📳📖📳📃📳📃📳📖📳


            

                  




    


*एक_ग्लास_पाणी*


सरकारी कार्यालयात लांबच लांब रांग लागलेली होती. खिडकी वर जो क्लार्क बसला होता, तो रागीट स्वभावानं सतत डाफरत होता आणि सर्वांशी रागावून मोठ्या आवाजात बोलत होता...


त्या वेळेसही एका महिलेला रागावत म्हणत होता, "तुम्हाला थोडंही समजत नाही, हा फाॅर्म भरुन आणला आहे, यात सर्वच चुकले आहे. सरकारने फॉर्म फुकट दिला आहे तर काहीही भरावं का? खिशातून पैसे द्यावे लागले असते तर दहा लोकांना विचारून भरला असता तुम्ही."


एक व्यक्ति रांगेत उभा राहून बऱ्याच वेळेपासून हे पहात होता. तो रांगेतून बाहेर पडून, आॅफिसच्या मागच्या रस्त्याने त्या क्लार्क जवळ जाऊन उभा राहिला आणि तेथे ठेवलेल्या घागरीतून पाण्याचा एक ग्लास भरून त्या क्लार्क समोर धरला.

क्लार्क ने त्या व्यक्ति कडे डोळे वटारून पाहिले 

 मान वेळावून 'काय आहे' चा इशारा केला.

त्या व्यक्तीने क्लार्क ला म्हटले, "साहेब, खूप वेळेपासून तुम्ही बोलत आहात, घसा कोरडा झाला असेल, पाणी पिउन घ्या."

क्लार्क ने पाण्याचा ग्लास हातात घेतला आणि त्याच्याकडे असे बघितले जसे काही दूसऱ्या ग्रहावरचा प्राणी पाहीला आहे.


आणि म्हणाला, "माहीत आहे, मी कटु सत्य बोलतो, म्हणून सर्व माझ्यावर नाराज असतात. शिपाई पण मला पाणी पाजत नाही."

तो व्यक्ति हसला आणि परत रांगेत आपल्या जागेवर जाऊन उभा राहिला.


आता त्या क्लार्क चे वागणे बदलले होते. अगदी शांत मनाने तो सर्वांचे ऐकून घेत व्यवस्थीत बोलत होता आणि सर्वांचे काम त्याने व्यवस्थीत पार पाडले.

सायंकाळी त्या व्यक्ति ला एक फोन आला. दूसऱ्या बाजूला तोच क्लार्क होता.


 तो म्हणाला, "भाऊ, तुमचा नंबर तुमच्या फॉर्म मधून घेतला होता, आभार मानायला फोन केला होता.

माझी आई आणि बायकोचे अजिबात जमत नाही. आज ही जेव्हा मी घरी पोहोचलो तर दोघींमध्ये वाद सुरू होता, परंतु तुमचा गुरुमन्त्र कामी आला.

तो व्यक्ति एकदम स्तिमित झाला, आणि म्हणाला, "काय? गुरुमंत्र?"


"हो, मी एक ग्लास पानी माझ्या आईला दिले आणि दूसरा ग्लास बायको ला, आणि म्हटले की घसा कोरडा पडला असेल, पाणी पिउन घ्या. बस, तेव्हापासून त्या शांत झाल्या आणि आम्ही तिघे हसत-खेळत गप्पा मारत बसलो आहोत. भाऊ, आज जेवायला आमच्या घरी या."


"हो! पण, जेवायला का?"


क्लार्क ने गदगदल्या स्वरात उत्तर दिले, "गुरू मानले आहे तर एवढी दक्षिणा तर बनतेच ना आपली, आणि हे पण माहित करायचे होते की, एक ग्लास पाण्यात इतकी जादू आहे तर जेवणात किती असेल?"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा