खुप दिवसांपूर्वी मी ही 

राजकीय वात्रटिका लिहिली होती 


आजही परिस्थिती 

जैसे थे आहे


ना ‘शरदा’चे चांदणे

ना ‘सोनिया’चे दिस

‘घडय़ाळा’चे ओझे ‘हाता’ला

म्हणून ‘आय’ कासावीस

 

‘कमळा’च्या पाकळ्यांची

यादवी छळते मनाला

‘धनुष्य’ केव्हाच तुटलय

पण जाणीव नाही ‘बाणा’ला


 

' विळा, हातोडा अन् कंदिलाला'

आजच्या युगात स्थान नाही

डब्यांना ओढू शकेल एवढी

‘रेल्वे इंजिना’त जान नाही

 

मन आहे ‘मुलायम’

पण ‘माया’ कुठं दिसत नाही

‘हत्ती’वरून फिरणारा

‘सायकल’वर बसत नाही

 

कितीही उघडी ठेवा ‘कवाडे’

पण ‘प्रकाश’ आत जाणार नाही

विसरलेले ‘आठवले’ तरीही

‘गवई’ गीत ‘गाणार’ नाही

 

‘बंडखोर’ ‘पक्षां’चा थवा

‘पार्टी’साठी आतूर

कुंपणच खातंय शेताला

अन् बुजगावणही फितूर


काही नव्या ओळी


' स्वाभीमाना 'चे चिन्ह दिसेना

कुणाचे करावे पारायण ?

काय थट्टा चालवली 'नमो ' नमो

' नारायण '! नारायण !!


विनंती केली ईशारे दिले

तरी अवहेलनेची गाथा

कधी पावणार ' मुक्ताई ' ?

हुंदका आवरा ' एकनाथा '


ज्यांनी आणले 'स्वराज '

त्यांची 'मुरली ''मनोहर' वाटेना

संतापाने 'लाल' झाले 'कृष्ण '

ग्रहण सुटता सुटेना


अॅड, अनंत खेळकर

बिर्ला काॅलनी

जठारपेठ 

अकोला


🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

 रात्री सहजच नवरा बायकोला म्हणाला...


*नवरा*:-

पुन्हा जावे शाळेत 

पुन्हा ती दिसावी🙎‍♀

भले लागू दे शिकाया 📕

लसावि, मसावि 🔢


*बायकोचे उत्स्फूर्त उत्तर*:-

बनून आता गोसावी 👳‍♂

जी आहे ती सोसावी 🧕

विसरून आता लसावि, मसावि 😡

आठवणीने उद्या भांडी घासावी 

जमलंच तर फरशी पण पुसावी !!!


😬😉😬😝

 आई


आई माझा देव। आई माझा गुरू।

आई कल्पतरू। आई माझी॥ १॥


गर्भात तुझिया । वाढले निवांत ।

भासली ना भ्रांत । कशाचीच॥ २॥



थोर उपकार। आई जन्म दिले।

सोने माझ्या झाले। जीवनाचे॥ ३॥


आईचे वात्सल्य । जगाहून मोठे।

जीवनाच्या वाटे। अडले ना॥ ४॥


अमृताची धार। पाजलेस आई।

होऊ उत्तराई । सांग कशी॥ ५॥


प्राणाहूनी प्रिय। धन्य माझी आई।

नांव हो विजाई। आई माझी॥ ६॥


माझ्यासाठी देव। असे माझी आई।

आईची पुण्याई। लाभतसे॥ ७॥


स्वामी तिन्ही जगी। आईविना दीन।

सुवचन छान। सांगतसे॥ ८॥


कसं फेडू सांग। तुझे उपकार।

जीवना आकार। तुच दिले॥ ९॥


धन्य पुंडलिक। केली सेवा खरी।

पांडुरंग हरी। पाहतसे॥ १०॥


आईचे रे छत्र। सोन्याचे झालर।

मायेचा पदर। लाभलासे॥ ११॥


धन्य तोच जगी। आई ज्यास आहे।

डोळा भरू पाहे । माऊलीस॥ १२॥


आई माझी राही। थंडगार छाया।

अविरत माया । अखंडीत। १३॥


आईचे काळीज । तुटते लेकरा।

गाय रे वासरा। हंबरते॥ १४॥


संस्काराची खाण।आई रे महान

देगा देवा दान। जन्मभर॥ १५॥


वृद्धाश्रमी नका । पाठवू आईस।

आईच परीस। जीवनाची॥ 16

 🔔  *मंदिर /शाळा* 📖🖋


मंदीराचे कळस 

गगनाला भिडले

शाळेचे बांधकाम 

देणगीवाचुन अडले


दुधाचा अभिषेक 

दगडाच्या देवाला

शालेय पोषण आहार 

नुसताच नावाला


देवाचा दरवाजा 

चांदीने मढला

शाळेचा दरवाजा 

पाण्याने सडला


मंदीरातील झुबंराला 

हि-या मोत्यांचे खडे

शाळेच्या भिंतीना 

पडु लागलेत तडे


मंदीरात जाऊन 

लोक पोथी पुराण वाचतात

शाळेच्या ग्रथांलयात 

उंदीर मामा नाचतात


मंदीराच्या दानपेटीत 

गुप्तदान करतात

शाळेच्या देणगीची 

पावतीच मागतात


दरवर्षाला देवाची 

भरवतात यात्रा

पालक मेळाव्यात 

फक्त पालक सतरा


पुज्या-यांच्या गळ्यात 

सोन्या चांदीचे हार

कंत्राटी शिक्षकांची 

होऊ लागली उपासमार


न खाणाऱ्या देवाला 

पंचपक्वान्नाचा घास

शाळेत खीचडी भाताचा 

अहो येईना वास


आता तुम्हीच सांगा 

कधी संपेल इथला अंधविश्वास

शिकले - सवरलेले तरुण- तरुणीच

करु लागले आता उपवास


🙏🏻 *नवीन पिढीला समर्पित* 🙏🏻

 *"शेंगा आणि टरफलं"*

😂😂😂😂😂😂😂😂✌🏻✌🏻✌🏻



लोकमान्य टिळक 

लहानपणी म्हणाले होते:

"मी शेंगा खाल्ल्या नाहीत,...

मी टरफलं उचलनार नाही"









आता बाकीच्या व्यक्ती काय म्हणाल्या असत्या बघा:


*महात्मा गांधी:*

"मी शेंगा खाल्ल्या आणि मीच टरफलं उचलनार आणि दुसर्याने शेंगा खाल्ल्या तर ती पण टरफलं मीच उचलनार"



*बाळासाहेब ठाकरे:*

"यांच्या बापाचा माल आहे काय?

शेंगा फ़क्त मराठी माणसालाच खायला मिळाल्या पाहिजेत आणि खाताना टरफलं सांडली तर त्याला सरकार जबाबदार असेल" 

जय महाराष्ट्र!



*शरद पवार:*

"महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य असल्याने कुणी कुणाला शेंगा खान्यापासून रोकू शकत नाही...

यात शेतकरयांचं भलं आहे आणि उरलेल्या टरफलांपासून alcohol बनवता येईल का याबद्दल विचार करण्यासाठी सरकार लवकरच समिति नेमेल"



*नरेंद्र मोदी:*

"मित्रोंssss....

शेंग खाने का वर्णन तो हमारे वेदों में भी किया हुआ है....

चाहे हिन्दू हो या मुस्लिम या सीख़ हो या ईसाई हो सबने शेंग खानी चाहिए...

और सबने अपने आसपास का टरफल उठा के भारत को स्वच्छ रखना चाहिए"



*सोनिया गांधी:*

"अमने चार साल पहले एक सपना देका ता की देश के हर एक नौजवान को शेंग खाने का मौका मिलना चाइये...

और कांगरेस ने ये सपना पूरा किया.

और "

दिग्विजय जी ये तरफल कौन सा फल होता है??"

दान्यवाद...



*मनमोहन सिंह:*

"..........

...........

...........

...........

...........

............

.....!!!"



*देवेन्द्र फडणवीस:*

"हे बघा....

महाराष्ट्रात शेंगा खायच्या की नाही याचा निर्णय आम्ही आदरणीय मोदीजींना विचारून उदया जाहिर करू आणि टरफलांबाबत नाथाभौ काय ते लवकरच सांगतील"



*नितिन गडकरी :*

"विदर्भाच्या लोकांवर वेळोवेळी अन्याय झाला आहे त्यामुळे आता आम्हाला खाण्यासाठी आमच्या वेगळ्या शेंगा पाहिजेत आणि टरफलांपासून आम्ही ऊर्जा निर्मिति करता येईल का याचा विचार करू "



*किरीट सोमय्या:*

"या चेंगा काण्याच्या कामात प्रछंड ब्रष्टाचार जाला आहे असा माजा पश्त आरोप आहे आणि प्रमाणा पेक्चा जास्त तरफलं जमा केल्याबद्दल बुजबलांना अटक ज़ालीच पायजे"



*छगन भुजबळ:*

"या शेंगा आमच्या वडिलोपार्जित असुन माझ्याकडे सर्व शेंगा आणि टरफलांचा हिशोब आहे आणि शेंगा खायचा निर्णय सर्वांचा असताना मला एकट्यालाच लक्ष्य केले जात आहे तरीही मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे"



*अण्णा हजारे:*

"हे पहा असं आहे की .... 

 या शेंगांच्या कामात खुपच अनियमितता आढळून येत आहे ,एका शेंगेत एकच दाना दुसऱ्या शेंगेत तीन तर तिसरीत दोन....

आणि टरफलं पण अतिशय निकृष्ट दर्जाची आहेत....

तर असं आहे आणि याची चौकशी तर झालीच पाहिजे नाहीतर मी उपोषणाला बसणार"



*उद्धव ठाकरे:*

"आदरणीय बाळासाहेबांच्या विचारांचे पालन आम्ही करू आणि सर्व शिवसैनिकांना शेंगा खाने बंधनकारक करू आणि टरफलां बाबत संजय राउत "सामना" मध्ये लिहितील"

की आम्ही टरफले उचलायला तयार आहोत पण टरफलांची तयारी आहे का उचलून घ्यायची,

शेंगा खाणे एक कला आहे आणि टरफले उचलणे एक शास्त्र.



*राज ठाकरे:*

"या सर्व परप्रांतियांनी इथे येऊन शेंगांचे भाव वाढवून ठेवलेत आता काय करायचं आपल्या मराठी मुलांनी, सरकारला मराठी मुलांसाठी शेंगा राखीव ठेवल्याच् पाहिजेत नाहीतर राज्यभर खळ्ss खट्याक होईल....

आणि टरफलं फेका त्या अबु आजमी च्या बंगल्या बाहेर...

जय महाराष्ट्र"



*अबु आजमी:*

"देखिये इस्लाम में किधर भी नहीं लिखा है की मुस्लिमो ने शेंग खाना जरुरी है.....

और ये टरफल क्या होता है 

मुझे नहीं पता"



*अजित पवार:*

"ज्या शेतात या शेंगा आढळून आल्या, ते शेत माझ्या मालकीचं असल्याचा खोटा नाटा आरोप उगाचच होतोय...

आरोप सिदध झाल्यास शेंगा खायच् सोडून देईल"



*तटकरे:*

"जसं दादा म्हणतिल, 

 तसं"



*राहुल गांधी:*

"देखो भैया...

आज देश का गरीब क्या चाहता है ...

वो खाली शेंग ही तो खाना चाहता है ...

और ये सरकार क्या कर रही है ...

हमारे सामने टरफल फेक रही है ....

हमे इसके खिलाफ आवाज उठाना चाहिए....

बोलो हाँ - आवाज उठाना चाहिए ..."



*रामदास आठवले:*

"मी नक्की खानार शेंगाsss...

"मी नक्की खानार शेंगाsss...

कॉँग्रेस-राष्ट्रवादीला देणार ठेंगा...

और किसीने टरफलं नहीं उचल्या...

और किसीने टरफलं नहीं उचल्या...

तो विनाकारण करुंगा मैं दंगा ."



*साध्वी प्राची:*

"हर हिंदु ने चार चार गोनी शेंग खानी ही चाहिए और जिसको नहीं खानी वो पाकिस्तान चला जाये"



*अरविंद केजरीवाल:*

"सुनो भई....

ये शेंग खाने का सवाल नहीं है ...

ये आम आदमी के हक़ का सवाल है ..

और कोई अगर आपको दिल्ली में शेंग खाने के लिए मना करे तो हमारे helpline पर फोन करो...

और इस काम में अण्णाजी भी हमारे साथ है"



*निखिल वागळे:*

"भाई जगताप तुम्ही शांत रहा....

मी शेंगा खायच्या की नाही याबाबत प्रेक्षकांची मतं मागवनार आहे आणि टरफलांचा विषय आपण ब्रेक नंतर घेऊ...

पाहत रहा point blank"



*प्रसन्न जोशी:*

"एकूणच काय...

तर शेंग खान्यापासून सुरु झालेला हा विषय गंभीर वळणावर येऊन पोचलाय, बघुया सरकार काय करतय ...

तुर्तास येथेच थांबूया,

 " एकदा असं झालं की उत्तर भारतातनं एक खानसामा फिरत फिरत पोटासाठी नौकरीच्या शोधात कोल्हापूरला आला. येऊन असाच कुठंतरी राहिला असेल, महाराजांची भेट व्हायची वाट बघत होता. तो अतिशय निष्णात होता. त्याच्या हाताला मोठी चव होती. नबाब रईसांच्या हवेल्यातल्या रसोईखान्यात बरीच वर्षे त्याने इमानेइतबारे काम केलं होतं. पदार्थाच्या नुसत्या वासानं तो सांगू शकत होता की त्यात काय कमीजास्त झालेय ते.

           तरूणपणी त्यानं नवाब, खानदानी रईस यांच्या दरबारात हवेल्यात मोगलाई पद्धतीचे अस्सल जेवण तो बनवायचा.

       त्याच्या या गुणामुळे एका नवाबाची एक चिठ्ठी घेऊन तो कोल्हापूर दरबारात काम मिळतेय काय ते बघायला आला होता.

     त्याच्या या गुणामुळे कुणीतरी त्याला मग महाराजांकडे नेले. हत्तीखान्याच्या समोरच्या मोठ्या दरवाजासमोर खुर्चीत नेहमीच्या लोकांबरोबर महाराज बसले होते.

     खानसाम्याने मुजरा केला... "आदाब महाराज, मी उत्तर भारतातून आलोय. महाराजांची कृपा झाली तर मला कोल्हापूर संस्थानची सेवा करण्यात धन्यता आहे. पोटासाठी फिरतोय. मी कोणत्याही प्रकारे हुजुरांची इतराजी करणार नाही...."

     " बरं बरं

      काय काय करतोस तु??"

       महाराजांनी त्याच्याकडे निरखून पाहत विचारले.

    " महाराज, मी कोणत्याही प्रकारचे अस्सल चवीचे पदार्थ बनवू शकतो. शाकाहारी, मांसाहारी, गोड पदार्थ, मोगलाई चवीचे अस्सल मोगल दरबारातल्या पंगतीसारखे... "

   " बरं बरं उद्या संध्याकाळी करा मग बेत सगळ्यांसाठीच.. ह्यासनी घेऊन जावा आपल्या मुदपाकखान्यात अन काय लागंल ते द्या... जेवल्यावरच ठरवू.... या आता... "

  " आदाब महाराज येतो "

.

    दुसऱ्या दिवशी खानसाम्याने आपले पाककलेचे कौशल्य पणाला लावले. पहाटेपासून कामाला लागला. त्याने सांगेल ते ते सगळे पदार्थ मागवले गेले. मटनाचा, शाकाहारी, गोडाचा असे सगळे पदार्थ त्याने रांधले.

     मग पंगत बसली.

  सगळे लोक नुसत्या वासाने दंग झाले असा दरवळ सुटला होता. कधीच न खाल्लेले जायकेदार पदार्थ खानसामा वाढू लागला. प्रत्येकाने एखादा घास खाल्ला की खानसामा उत्सुकतेने बघायचा मग वाहवा मिळाली त्याचा चेहरा फुलून यायचा.

      महाराजांचेही ताट वाढले, एक - दोन वाट्यात बोटं बुडवून महाराजांनी चव घेतली. अगदी थोडा गोडा पदार्थ खाल्ला "हं झ्याक"

   खानसाम्याचा चेहरा उजळला.

पण लगेचच महाराजांनी ताटाला हात लावून नमस्कार केला व ताट पुढे सरकवले...

     "महाराज घ्या, काय झालं???"

    महाराजांनी हातानेच काही नाही या अर्थी खुणावले.

  तोवर रोजचा माणूस महाराजांचे ताट घेऊन आला, आणि मग खरं महाराज जेवायला बसले.

    ज्वारी बाजरीची भाकरी अन तांबडा, पांढरा रस्सा...

    एकदम साधा जेवण....

   महाराज पोटभर जेवले.

        तोवर सगळ्यांचे जेवण उरकले.

   सगळे पुढे आले. "महाराज, असं जेवण कधी झालं नव्हतं. याला आपल्या मुदपाकखान्यात ठेवून घेतलेच पाहिजे....."

     महाराजांनी त्या खानसाम्यास बोलावले " ह्यांचा फेटा बांधून सत्कार करा अन योग्य ती बिदागी देऊन पाठवणी करा..."

  " पण महाराज माझं काय चुकलंय का??

   मला नोकरीत घ्या."

 " नाही तुमचं काय चुकलं नाही.. "

   असं म्हणत महाराजांनी खिशातनं एक लांबलचक यादी काढली ज्यावर काल मागवलेल्या पदार्थांची नावे अन किमती होत्या.

   " मी या संस्थानचा सेवक आहे अन माझ्या लोकांसाठी कामे करताना आम्हाला हे मोठे चोचले पुरवणे सोपे नाही. एवढा खर्चात माझ्या संस्थानातील कितीतरी कष्टकरी लोक खाऊन निघतील. आम्हाला हे परवडणारे नाही. या आता....."

.

#शाहू_जयंती

#अभिवादन........

 *मी हा प्रयत्न करू शकतो का?*



     आपण रोज सकाळी उठल्यावर शुचिर्भूत होऊन आपली पूजा, प्रार्थना करतो, पण खरोखरच आपले मन त्यावेळी एकाग्र असते का? उद्या सकाळी पूजा करताना आठवून पहा, त्यावेळी तुमच्या डोक्यात कितीतरी वेगवेगळे विचार कसे रुंजी घालत असतात, ते!


किमान मिनटभर तरी आपण आपले चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न करू शकतो का? विचार करा…


*इतर व्यक्तींबरोबर बोलताना तुम्ही अतिशय सौम्य आवाजात, हळुवारपणे बोलता.*

 पण तीच सौम्यता आणि हळूवारपणा तुम्ही तुमच्या कुटुंबियांबरोबर बोलताना दाखवता का? नीट आठवून पहा, तुमच्या लक्षात येईल की बऱ्याचदा तुम्ही त्यांच्याशी कठोरपणे आणि रागीट आवाजात बोलत असता.


आपल्या कुटुंबियांबरोबर देखील तसाच व्यवहार करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो का? विचार करा…


*तुम्ही तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांचा नेहमीच सन्मान करता आणि त्यांना आदराची वागणूक देता.*


 पण ते निघून गेल्यावर त्यांना दूषणे देता, त्यांच्या स्वभावाची, बोलण्याची टिंगल करता!


आपल्या स्वभावातील हा दुटप्पीपणा दुर करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो का? विचार करा…


*बरेचजण, रोज धार्मिक पुस्तकांचं वाचन करतात, कीर्तन ऐकतात, तासनतास पूजा करतात!*

 पण नंतर दिवसभरात इतरांना शिव्या देतात, दूषणे देतात, त्यांचा अपमान करतात!


*हे दुहेरी जीवन जगण्याचा अट्टाहास सोडण्याचा प्रयत्न आपण करू शकतो का? विचार करा…*


आपण इतरांना अडचणीच्या काळात मदत करतो. पण बऱ्याचदा ही मदत, त्या बदल्यात काहीतरी मिळविण्याच्या हेतूने केली जाते, आपण हे सर्व नि:स्वार्थपणे करत असल्याचा आव आणत!


*आयुष्यात प्रत्येक गोष्टीला पैशाचं लेबल न लावण्याचा प्रयत्न आपण करू शकतो का? विचार करा…*


बऱ्याचदा आपण इतरांना पुष्कळ गोष्टींत सल्ले देत असतो  एखाद्या विशिष्ट परिस्थितीत कसे वागावे, याचे! पण जेव्हा तीच पाळी आपल्यावर येते, तेव्हा मात्र आपण नेमकं यांच्या विपरीत वागतो!


"लोका देती ब्रम्हज्ञान, आपण कोरडे पाषाण" ही उक्ती स्वतःला लागू न करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो का? विचार करा…


*जेव्हा तुम्हाला इतरांची मते आवडत नाहीत, तेव्हा तुम्ही त्यांचा द्वेष करता, त्यांची विचारसरणी बदलण्याचा प्रयत्न करता!*


इतरांनाही आपल्या सारखीच स्वतंत्र मते असू शकतात हे उमजून घेण्याचा प्रयत्न आपण करू शकतो का? विचार करा…


एखाद्याच्या केवळ बाह्य व्यक्तिमत्वावरून आपण त्याला जोखतो, स्वतःला त्याच्यापेक्षा मोठे समजू लागतो, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो.


*"जे दिसतं, तितकंच नसतं" हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण करू शकतो का? विचार करा…*


आपण सर्वच ज्ञानाच्या मार्गावर मार्गक्रमणा करत आहोत. म्हटलं तर आयुष्य खूप मोठं आहे आणि इतका मोठा रस्ता पार करताना थोडेबहुत अडथळे तर येणारच! पण जर हे अडथळे अंतर्गत अथवा मानसिक असतील, तर ते सोडविण्यासाठी माझ्या इतका सक्षम माणूस दुसरा कोणीच नसेल!

🙂🙏🏻🙂

➖➖🙏🏻🌹🌹🙏🏻➖➖