आपण जग सोडून पळालो आहोत, त्याअर्थी जग असार आहे, या जगातले संसारी लोक मूर्ख आहेत आणि आपण शहाणे आहोत, अशी अनेक बोगस संन्याशांची समजूत असते. ही मंडळी हिमालयात कंटाळली की समाजात येऊन डायरेक्ट उद्धाराच्या कार्याला लागतात. समाज आपल्या बोधामृतासाठी ताटकळत बसलेला आहे, अशी त्यांची समजूत असते.

अशाच एका साधुबुवांनी तुरुंगामध्ये प्रवचनं देऊन कैद्यांना सुधारण्याचा चंग बांधला होता. त्यांची प्रवचनं ऐकणं हे सद्वर्तन मानून कैद्यांना त्यांच्या शिक्षेत सूट मिळत असे. त्यामुळे कैदी डुलक्या काढायला का होईना त्यांच्या प्रवचनांना हजेरी लावत. या तुरुंगात एक विकृत खुनी आणि बलात्कारी दरोडेखोरही बंदिवान होता. तो या प्रवचनांना नियमित हजेरी लावायचा. दहाएक वर्षं सतत प्रवचनं ऐकली होती त्याने. त्याची सुटका होण्याचा दिवस आला, तेव्हा साधुमहाराजांनी तुरुंगाधिकाऱ्यांना सांगितलं की मला त्या कैद्याला भेटायचंय.

स्वामी महाराज त्या कैद्याला सुटकेच्या दिवशी भेटले आणि त्यांनी विचारलं, आता तुम्ही सुटका झाल्यावर काय करणार? पुन्हा जुन्याच उद्योगांकडे वळणार की इतर काही करणार?

तो कैदी म्हणाला, नाही. आता मी माझ्या जन्मगावी परत जाणार. तिथे माझी थोडी शेती आहे, घर आहे. तिथे राहणार आणि यापुढे आराम करणार.

साधुबुवांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. आपल्या अखंड प्रवचनधारेने एका दगडाला पाझर फोडला, एका माणसाच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणलं, त्याला सुधारलं या कल्पनेने ते खूष झाले आणि त्याला म्हणाले, तुम्ही मला केवढा आनंद दिलाय याची कल्पना नाही तुम्हाला. माझ्या जीवनाचं सार्थक झालं, माझी सगळी प्रवचनं आज सार्थ सिद्ध झाली. त्यांनी तुम्हाला सन्मार्गावर आणलं.

तो दरोडेखोर फिस्कारून म्हणाला, ओ महाराज, तुमच्या त्या कंटाळवाण्या बडबडीचा याच्याशी काही संबंध नाही. सुधारणा व्हायला मी बिघडलोच कुठे होतो? कुठल्याही धंद्यातला माणूस वय झाल्यावर, हातपाय थकल्यावर रिटायर होतो की नाही? आराम करतो की नाही? मी फक्त रिटायर होतोय… रिटायर.

 एक दिवस बायको सहज म्हणाली “ऐका ना, मी थोडा वेळ मैत्रिणी सोबत बाहेर जातेय.”

मोबाईल बघत बसलेला तीचा पती फक्त वर पाहत म्हणाला, “ठीक आहे. मजा करा.”

ती थोडी चकित झाली. नेहमी नाही म्हणणारा काही गरज ये का , गेलंच पाहिजे का उशीर करू नको—असे काहीतरी सांगायचा . पण त्या दिवशी काहीच नाही — ना सुस्कारा, ना प्रश्न, फक्त शांत “ठीक आहे.”

काही तासांनी त्यांचा किशोरवयीन मुलगा किचनमध्ये आला. हातात एक कागद आणि चेहरा फिक्का.

“बाबा ” तो हळू आवाजात म्हणाला, “माझे मॉक परीक्षेचे निकाल आले… आणि ते खूप वाईट आहेत.”

तो थिजून उभा राहिला, कारण त्याला नेहमीप्रमाणे ओरडा होईल अशी खात्री होती. बापा ला त्याच्या अभ्यासाची खूप काळजी, म्हणून आज पुन्हा ‘वेळ वाया घालवला’, ‘क्षमता वाया घालवत आहेस’ अशी भाषणे ऐकायला मिळतील — अशी त्याची तयारी होती.

पण त्याऐवजी ती शांतपणे म्हणाला , “ठीक आहे.”

तो विस्फारलेल्या डोळ्यांनी म्हणाला, “फक्त… ठीक आहे?”

“हो,” तो प्रेमाने म्हणाला . “जास्त अभ्यास केलास तर पुढच्या वेळी चांगले होईल. नाही केला तर सेमिस्टर रिपीट करावा लागेल. तुझा निर्णय. मी दोन्ही परिस्थितीत तुझ्या पाठीशी आहे.”

तो हैराण झाला. बाबा एवढ शांत कधी पासून झाले.

दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांची मुलगी घाबरतच घरात आली. हॉलमध्ये थोडं थबकून ती म्हणाली, “बाबा … मी… मी कारला धडक दिली. फार मोठं नाही, पण डेंट पडलाय.”

बाबा ना ओरडले, ना रागावल, काहीच नाही. तो फक्त म्हणाला , “ठीक आहे. उद्या गाडी वर्कशॉपमध्ये देऊन टाक.”

मुलगी थिजलीच. “तुम्हाला… राग नाही?”

बाबा ने मंद स्मित केले. “नाही. रागावल्यानं कार परत नीट होणार नाही. पुढच्या वेळी जपून चालव.”

आता घरातील सगळेच चिंतित झाले. हा माणूस — तीच पतो , त्यांचा बाबा — पूर्वीसारखी राहिला नव्हता. तो कधी तापट, पटकन तणावात येणारा , पटकन बोलून जाणारा होता . आता मात्र शांत, स्थिर, अगदी प्रसन्न दिसत होता .

ते एकमेकांत कुजबुजायला लागले — काही बिनसले आहे का? तब्येत बरी नाही का? काही घडले आहे का?

शेवटी त्या संध्याकाळी, सगळ्यांनी त्याला किचनच्या टेबलाजवळ बसवले.

“ऐका ,” बायको म्हणाली , “तूम्ही अलीकडे खूप बदलले आहे. काही होतंय तरी तुम्हाला राग येत नाही, तूम्ही प्रतिक्रिया देत नाही. सगळं ठीक आहे ना?”

तो त्यांच्या चेहऱ्यांकडे पाहत हसला .

“काहीच बिनसलं नाही,” तो म्हणाला . “सगळं अगदी योग्य चाललंय. मला फक्त एक गोष्ट समजली आहे.”

ते सगळे शांत झाले.

“खूप वर्षांनी लक्षात आलं,” तो म्हणाला, “की प्रत्येकजण स्वतःच्या आयुष्यासाठी स्वतःच जबाबदार असतो.”

बायको ने भुवया उंचावल्या. “काय म्हणायचंय तुम्हाला?”

तो हात जोडून म्हणाला , “मी आधी प्रत्येक गोष्टीची चिंता करायचो . तू उशीर केलास तर काळजी, मुलांचे मार्क कमी आले तर अपराधीपणा, काही तुटलं तर राग, कुणी नाराज झालं तर ते ठीक करण्याची धडपड. मी सगळ्यांच्या समस्या माझ्या मानायचो . पण एक दिवस लक्षात आलं — माझ्या काळजीने त्यांची समस्या सुटत नाही. फक्त माझी शांतता नष्ट होते.”

मुलगी शांतपणे ऐकत होती.

तो पुढे म्हणाला , “माझ्या तणावाने तुम्हाला काही फायदा होत नाही. माझी धडपड तुमचं आयुष्य सोपं करत नाही — फक्त माझं कठीण करते. मी तुम्हाला सल्ला देऊ शकतो , प्रेम देऊ शकतो , साथ देऊ शकतो. पण तुमचं आयुष्य मी तुमच्यासाठी जगू शकत नाही. तुम्ही घेतलेल्या निर्णयांचे परिणाम तुम्हालाच भोगावे लागतात — चांगले असोत वा वाईट.”

तो क्षणभर थांबला आणि पुन्हा हसला. “म्हणून मी ठरवलं — जे माझ्या नियंत्रणात नाही ते नियंत्रित करण्याचा प्रयत्नच करणार नाही.”

मुलगा पुढे झुकत विचारला, “म्हणजे… तुम्हाला आमच्याबद्दल काहीच वाटत नाही?”

तो म्हणाला, “अगदी वाटतं. पण चिंता करणे आणि नियंत्रण ठेवणे यात फरक असतो. मी तुमच्यावर माया करू शकतो,तुम्हाला पैसे पुरवू शकतो पण त्यासाठी माझी शांतता हरवू नये.”

घरात शांतता पसरली.

ती तिघांकडे प्रेमाने पाहत म्हणाली, “माझं काम — तुम्हांला प्रेम देणं, तुम्हाला काय हवं नको ते देण,मार्गदर्शन करणं, आणि गरज पडली की तुमच्या पाठीशी उभं राहणं. पण तुमचं काम — स्वतःचं आयुष्य स्वतः हाताळणं. निर्णय घेणं. त्यांचे परिणाम भोगणं. तसंच प्रत्येकजण मोठा होतो.”

तो शांतपणे म्हणाला , “म्हणून आता काही चुकीचं झालं तरी मी स्वतःला आठवण देतो — हे माझं दुरुस्त करण्यासारखं नाही. मी शांत राहीन. तुम्ही यातून शिकाल यावर विश्वास ठेवेन. कारण जीवन असंच असतं — धडे शिकवंत.”

थोडा वेळ घरात संपूर्ण शांतता होती. वातावरण मात्र बदललं होतं.

बायको ने त्याचा हात हातात घेत म्हणाली , “तूम्ही आज आम्हा सगळ्यांना काहीतरी शिकवलं.”

तो हसला. “कदाचित. पण हे मला स्वतःलाच आधी शिकावं लागलं.”

त्या रात्री सगळ्यांनी त्याच्या शब्दांवर विचार केला.

मुलगा पुन्हा अभ्यासाला बसला — बाप ओरडला म्हणून नाही, पण जबाबदारी त्याची आहे हे त्याला जाणवलं म्हणून. मुलीने स्वतःच कारची दुरुस्ती ठरवली आणि इन्शुरन्सची प्रक्रिया समजून घेतली. बायको घरातील सगळं वेळेत आवरून ठेवू लागली — कारण तो सक्ती करत होता म्हणून नाही, तर तिला तसं करावंसं वाटलं म्हणून.

आणि हळूहळू घर हलकं वाटू लागलं.

कोणीही भीतीने नाही तर समजुतीने वागू लागले. कोणीही कशावर ओरडा होईल या कल्पनेने दडपून राहत नव्हते.

कारण घरातला एक जरी माणूस शांतता स्वीकारतो, तर ती शांतता सगळ्यांत पसरत जाते.

एक जण नियंत्रण सोडतो, आणि बाकी लोक स्वतःला नियंत्रित करायला शिकतात.

आणि अशा प्रकारे — शांतता प्रेमा सारखी पसरते.

कुणावरही रागावून दडपण टाकून हक्क गाजवून समोरच्या ना नियंत्रित करू नका 

त्यापेक्षा आपण आपल्या जबाबदारीने वागून समोरच्याला त्यांच्या जबाबदारी ची जाणीव करून दया.

 तो पुण्यात नवा होता.😊

रोज त्या ठरलेल्या रस्त्याने जायचा.🛣️

एक आजीबाई रस्त्यावर वडापावाची गाडी चालवायच्या. या वयात त्यांना काम करताना पाहून त्याला आईची आठवण यायची. १५ रुपयांचा वडापाव होता. तो रोज त्यांच्यासमोर १५ रुपये सुटे ठेवायचा आणि जंक फूड खायचं नसल्याने वडापाव न घेताच निघून जायचा. 🚶

असं महिनाभर चाललं. 

एक दिवस त्याने १५ रुपये ठेवले आणि पुढे निघायच्या आत त्या आज्जीने त्याचा हात धरून त्याला थांबवलं… तो म्हणाला, मी रोज १५ रुपये ठेवतो आणि वडापाव न घेताच निघून जातो, असं का करतो, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना?🤔

आजीबाई खरखरीत आवाजात म्हणाल्या, नाही. मी तुला हे सांगायला थांबवलंय की गेल्या आठवड्यापासूनच वडापावाची किंमत २० रुपये झाली आहे!!!🫣

सत्ता नामक आगीमधले सरपण कॉमन मॅन असे 
त्यांना मेले जाळत जाणे एकमेव हा प्लॅन असे 

सजग नागरिक नको तयांना फक्त खुळेसे फॅन हवे

सुई विवेकाची न टोचता श्रवणभक्तीचे कान हवे

सत्य मांडता राष्ट्रद्रोह, प्रक्षोभ म्हणा ही रीत नवी
धर्म सांगता लोभ, मोह, अन कामोत्सुकही संतपदी
फक्त रचावे सुबक सापळे आणि गाळे ते घोटावे
रेषेवरचे गरीब सकाळ ते आणिक खाली लोटावे
पुस्तक केवळ बदला बाकी शिक्षण शिमगा घालावा नि दर्जावरती प्रश्न उठवता नुसत्या बोंबा ठोकाव्या
परंपरा नि वैविध्याची कवने जगभर मिरवावी 
झुंडी जमवून तीच विविधता वेशीबाहेर टांगावी
बडे थोरले बिजनेस बापे कर्जमुक्ती सुख ओरपती 
धरणे बांधून घर बुडलेले विस्थापित ते झोडपती
दरी ही ताणून वाढवती 
खुळी स्वप्नं ते दाखवती 
आपली भाकरी शेकवती
महागाईचा जाब मागता माना तितक्या वळविती
विकास कुजका विश्वगुरुपद फुटके सगळे स्तोम असे 
नेत्यावरती जीव जडवणे सिंड्रोम हा स्टॉकहोम असे
x

 अमेरिकन प्रेसिडेंट रुझवेल्टच्या बापाबद्दल बोलताना एका लेखकाने लिहिले आहे- ‘‘हा रुझवेल्टचा बाप मोठेपणासाठी फार हापापलेला होता. प्रत्येक ठिकाणी आपण महत्त्वाच्या ठिकाणी असावं, केंद्रस्थानी असावं असं त्याला वाटायचं. उद्या एखादी प्रेतयात्रा निघाली तरी त्यातलं प्रेत आपणच असावं, असं याला वाटलं."

 एका थापाड्याने कडी केली. एकदा तो लोकांना म्हणाला, ‘‘अरे, कुत्री-मांजरं काय पाळता? माणसानं काहीतरी निराळं करण्यात गंमत.’’ एकाने विचारले ‘‘असं? तुम्ही काय पाळलं आहे?’’

‘‘मी एक मासा पाळला होता-’’ तो फुशारकीने बोलला, ‘‘त्या माशाला मी चांगला मोठा केला. पाण्याशिवाय राहायला त्याला शिकवलं. मी कुठंही निघालो की तो मासा टुणटुण उड्या मारीत माझ्या पाठीमागून चालत यायचा!’’

‘‘असं?’’ सर्वांना आश्चर्य वाटलं. कुणीतरी पृच्छा केली.

‘‘मग तो मासा अलीकडं दिसला नाही तुमच्या मागून येताना?’’

अत्यंत दु:खी चेहरा करून ते सद्गृहस्थ बोलले, ‘‘दुर्दैव माझं. दुसरं काय?’’

‘‘काय झालं?’’

‘‘परवा मी एका नदीच्या पुलावरून चाललो होतो. तो मासाही टुणटुण करीत माझ्या मागून उड्या मारीत येत होता. पावसाळ्याचे दिवस. एकदम त्याचा पाय घसरला अन् तो खाली नदीत पडला आणि बुडून मेला!...’

आयरिश आणि स्कॉटिश माणसं अत्यंत चिक्कू आणि बिनडोक म्हणून प्रसिद्ध आहेत. एकदा एक स्कॉटिश तरुण एका ओळखीच्या माणसाला अचानक स्वित्झर्लंडमध्ये भेटला. ते गृहस्थ आश्चर्याने त्या तरुणाला म्हणाले, ‘‘अरे, तू इकडं स्वित्झर्लंडमध्ये कसा?’’

‘‘म्हणजे काय?’’ तो तरुण त्यांच्या अज्ञानाची कीव करीत म्हणाला, ‘‘माझे परवाच लग्न नाही का झालं? हनीमूनसाठी म्हणून स्वित्झर्लंडमध्ये आलोय.’’

‘‘हनीमूनसाठी?’’ त्या ओळखीच्या गृहस्थाने इकडेतिकडे शोधक दृष्टीने पाहिले-‘‘पण तुझी बायको तर कुठं दिसत नाही मला!’’

‘‘तिनं स्वित्झर्लंड पूर्वी पाहिलंय-’’ तो स्कॉटिश तरुण म्हणाला, ‘‘मग पुन्हा खर्च कशाला? म्हणून मी एकटाच हनीमूनसाठी इथं आलो!’’