पुर्वी दुकानात लिहलेले असायचे
*ग्राहक देवता आहे*
*तेव्हा देव असल्याचे फिलींग यायचे.* 😇
आता लिहलेले असते
*'तुमच्यावर कँमेऱ्याची नजर आहे '* 😉
*आता चोर असल्याचे फिलींग येते.* 🫣
*रिश्ता वही, सोच नयी ...* 😃
🤣😂🤣😂😊
*😁 खळखळून हसा - "व. पु. ...एक विनोदी कविता..."* 😁
लग्नापूर्वीचे तें गुलाबी दिवस
लग्नानंतर मात्र राहत नाही,
एकदा लग्न लावून दिलं की
देवसुद्धा खाली पाहत नाही. 🤗
मग लग्नापूर्वीचा तो हुशार नवरा,
तिला भलताच चक्रम वाटायला लागतो.. 😉
आणि हळुहळू तिच्या चेह-यावरचा
प्रेमळ मुखवटा फाटायला लागतो.
आपला नवरा बैल आहे,
असं प्रत्येक बाईला वाटत असतं..
त्याच्या त-हेवाईक वागण्याचं दुःख
तिच्या मनात दाटत असतं 🙃
त्याचा तो गबाळा अवतार..
तिला नीट्नेटकं राहयचं असतं.
तिला चार दिवस सासूचे.. 😊
तर त्याला स्पोर्ट्स चॅनल पाहायचं असतं.
लहान मोठ्या चाकाचा हा संसाराचा रथ
पळत कसला, रांगत असतो,
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गात बांधत असतो. 😜
ती थोडी तरी त्याच्यासारखी वागेल,
असं प्रत्यक्षात घडत नाही. 😃
त्याच्या स्वप्नाचे पंख लावून,
ती त्याच्या आकाशात उडत नाही.
तो गच्चीत तिला घेऊन जातो,
इंद्रधनुष्यावर चालायला..
ती सोबत पापड कुरड़या घेते,
गच्चीत वाळत घालायला.😀
त्याच्या डोळ्यात क्षितिजावरची
लखलखती शुक्राची चांदणी असते,
हिच्या डोक्यात गोडा मसाला
आणि वर्षभराची भाजणी असते.😄
आपली बायको म्हैस आहे,
असं हा रेडा सगळ्यांना सांगत बसतो 😃
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गात बांधत असतो.
*-व. पु. काळे*
😃
एक जोडपं २५ वर्षात कधीच भांडलं नाही!
एका मित्रानं विचारल- तुला हे कस काय शक्य झालं ??
नवरा-
आम्ही नवीन नवीन लग्न झाले त्यावेळेस शिमल्याला हनिमूनला गेलो होतो.
तिथे घोडेस्वारी करताना माझी बायको
ज्या घोड्यावर बसलेली त्या घोड्याने
उडी मारुन बायकोला खाली पाडली..🤨
ती उठली व परत घोड्यावर बसली अन त्याला म्हणाली ;
"हे तुझ पहिल्यांदा झालं",
थोडावेळाने पुन्हा तेच घडल. ती परत बोलली "
हे तुझ दुस-यांदा झालं"
आणि जेव्हा तेच तिसऱ्यांदा घडलं तेव्हा
तिने सरळ त्या घोड्याला दरीत ढकलून दिलं.🤨🐎
मी ओरडलो,
" ए बावळट, ! .....। तू घोड्याला मारलस ? पागल! "😡
तेव्हा ती मला रागात बोलली
"हे तुझ पहिल्यांदा झालं".🫣
आणि तेव्हापासुन भांडण तर दूरच ...
साधा वाद पण नाय केला कधी .. 😉
आम्ही अगदी आनंदी संसार करतो !!!🥰
🤣😂🤣😂😊