charolya लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
charolya लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
का शोधू मी तुला, हरवलेली नसताना,
भरून येते मन तुला शब्दात पाहताना,
दूर गेल्याचा त्रास आहेच खर जास्त,
पण या वरही विरजण पडते तुझे हास्य स्मरताना!!

क्षणिक मैत्री

कधीतरी तू हि समजून सांग मनाला
मैत्री कधीच क्षणिक नसते,
क्षणिक असतो तो भास अपुल्यांचा
शेवटी,जसे आलो एकले,तसे एकलेच जायचे असते...

आई

दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,
ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,
वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई!
पळून जाण्यासाठी
कधीच नसत हे आयुष
कितीही रडवल नियतीने
आपण मात्र तिला हसून फसवायचं

पूल शब्दांचे

भावनाच असते पुरेशी
समजण्या गुज मनीचे
काहींसाठी मात्र,
बांधावे लागतात पूल या शब्दांचे !!

नियति

कोणासाठी थांबवावं
इतक आयुष्य स्वस्त नसत
झोडपल जरी नियतीने
उठून तिच्यावर धावून जायचं असत !!
तुझ माझ नात
नेहमी अनोळखीच राहिलं
जखम नसलेल्या हृदयाला
या पापण्यांनी रडताना पाहिलं.

खपल्या

ओल्या त्या जखमांवरून
पुन्हा कोणीतरी फुंकर घालेल
मायेने कुरवाळून त्यांना
पुन्हा त्यांवरच्या खपल्या काढेल !

प्रेम

प्रत्येक वेळेस का आवरायचं मनाला
का घाबरायचं दरवेळेस प्रेमाला
प्रेमात माणूस आंधळा होतो हे खरय
पण प्रेमच शिकवत विरहात जगायला !!

बावळ मन

अस कस हे बावळ मन
कितीही मिळाल तरी याच भागात नाही
शोधात बसत प्रेम इकडे तिकडे
सोबतच्या मायेच्या माणसांकडे मात्र हे पाहतच नाही !!

प्रीत

प्रीत हि असली नको मजला
विरह देऊनी ना तू थकला
बघ एकदा त्या तुझ्या वहीमध्ये
गुलाब हि तो आता पुरा कोमेजला !!
भूगोलाच्या मास्तरांना कळेना
मुलांचा इतिहास
अभ्यास न करताही
पोरं कशी होतात पास ?

बायकोच्या माहेरी

बायकोच्या माहेरी सहसा
मी कधी जात नाही
माकडाच्या हाती रेशिम
टोमणा मला आवडत नाही!
तुझ्याशिवाय माझ्या मनात
कोणा मुलीचा विचार असणार नाही
तुझ्याशिवाय तसे मला
फुकटचे कोणी पोसणार नाही!
स्वत:च स्वत:शी लढण
आता रोजचच झालाय
छंद म्हणा, विरंगुळा म्हणा
पण आमच मात्र मस्त चाललंय

एकट्याच आयुष्य

एकट्याचाच असत आयुष्य,
एकट्यानेच ते सजवायचं
एकट्यानेच हसायचं, एकट्यानेच रडायचं,
माणसांच्या गर्दीत, एकट्यानेच ते फुलवायचं.
दैवाची साथ तर मिळेलच
सोबत हवीये आता मैत्रीची
हसणे रडवणे होतच राहील
गरज आहे आता सोज्वळ मैत्रीच्या खांद्याची !

डोळ्यातील पाणी

सहवास संपल्यावर
उरतात त्या फक्त आठवणी
अखेर, साक्षीला उरते
केवळ, डोळ्यातील पाणी !!
सखे तू अशी नेहमी
वेड लाऊन का जातेस
डोळे मिटले कि तू
स्वप्नात येऊन जातेस
तू किनारा गाठलास
तर मी तुझ्याबरोबर आहे
आणि तळाशी गेलास
तर तुझ्या अगोदर आहे

                   - चंद्रकांत गोखले