा, एक्सा,झेटा आणि योट्टा पर्यन्त मोजता येतंय. त्यावर मी त्याला हसून म्हटले अरे ही डेसिमल्स युनिट्स आहेत, त्यांना स्पेसिफिक नावं आहेत का ? मी असं विचारल्यावर परत एकदा त्यानं मला आव्हानात्मक सुरात मला विचारलं मग पूर्वीच्या लोकांना तरी नावं ठाऊक होती का ? मी हसलो आणि म्हणालो तेच तर सांगत होतो मी पण तूच मध्ये थांबवलेस. जरासं वरमून तो म्हणाला बरं बरं सांगा.


तर मानवाचं 1 वर्ष किंवा संवत्सर म्हणजे देवाचा 1 दिवस

असे 360 देव दिवस म्हणजे देवाचे1 वर्ष

देवाचं1 वर्ष म्हणजे मानवाची 360 वर्षं

अशी देवांची 1200 वर्ष म्हणजे 1 कलियुग अर्थात मानवाची 4,32,000 वर्ष

देवांची 2400 वर्षं म्हणजे 1 द्वापारयुग म्हणजे मानवाची 8,64,000 वर्ष

देवांची 3600 वर्ष म्हणजे 1 त्रेतायुग म्हणजे मानवाची 12,96,000 वर्ष

देवांची 4800 वर्ष म्हणजे 1 कृतयुग किंवा सत्ययुग म्हणजे मानवाची 17,28,000 वर्ष

देवांची 12000 वर्ष म्हणजे 1 चौकडी अर्थात मानवाची 43,20,000 वर्ष

अश्या 1000 चौकड्या म्हणजे ब्रह्माचा 1 दिवस म्हणजे मानवाची 4,32,00,00,000 वर्ष

अश्याच 1000चौकड्या म्हणजे ब्रह्माची 1 रात्र म्हणजे मानवाची 4,32,00,00,000 वर्ष

अश्या 2000 चौकड्या म्हणजे ब्रह्माची 1 अहोरात्र म्हणजे मानवाची 8,64,00,00,000 वर्ष (8 अब्ज, 64 कोटी वर्ष)

थोडक्यात म्हणजे मानवाची 8.64 अब्ज वर्ष. समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा त्यांच्या दासबोधात (दा.६.४.१ ते ४) पण हेच सविस्तर सांगितलंय. चिरंजीवांची अवाSक झालेली अवस्था बघून त्याला म्हटलं आज आपण इथंच थांबू, बाकीचं नंतर कधीतरी सांगीन काय ? त्यानंही मुकाटपणे मन हलविली.


आपल्या पृथ्वी निर्माणाची वर्ष एव्हढीच असावीत का आणि त्याची पूर्ण जाणीव आपल्या पूर्वजांना होती का? त्या मुळेच त्यांनी इतकं कालमापन आपल्या वेदां मध्ये, पुराणात विस्तृतपणे पुढील पिढ्यांसाठी लिहून ठेवलंय का असा विचार करून मी पण जेवायला उठलो. 


ऋण निर्देश : १) श्रीमद्भागावतातील विज्ञान दर्शन (रामकृष्ण गोविंद जानकर आणि डॉ. विजय भटकर)

                  २) वैदिक विज्ञान आणि वेदकालनिर्णय (डॉ. प. वि. वर्तक)


महेश मंडलीक

*मनव्यवस्थापन!*

  ☺


आहे त्याचा स्वीकार केल्यास नव्यान्नव टक्के चिंता पळुन जातात.

*वेदनांना विचारांपासुन तोडलं की चिंता पळुन जाते!* 


*1) भुतकाळात घुटमळणे बंद करा –* 


बसल्या बसल्या ना, आपल्या डोक्यात उगाच चक्र सुरु असते, 

- “दहा वर्षांपुर्वी मी चांगला अभ्यास केला असता, तर आज मी ही खुप मोठ्ठा ऑफीसर राहीलो असतो.” 

- “सात वर्षांपुर्वी मी प्लॉट घ्यायला हवा होता, तेव्हा मी सुवर्णसंधी सोडली.” 

- “त्यावेळी मी त्यांच्याशी असे वागायला नको होते! खुप वाईट आहे मी!” 

- “मी खुप कमी पगारावर काम करायला तयार झालो, मी असे नव्हते करायला पाहीजे.”

 व्हायच्या त्या घटना घडुन गेल्या, 

टाईममशीनमध्ये जाऊन ते काही बदलता येणार नाही, तेव्हा आता त्यावर विचार करुन फक्त आणि फक्त, आपली बहुमुल्य उर्जा, फालतुमध्ये खर्च होणार, त्यापेक्षा 

*भुतकाळातल्या, ह्या सर्व चांगल्या वाईट घटना, विसरुन गेलेलं, बरं!


*2)इथे प्रत्येक जण अद्वितीय आहे! –* 


बहुतांश दुःखांच मुळ हे तुलनेत असतं,


*ह्या जगात प्रत्येक गोष्ट एकमेवअद्वितीय आहे,*

गुलाब दिसायला सुंदर असतो, पण म्हणुन मोगर्‍याचं महत्व कमी होत नाही, त्याचा सुगंध ही त्याची ओळख! त्या दोघात डावं-उजवं अशी तुलना करता होईल का? प्रत्येक फुल अद्वितीय आहे.

आता यात डावं उजवं करुन, कशाला दुःखी व्हायचं! प्रत्येकाचा चेहरा एक दुसर्‍यापासुन वेगळा आहे, म्हणुन ह्या जगातली प्रत्येक व्यक्ती एकमेव अद्वितीय आहे, तुम्हीपण!..


*3) ‘आयुष्य कशासाठी’ याचं उत्तर शोधा. –*


आयुष्य भगवंताने आपल्याला दिलेली अनमोल भेट आहे, 

आयुष्य सतत आनंदी राहण्यासाठी आहे, आयुष्य उत्साहाने भरभरुन जगण्यासाठी आहे, आयुष्य भव्यदिव्य स्वप्नं बघण्यासाठी आणि ती स्वप्ने मनमुरादपणे जगण्यासाठी आहे, 

*आयुष्य आपल्या आणि इतरांच्या चेहर्‍यावर हसु फुलवण्यासाठी आहे!*


जीवनाचा प्रत्येक क्षण निष्पापपणे बागडण्यासाठी आहे, मनातले सर्व अपराधी भाव, भुतकाळ-भविष्यकाळ, काल्पनिक जबाबदार्‍यांचे ओझे, सगळे सगळे फेकुन द्या, मोकळे आणि रिते व्हा, प्रत्येक क्षणाला, निरापराध वृत्तीने, निरागसपणे सामोरे जा!


माणसाला तीन गोष्टी जास्त त्रास देतात, प्रत्येक दुःखाच्या मुळाशी ह्या तीन गोष्टी सापडतील, 


 अ) अपेक्षा

 ब) अपुर्ण स्वप्ने,

 क) ध्येयप्राप्ती नंतर येणारा रिक्तपणा!


*बहूदा आपण भला ऊसकी कमीज मेरे कमीजसे सफेद कैसी ! याच विचारात असतो.* 

तो कसा सुखी आहे, 

ती कशी मस्त जगते, 

त्याच आयुष्य आरामशीर आहे,  माझ्याकडे हे का नाही, या अपेक्षेने, तुलनेने दु:ख्खी होत तर नाही ना !


बघा! किती गंमतीशीर आहे हे, समजा, एखाद्याचे लग्न होत नाही, तेव्हा तो किती परेशान असतो, उठता-बसताना, जेवताना, झोपताना एकच ध्यास असतो, लग्न-लग्न-लग्न! नकळत हाच विचार, चिंता बनुन, त्याच्या आत्म्याला डाचु लागतो, त्याच्या दुःखाचं कारण बनतं, मग हास्य गायब होतं, चित्त थार्‍यावर राहत नाही, चिडचिड वाढते. स्वप्नप्राप्तीकडे रोज वाटचाल करायची पण मनावर जखम न होवु देता!, ह्याला म्हणतात, सुखी जीवन!


आणि समजा, एके दिवशी लग्न झालेच, (प्रत्येकाचे होतच असते,) मग अचानक आयुष्यातले थ्रील खतम! पुन्हा सप्पक आयुष्य सुरु, जॉब लागु दे, जॉब लागु दे म्हणुन तळमळलो, आणि जॉब लागला, आता थोड्याच वर्षात त्या जॉबचा कंटाळा यायला लागतो, एक प्रकारचा रिक्तपणा येतो, 


*आयुष्य कशासाठी? जीवनाचा निर्भेळ आनंद घेण्यासाठी, मनाच्या आकाशात हे उत्तर जेव्हा गवसेल, तेव्हा नैराश्य, उदासीनता जवळपास फटकणार पण नाहीत!* 


*4) सेवा करणार्‍याला आत्मिक समाधान मिळते. -*


बघा! किती मजेशीर आहे हे,


- अगरबत्ती स्वतः हवेत विरुन जाते, पण वातावरणात एक प्रसन्न सुगंध पसरवते,

- दिव्याची वात स्वतः नष्ट होते, पण तेजाने घर उजळुन टाकते.

काहीतरी बनण्यासाठी, काहीतरी प्राप्त करण्यासाठी आपण सकाळ संध्याकाळ धावत असतो, पण खरे समाधान कुठे आहे? 

आपल्यात असलेल्या गुणांचा, शक्तीचा वापर आजुबाजुच्यांना, नातेवाईकांना, मित्रांना, अगदी अनोळखी लोकांना सुखी, आनंदी बनवण्यासाठी करणार्‍यांचं जीवन खरं सार्थ झालं, असं म्हणता येईल.


ह्याच चार सुत्रांचा मिळुन बनतो, 

*लॉ ऑफ अट्रेक्शन!*

मनाच्या तळाशी जाऊन सुखाचा शोध घेऊ पाहणारया,  

सगळ्यांचे आयुष्य, सुखी, समाधानी आणि समृद्ध होवो,

 ह्या मनस्वी प्रार्थनेसह, 



🙏💐🙏 

 📳📖📳📃📳📃📳📖📳


            

                  




    


*एक_ग्लास_पाणी*


सरकारी कार्यालयात लांबच लांब रांग लागलेली होती. खिडकी वर जो क्लार्क बसला होता, तो रागीट स्वभावानं सतत डाफरत होता आणि सर्वांशी रागावून मोठ्या आवाजात बोलत होता...


त्या वेळेसही एका महिलेला रागावत म्हणत होता, "तुम्हाला थोडंही समजत नाही, हा फाॅर्म भरुन आणला आहे, यात सर्वच चुकले आहे. सरकारने फॉर्म फुकट दिला आहे तर काहीही भरावं का? खिशातून पैसे द्यावे लागले असते तर दहा लोकांना विचारून भरला असता तुम्ही."


एक व्यक्ति रांगेत उभा राहून बऱ्याच वेळेपासून हे पहात होता. तो रांगेतून बाहेर पडून, आॅफिसच्या मागच्या रस्त्याने त्या क्लार्क जवळ जाऊन उभा राहिला आणि तेथे ठेवलेल्या घागरीतून पाण्याचा एक ग्लास भरून त्या क्लार्क समोर धरला.

क्लार्क ने त्या व्यक्ति कडे डोळे वटारून पाहिले 

 मान वेळावून 'काय आहे' चा इशारा केला.

त्या व्यक्तीने क्लार्क ला म्हटले, "साहेब, खूप वेळेपासून तुम्ही बोलत आहात, घसा कोरडा झाला असेल, पाणी पिउन घ्या."

क्लार्क ने पाण्याचा ग्लास हातात घेतला आणि त्याच्याकडे असे बघितले जसे काही दूसऱ्या ग्रहावरचा प्राणी पाहीला आहे.


आणि म्हणाला, "माहीत आहे, मी कटु सत्य बोलतो, म्हणून सर्व माझ्यावर नाराज असतात. शिपाई पण मला पाणी पाजत नाही."

तो व्यक्ति हसला आणि परत रांगेत आपल्या जागेवर जाऊन उभा राहिला.


आता त्या क्लार्क चे वागणे बदलले होते. अगदी शांत मनाने तो सर्वांचे ऐकून घेत व्यवस्थीत बोलत होता आणि सर्वांचे काम त्याने व्यवस्थीत पार पाडले.

सायंकाळी त्या व्यक्ति ला एक फोन आला. दूसऱ्या बाजूला तोच क्लार्क होता.


 तो म्हणाला, "भाऊ, तुमचा नंबर तुमच्या फॉर्म मधून घेतला होता, आभार मानायला फोन केला होता.

माझी आई आणि बायकोचे अजिबात जमत नाही. आज ही जेव्हा मी घरी पोहोचलो तर दोघींमध्ये वाद सुरू होता, परंतु तुमचा गुरुमन्त्र कामी आला.

तो व्यक्ति एकदम स्तिमित झाला, आणि म्हणाला, "काय? गुरुमंत्र?"


"हो, मी एक ग्लास पानी माझ्या आईला दिले आणि दूसरा ग्लास बायको ला, आणि म्हटले की घसा कोरडा पडला असेल, पाणी पिउन घ्या. बस, तेव्हापासून त्या शांत झाल्या आणि आम्ही तिघे हसत-खेळत गप्पा मारत बसलो आहोत. भाऊ, आज जेवायला आमच्या घरी या."


"हो! पण, जेवायला का?"


क्लार्क ने गदगदल्या स्वरात उत्तर दिले, "गुरू मानले आहे तर एवढी दक्षिणा तर बनतेच ना आपली, आणि हे पण माहित करायचे होते की, एक ग्लास पाण्यात इतकी जादू आहे तर जेवणात किती असेल?"