सरदार विनोद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सरदार विनोद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सरदारजी आणि जिन

एकदा सरदारजीने आपल्या घरी अडगळीत पडलेला दिवा स्वच्छ करण्यासाठी घासला आणि काय आश्चर्य त्यातून एक जिन अवतरीत झाला.

'' सरदारजी माग तुला जे पाहिजे ते माग... पण लक्षात ठेव तू फक्त तिन गोष्टी मागू शकतोस... '' तो जिन म्हणाला.

सरदारजीने पहली गोष्ट मागीतली - '' मला खुप श्रीमंत व्हायचे आहे''

एका क्षणात सरदारजी गडगंज श्रीमंत झाला.

सरदारजीने दूसरी गोष्ट मागितली '' मला या सरदारजी नावाची फार चिड आहे मी अमेरीकन बनू इच्छीतो ''

एका क्षणात सरदारचा अमेरीकन झाला.

अमेरीकन झालेल्या सरदारजीने आता तिसरी आणि शेवटची गोष्ट मागितली, '' मी पुढेही असंच डोकं न लावता पैसे कमावू इच्छीतो''

एका झटक्यात अमेरीकनचा पुन्हा सरदारजी झाला.

सरदारजीच्या इथे चोरी.

एक रेल्वेत काम करणारा सरदारजी पोलिस स्टेशनला गेला.

" इन्सपेक्टर साहेब माझ्या इथे चोरी झालेली आहे... जरा रिपोर्ट तर लिहा'

इन्सपेक्टरने विचारले, "केव्हा झाली चोरी.?''

सरदारजीने उत्तर दिले "1945 ला'

इन्स्पेक्टरने त्याची टिंगल उडवित म्हटले , ' फार लवकर रिपोर्ट करता आहात महाशय '

' मग आपलं कामच फार फास्ट आहे... 1945 ला चोरी झाली आणि बघा आता 2030 झालेत ... 45 मिनटात इथे पोहोचलो''

सरदारजीचं गाढव

एकदा एका सरदारजीचं गाढव हरवलं. दिवसभर त्याने सगळं गाव गाढव शोधण्यासाठी पालथं घातलं पण त्याला काही त्याचं गाढव सापडलं नाही. संध्याकाळी थकून घरी आल्यावर त्याने देवाचे धन्यावाद देवून त्याचे आभार मानले. तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला आश्चर्याने विचारले, '' इकडे आपलं गाढव हरवलं आणि तुम्ही देवाचे आभार का मानता आहात''

'' कारण, ते तरी बरं झालं जेव्हा हरवलं तेव्हा ते गाढव एकटं होतं... त्याच्या पाठीवर मी बसलेलो असतो तर!''

सरदार=> प्रश्न-उत्तरे

प्रश्न - सरदारजीला जर एखाद्या मासळीला मारायचे असेल तर तो तीला कसे मारेल?
उत्तर - पाण्यात डूबवून डूबवून...


प्रश्न - सरदारजीला जर तासन तास व्यस्त ठेवायचे असेल तर तुम्ही काय कराल?
उत्तर - एका कागदावर दोन्हीकडून ' प्लीज टर्न ओव्हर' असं लिहून त्याला वाचायला द्या...

नदीच्या पलिकडे

संताला नदीच्या पलीकडे जायचं होतं पण कसं जावं त्याला काही कळत नव्हतं. तेवढ्यात त्याला नदीच्या पलिकडे बंता दिसला. संताने बंताला जोरात ओरडून विचारले, '' ए बंता... मी नदीच्या पलिकडे कसा येवू?''

बंताने नदीच्या आजुबाजुला चौफेर आपली नजर फिरवली आणि म्हणाला, ''अबे तु तर पलिकडेच आहेस ''
संताने घराचा दरवाजा तोडला आणि तो खांद्यावर घेऊन बाजारात निघाला .

रस्त्यात त्याला एका माणसाने विचारले, दरवाजा विकायला निघालास का?

संता- नाही, मित्रा कुलूप उघडायचे आहे.
४ सरदारांनी मिळून एकदा एक पेट्रोल पंप चालवायला घेतला.
पण एकही ग्राहक फिरकला नाही. का बरे?
.
.
.
... ... .
.
.
.
.
.
कारण पेट्रोलपंप १ल्या मजल्यावर होता!
.
चला, एक अजून...
.
मग त्या चारही जणांनी त्याच मजल्यावर एक रेस्टॉरंट चालवायला घेतलं...
एकही ग्राहक नाही..! का, बरे?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पेट्रोलपंपाची पाटीच हटवली नाही ना!
.
चला, अजून एक...
.
मग त्या चारही जणांनी एक टॅक्सी विकत घेतली. पण एकही प्रवासी मिळाला नाही..!
.
.
का बरे..?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कारण २ सरदार पुढे व २ सरदार मागे बसून प्रवासी मिळतोय का हुडकत होते...
.
चला, अजून एक...
.
टॅक्सीमध्ये काहीतरी बिघाड झाला. चौघांनी खूप धक्का मारला. पण टॅक्सी काही जागची हालेना! असे का बरे?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कारण २ सरदार पुढून मागे व २ सरदार मागून पुढे धक्का मारत होते...

सरदारजिची साइड

एका ट्रफिक पोलीसाने रॉंग साईडने जाणाऱ्या सरदारजीच्या गाडीला थांबविले आणि म्हटले -

'' तुला काही कळतं का? तु कुठे गाडी घेवून चालला होता''

'' नाही ... पण हो जिथेही मी माझी गाडी घेवून चाललो होतो तिकडे काहीतरी खुप मोठी दुर्घटना घडलेली दिसते .. कारण सगळेजण तिकडून गाड्या परत आणित आहेत'' सरदारजीने उत्तर दिले.

बैलगाडी

एकदा एका सरदारजीचा इंटरव्हू होता. इंटरव्हू घेणाऱ्याने सरदारजीला प्रश्न विचारला

इंटरव्हूअर - सरदारजी हे फोर्ड काय आहे?

सरदारजी - फोर्ड ही गाडी आहे.

इंटरव्हूअर - बरं सरदारजी हे ऑक्सफोर्ड काय आहे?

सरदारजी - ऑक्स म्हणजे बैल आणि फोर्ड म्हणजे गाडी. म्हणजे ऑक्सफोर्डचा अर्थ होतो बैलगाडी.

किडनॅपर सरदार

चार सरदारांनी एका छोट्या पोराला किडनॅप केले. पोराला सांगितले, घरी जाऊन आपल्या बापाकडून ५ लाख रुपये बर्‍या बोलाने घेऊन ये, नाहीतर तुला जीवे मारू..!
.
तो मुलगा घरी गेला, आणि त्याच्या बापाने पैसेही दिले... का बरे?????
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कारण बाप पण सरदारच होता ना...