विनोदी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विनोदी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
हॅल्लो….. !!
मुलगी - हॅल्लो…. हॅल्लो…
मम्मी - हां हॅल्लो…
मुलगी - हॅल्लो, मम्मी मी बोलतेय.
मम्मी - अग बोल आणि आवाजाला काय झालय तुझ्या ?
मुलगी - बसलाय.
मम्मी - कशाने गं ?
मुलगी - आईसक्रिम
मम्मी - मग काही घेतलस की नाही ?
मुलगी - घेतलं ना. दुसरं आईसक्रिम.. म्हटलं काट्यानेच काटा काढावा.
मम्मी - सुपीक आहेस हो, आज अचानक कसा काय फोन केलास ?
मुलगी - अग, ‘करेन करेन‘ म्हणत होते. जमलच नाही. तसं आताच कळलय यापुढे आमचं बिल कंपनी भरणार म्हणून. तसा केला फोन.
मम्मी - खरच की काय ?
मुलगी - मग. हवं तेवढं बोलू. फुल्ल टॉकटाईम आहे.
मम्मी - बरं, तू कशी आहेस ?
मुलगी - कशी काय ? तशीच आहे. पाच फुट दोन इंच, रंग गोरा…
मम्मी - अग कशी म्हणजे … मजेत आहेस ना ?
मुलगी - अगदी मजेत.
मम्मी - आणि जावयबापू काय म्हणताहेत ?
मुलगी - कुठे काय म्हणतोय तो ? घरात असला तर म्हणेल ना ?
मम्मी - देवा, तुझी सेकंड लेंग्वेज निदान मराठी घ्यायला हवी होती. कसे आहेत जावयबापू ? मजेत आहेत ना ?
मुलगी - काय माहीत. असेल कदाचित. त्याचा ना एक प्रोब्लेमच झालाय.
मम्मी - काय ग, काय झालं ?
मुलगी - कसं सांगू ? लाज वाटते बघ सांगायला.
मम्मी - अरे देवा, अस झालय तरी काय ?
मुलगी - अग त्याला ना…… अ‍ॅसिडीटी झालीय.
मम्मी - अ‍ॅसिडीटी ?
मुलगी - हो ना…. त्याला हा प्रोब्लेम छोटाच वाटतो पण मला किती मोठा प्रोब्लेम होतो म्हणून सांगू ?
मम्मी - तुला कसला ग प्रोब्लेम ?
मुलगी - अगं, हा कायम पोट धरून आणि मी नाक धरून.
मम्मी - पण अचानक अ‍ॅसिडीटी कशी काय झालीय ?
मुलगी - काही नाही ग. हा सगळा बाहेरख्यालीपणाचा परिणाम
मम्मी - अग, काय बोलतेस काय तू ?
मुलगी - खरं तेच सांगतेय.
मम्मी - इतक्या कॅज्युअली कसं काय बोलू शकतेस ?
मुलगी - आता जे आहे ते आहे. सांगायला लाज कसली ?
मम्मी - म्हणजे तुला त्याचा हा बाहेरख्यालीपणा चालतो ?
मुलगी - नाईलाज आहे ग माझा. मी तरी काय करू ? मला नाही जमत.. सकाळी सकाळी उठायला… डबा बनवायला..
मम्मी - आता हा डबा कुठे आला मध्येच ?
मुलगी - अग, मी जेवणाचा डबा बनवून देत नाही म्हणून तर तो…
मम्मी - तुला हे बोलवतं तरी कसं ? एवढ्याश्या कारणांमुळे तो दुसर्‍या बायकांकडे जातो आणि तू…
मुलगी - अग मीच सांगितल त्याला. जा म्हणून.
मम्मी - तू ?
मुलगी - घरगुती जेवण असतं त्या बायकांकडे. पण याला काही स्वतःची अक्कल आहे की नाही ? रोज रोज ती करी, बिरयाणी कशाला खायची ? असलं चमचमीत खाल्ल्यावर होणारच ना अ‍ॅसिडीटी.
मम्मी - तू काय बोलतेयस हेच मला कळत नाही.
मुलगी - अग, असं उठसुठ बाहेर खाल्ल तर मग दुसरं काय होणार ?
मम्मी - याला तू बाहेरख्यालीपणा म्हणतेस ?
मुलगी - असं काय करतेस ? तुझं मराठी एकदम विक झालय बघ. बाहेर खाण्याला हाच शब्द आहे मराठीत.
मम्मी - कळलं तुझ ज्ञान. एक काम कर, रोज त्याला दुध देत जा.
मुलगी - चल…. काहीतरीच काय ? दुध प्यायला तो काय कुक्कुलं बाळ आहे ?
मम्मी - अगं, माझ्या बाये, थंड दुध देत जा. त्याने अ‍ॅसिडीटी कमी होईल. अजून काही प्रोब्लेम नाही ना ?
मुलगी - नाही कसा ? हल्ली फारच आंबटशौकीन झालय तो.
मम्मी - अरे देवा, हे आता काय नवीन ?
मुलगी - हो ना. परवा कैर्‍या घेऊन आला, काल आवळे आणि आज लिंबू आणणार आहे म्हणे. लोणचं कर म्हणतो ? मला कुठे येतय ते ?आंबटशौकीन कुठचा !
मम्मी - माझ्याकडे पाठव.
मुलगी - त्याला ?
मम्मी - गधडे, कैर्‍या, आवळे माझ्याकडे पाठव. मी देईन लोणचं बनवून.
मुलगी - तुला कुठे येतं लोणचं बनवायला ? आपल्याकडे तर जेवणसुद्धा बाबाच बनवतात. लोणचं बनवायला शिकले की काय ते ?
मम्मी - बाबा ? अग तुझे बाबा जाऊन चार वर्षे झाली ? विसरलीस की काय ? तू मधूराच बोलतेयस ना ?
मुलगी - नाही. मी माधूरी…. अय्या, राँग नंबर लागला वाटतं. सॉरी हें… मधुराच्या मम्मी..
परवा पुराण-प्रसिद्ध पखवाज पंडित पुरोहित पंतांची पिवळी पगडी पुरंदरच्या पंधराशेव्या
पायरीवरून पुण्यात पर्वतीच्या पाचव्या पायरीपाशी पर्णकुटीपासून पंधरा पावलांवर पहुडलेल्या
पंकजच्या पोटावर पटकन पडली. पगडी पडलेली पाहताच पंत पुरंदरच्या पायथ्याशी पोलिसठाण्यात
पळाले. पुरंदरच्या पोलिसांनी पंतांना पुण्याच्या पोलिसांकडे पाठवले.

पंत पुण्यात पोहोचताच पोलिसांवर पेटले. पंत पेटल्यामुळे पोलिस पटकन पर्वतीकडे पळाले. पांढर्‍या
पोषाखातल्या पोलिसांना पाहून पंकज पर्वतीच्या पलिकडे पळाला. पोलिसांनी पंकजचा पिच्छा
पुरवला.

पळता पळता पंकज पाण्याच्या पाँडमध्ये पडला. पंतांनीच पाण्यात पोहून पंकजला पकडले. पिवळी
पगडी पण पकडली. पोलिसांनी पंकजला पोलिसठाण्याकडे पिटाळले. पकडणारा पोलिस पदपथावर
पाय पसरून पडला. पोलिस पडलेला पाहून पंकज पाठीवर पांघरूण पांघरून पळाला.

पंतांनी पुरंदरला पोहोचताच पगडीत पंकजचे पैशांचे पाकिट पाहिले. पाकिटातले पुष्कळ पैसे पंतांनी
पनवेलला पुत्राला पोस्टाने पाठवले. पंतांच्या पाजी पुत्राने पैशांच्या प्राप्तीतून पोटात पंजाबी
पदार्थ पचवले.

पंतांना परमेश्वरच पावला!
पंकजला पकडण्यासाठी पंतांसोबत पुण्यात पोहोचलेली पंतांची पोरगी प्राची पंकजला पहिल्यांदा
पाहताच पंकजच्या प्रेमात पडली. प्राचीने पंकज, पोलिसांची पकडा पकडी पाहिली. पंकजचा
पदपथावरून पोबाराही पाहिला. पानशेतच्या पुराच्या पाण्यामुळे पुनर्वसित पंकज परत पर्णकुटीत
पोहोचला.

पित्यासमवेत प्राची पुरंदरला परतली, पण पंतांनी पंकजच्या पाकिटातल्या पैशांबाबत पंक्ति-प्रपंच
पाळला. पुष्कळ पैसे पुत्राला पाठवले. पंतांच्या पुन्हा पुन्हा पिडणार्‍या पुराणांच्या पोपटपंचीमुळे
प्राची पेटली.

पंकजच्या प्रेमाखातर प्राची पुण्यास परतली. प्राचीनेच पंकजवरच्या पोलिसांच्या पंचनाम्याला
पाने पुसली. पंकजला पहायला प्राची परत पर्णकुटीपाशी पोहोचली. पण पर्णकुटीत पहुडलेल्या
पंकजचे पाय पळून पळून पांढरे पडलेले! प्राचीने पंकजच्या पायावर पिवळे पुरळही पाहिले.

पंकजची परिस्थिती पाहून प्राण पिळवटलेल्या प्राचीने पदर पाण्यात पिळून पंकजचे पाय पुसले.
प्राचीचा प्रथमोपचार पाहून पंकजला पोरगी पसंत पडली. पंकजने प्राचीला पर्णकुटीतच पटवले.

पर्णकुटीतील प्रेम-प्रकरण पाहून पर्णकुटीच्या पायर्‍यांवर पत्ते पिसणारी पोरे पूर्व-पश्चिमेला
पांगली. प्राचीने पंकजचे पाकिट पैशांविनाच परतवले. परंतू प्रेमात पारंगत पंकजने प्राचीस पाच
पाप्या परतवल्या.

पंतांना परमेश्वर पावला, पण पंकजला पंतांची पायाळू पोर पावली.
केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर
कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत
कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये '
कजरारे-कजरारे' कवितेवर कोळीनृत्य केले.
काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे
कुळकुळीत केस कात्रीने कराकरा कापले. काका काय करताहेत काकूंना कळेनाच! काकूंनी कर्कश्श
किंचाळून कलकलाट केला.
काका काकूंची कसली काळजी करणार! काकांना कामाची काळजी. काकूंच्या कर्णकर्कश्श
कोलाहलातही, केशवाने कचऱ्यात कोंबलेले कागदाचे कपटेन कपटे काढून काकांनी कचेरीकडे कूच केले.
कचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर कसली. कागदाच्या कापलेल्या कपट्यांचे काकांनी 'कोलाज'
करून कामकाज कार्यान्वयित केले. केशवाचे कारनामे कळताच काकांनी काट्यानेच काटा काढला.
काकांनी केशवालाच कोलाजचे काम करण्यासाठी कुथवला. कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा
कांगावा करून कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे केशवाला कामावरून काढले.
कासावीस काकूंनी कालच्या कडू कारल्याची कोशिंबीर कटाप करून काकांसाठी कच्च्या कैरीचे कोय
काढून कालवण केले. काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले.
केळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच. कर्तव्यदक्ष काकांच्या
कार्यकाळात कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्तिशिखर काबीज केले.
कामावरून काढलेल्या केशवाने कितीतरी काबाडकष्ट काढल्यावर कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर
कॉलेजने केशवाला कबड्डीचा कर्णधार केला. क्रिडापटू केशवाने कबड्डीतच करियर केले. कालच्या
कागाळीखोर केशवाला काळानेच केला 'कबड्डीतल्या किचकट कसरतींचा कर्ता'!

कथासार:-
क्रियेविण करिता कथन, किंवा कोरडेची कीर्तन,
कितीक किताब कष्टाविण, काय कामाचे

ती माझी जन्मसाथी

माझा जन्म झाल्यापासुन तीचे आणि माझे नाते आहे.मी निराश असलो की तिच्या डोळ्यातुन अश्रु येतात आणि मी जेव्हा हसतो तेव्हा तीच्या गालावरच्या खळ्या मला वेडावतात.दुखाःच्या उन्हात ती अधिकच गडद होत जाते आणि सुखाच्या वर्षावात ती माझ्याबरोबर चिंब भिजते.मी तीचा श्वास आहे आणि मीच तीचा आत्मा.मी तिला कधीच काही सांगत नाही तरिही ती सर्व जाणुन असते.रोज मी तिला पायदळी तुडवतो पण तीचे प्रेम आटत नाही.माझ्याशिवाय तीचे विश्व नाही ती पुर्णपणे मला समर्पित आहे.मी ज्यादिवशी अलविदा घेईल तेव्हा तीही या जगाचा माझ्याबरोबर निरोप घेईल.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

ती माझी सावली आहे !
तो- काय खाऊ या?

ती- काहीही चालेल.

तो- पावभाजी आणि व्हेज पुलाव खाऊ या?

ती- शी केव्हढी ऑईली असते. मला पिंपल्स
येतात.

तो- मग काहीतरी नॉन्-व्हेज?

ती- कालच खाल्लंय ना?

तो- मग नुस्तंच चहा-ब्रेड सँडविच?

ती- मला इथं मरणाची भूक लागलीये, अन तू

मला चहा-ब्रेड देणार?
तो- मग तूच सांग काय खायचं?

ती- काहीही चालेल..!!

तो- मग आता आपण काय करू या?

ती- काहीही. तुच ठरव.

तो- पिक्चर बघू या मस्त? बरेच दिवस झलेत?

ती- नको. वेस्ट ऑफ टाईम!

तो- मग बागेत चल, बॅडमिंटन खेळू या.

ती- डोकं फिरलंय का? बाहेर ऊन बघ किती ते..

तो- मग कॉफीशॉपमध्ये तरी जाऊ या.

ती- नको. पुर्ण दिवस झोप येत नाही कॉफी प्याल्यावर.

तो- मग तुच सांग, काय करू या?

ती- काहीही. तुच ठरव..!! ..

तो- जाऊ दे. सरळ घरीच जाऊ या झालं.

ती- काहीही. तुच ठरव.

तो- बसनं जाऊ या?

ती- शी केवढी गर्दी. अन कसकसले वास येतात त्या बसमध्ये.

तो- ठीके. टॅक्सीने जाऊ या मग.

ती- पैसे जास्त झालेत का?
एवढ्याशा अंतरासाठी टॅक्सी?

तो- ठीक. चल मग, चालतच जाऊ.

ती- किती दुष्ट तु?
रिकाम्या पोटी मला चालायला लावतोस?

तो- ठीक. मग आधी जेवू या?

ती- व्हाटेव्हर!

तो- काय खाऊ या?

ती- तुच ठरव.
(या मुली पण ना खरच @!#$@#!)

काही मजेशीर व्याख्या


अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका
मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखीहोतो
शेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो
सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा
वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे
लेखक - चार पानात लिहून संपणाऱ्यागोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा
फॅशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका
पासबुक - जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव
गॅलरी - मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा
लेखणी - एकाच वेळी असंख्य लोकांचागळा कापण्याचे साधन
छत्री - एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ
कॉलेज - शाळा आणि लग्न यामधील काळ घालवण्याचे मुलींचे एक साधन
परीक्षा - ज्ञान तपासून घेण्याचे एक 'हातयंत्र'
परीक्षा - पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ
विश्वशांती - दोन महायुद्धांच्यामधला काळ
दाढी - 'कुरुपपणा' लपवण्याचे' रुबाबदार' साधन
थाप - आजकाल १००% लोक हि फुकटात एकमेकांना देतात
काटकसर - कंजूषपणाचे एक 'गोंडस' नाव
नृत्य - पद्धतशीरपणे लाथा झाडण्याची कला
घोरणे - नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचाबदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी
मन - नेहमी चोरीस जाणारी वस्तू
ब्रह्मचर्य - कुठेच न जुळल्याने स्वीकारायचा मार्ग
विवाहित माणूस - जन्मठेपेचा कैदी
विधुर - जन्मठेपेतून सूट मिळालेला कैदी
श्रीमंत नवरा - चालतं बोलतं ATM कार्ड
श्रीमंत बायको - अचानक लागलेली लॉटरी
IT वाला - सतत काहीतरी काम करण्याचे सोंग करणारा इसम
IT वाली - श्रीमंत नवरा मिळावा म्हणून स्पेशल ट्रेनिंग घेतलेली स्त्री
बुद्धिवादी - ज्याच्या बुद्धीविषयी चारचौघात वाद आहे असा
स्कार्फ - बॉयफ्रेंड बरोबर बाईक वरून फिरताना कोणी ओळखू नये म्हणून थोबाड लपवायचे मुलींचे एकसाधन
चुंबन - रेशनकार्डाशिवाय मिळणारीसाखर
लग्नाचा हॉल - दोन जिवांच वेल्डिंग करणारा कारखाना

नारदाचा वारस

नारद मेला; मी रडलो मग;
कोण कळी त्या लाविल नाहक!
शोक कशाला? वदला ईश्वर,
धाडुनि दिधला मी संपादक!

कवी - विंदा करंदीकर