vinodi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
vinodi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

डोक किर्र करू नको

कधी हे करू नको
कधी ते करू नको
बस झाली राणी आता
डोक किर्र करू नको

कधी म्हणते हे आण
कधी म्हणते ते आण
खिसा फाटतो माझा इथे
बापाच माझ्या नाही दूकान

तुला ते गिफ्ट देण नको
ते रोज लिफ्ट देण नको
बस झाली राणी आता
डोक किर्र करू नको

कधी म्हणते मुलशि डयाम
कधी म्हणते खड़कवासला
माय बाप आहेत माझे
उभा आडवा त्यांनीच पोसला

ते तुझ रुसन नको
रस्त्याच्या कड्याला बसन नको
बस झाली राणी आता
डोक किर्र करू नको

कधी म्हणतेस खोट बोलतोस
कधी म्हणतेस कशाला झेलतोस
भेटायची इच्छा नव्हती तर
कशाला एवढा त्रास घेतोस

बेसिकली आता तूच नको
दूर नको.. जवळ नको..
इथ भेटली तर भेटली
वर पुन्हा भेटू नको
- शशांक प्रतापवार

चॅटिंग करताना सावधान

चिंगी एका अनोळखी व्यक्ती बरोबर चॅटिंग करताणा

चिंगी : हाय हॅण्ड सम

अनोळखी व्यक्ती : हाय,

चिंगी : मस्त प्रो.पिक आहे, छान दिसतोस, एकदम रापचिक,
शर्ट कुठे घेतलास

अनोळखी व्यक्ती : बाजारातून

चिंगी :तू काय करतोस,

अनोळखी व्यक्ती : मी आंध्रा बँकेत काम करतो

चिंगी :हो का,मस्त, माझे बाबा पण त्याच बँकेत काम करतात

अनोळखी व्यक्ती : काय नाव त्यांचे

चिंगी : विजय कावळे

अनोळखी व्यक्ती( विजय कावळे) :

कार्टे, क्लासला जातेस म्हणून गेलिस ना ?
इथे काय करतेय, घरी ये, बघतोच तुझ्याकडे

शेअर बाजार !!

एकदा एका गावात एक माणुस आला. त्याने गावकर्यांना सांगितले की त्याला माकडे पकडायची आहेत. प्रत्येक माकडामागे तो गावकर्यांना दहा रुपये देईल. गावकरी खुश झाले व जवळच्या जंगलात जाउन माकडे पकडायला लागले... माकडे पकडायला गावकर्यामधे स्पर्धाच लागली. प्रत्येक जण माकडे पकडायचा व तो माणुस त्यांना माकडामागे दहा रुपये द्यायचा. ... काही दिवसांनी माकडे कमी सापडू लागली तेंव्हा त्या माणसाने गावकर्यांना सांगीतले तो आता माकडामागे वीस रुपये देईल. गावकर्यांनी बाजुच्या जंगलातुन माकडे आणली व माकडामागे वीस रुपये वसुल केलेत. काही दिवसांनी त्याने माकडामागे तीस रुपये देतो असे सांगीतले व फार थोडे माकड खरेदी केले कारण गावकर्यांना माकडे सापडेनात. आता माकडे पन्नास रुपयाला खरेदी करतो असे सांगून तो वाट बघू लागला. गावकरी त्याला माकडे देऊ शकले नाहीत तेंव्हा तो त्यांना म्हणाला, "मी काही दिवसांत जवळच्या शहरात जाऊन येतो तो पर्यंत माकड सापडल्यास त्याच्या मदतनिसाकडे जमा करावी व तो त्यांचे पैसे देईल.."

माणुस शहरात गेल्यावर त्याचा मदतनिस गावकर्यांना म्हणाला तुम्हाला माकडे सापडत नसल्यास तो जमा झालेले माकड पस्तीस रुपयांना गावकर्यांना देईल व तो माणुस शहरांतुन परत आल्यावर तेच माकडा गावकरी त्याला पन्नास रुपयांना विकू शकतात म्हणजे त्यांना पंधरा रुपयांचा फायदा होईल. गावकर्यांना योजना पटली व त्यांनी शक्य तिथुन पैसे गोळा करुन पस्तीस रुपयांना माकड खरेदी केले. सर्व माकड पस्तीस रूपयांना विकुन मदतनिस शहरात गेला. त्यानंतर गावकर्यांना तो माणुस दिसला नाही व त्याचा मदतनिसही. पण सर्व गावात फक्त माकड दिसु लागले.

असा चालतो शेअर बाजार !!
हॅल्लो….. !!
मुलगी - हॅल्लो…. हॅल्लो…
मम्मी - हां हॅल्लो…
मुलगी - हॅल्लो, मम्मी मी बोलतेय.
मम्मी - अग बोल आणि आवाजाला काय झालय तुझ्या ?
मुलगी - बसलाय.
मम्मी - कशाने गं ?
मुलगी - आईसक्रिम
मम्मी - मग काही घेतलस की नाही ?
मुलगी - घेतलं ना. दुसरं आईसक्रिम.. म्हटलं काट्यानेच काटा काढावा.
मम्मी - सुपीक आहेस हो, आज अचानक कसा काय फोन केलास ?
मुलगी - अग, ‘करेन करेन‘ म्हणत होते. जमलच नाही. तसं आताच कळलय यापुढे आमचं बिल कंपनी भरणार म्हणून. तसा केला फोन.
मम्मी - खरच की काय ?
मुलगी - मग. हवं तेवढं बोलू. फुल्ल टॉकटाईम आहे.
मम्मी - बरं, तू कशी आहेस ?
मुलगी - कशी काय ? तशीच आहे. पाच फुट दोन इंच, रंग गोरा…
मम्मी - अग कशी म्हणजे … मजेत आहेस ना ?
मुलगी - अगदी मजेत.
मम्मी - आणि जावयबापू काय म्हणताहेत ?
मुलगी - कुठे काय म्हणतोय तो ? घरात असला तर म्हणेल ना ?
मम्मी - देवा, तुझी सेकंड लेंग्वेज निदान मराठी घ्यायला हवी होती. कसे आहेत जावयबापू ? मजेत आहेत ना ?
मुलगी - काय माहीत. असेल कदाचित. त्याचा ना एक प्रोब्लेमच झालाय.
मम्मी - काय ग, काय झालं ?
मुलगी - कसं सांगू ? लाज वाटते बघ सांगायला.
मम्मी - अरे देवा, अस झालय तरी काय ?
मुलगी - अग त्याला ना…… अ‍ॅसिडीटी झालीय.
मम्मी - अ‍ॅसिडीटी ?
मुलगी - हो ना…. त्याला हा प्रोब्लेम छोटाच वाटतो पण मला किती मोठा प्रोब्लेम होतो म्हणून सांगू ?
मम्मी - तुला कसला ग प्रोब्लेम ?
मुलगी - अगं, हा कायम पोट धरून आणि मी नाक धरून.
मम्मी - पण अचानक अ‍ॅसिडीटी कशी काय झालीय ?
मुलगी - काही नाही ग. हा सगळा बाहेरख्यालीपणाचा परिणाम
मम्मी - अग, काय बोलतेस काय तू ?
मुलगी - खरं तेच सांगतेय.
मम्मी - इतक्या कॅज्युअली कसं काय बोलू शकतेस ?
मुलगी - आता जे आहे ते आहे. सांगायला लाज कसली ?
मम्मी - म्हणजे तुला त्याचा हा बाहेरख्यालीपणा चालतो ?
मुलगी - नाईलाज आहे ग माझा. मी तरी काय करू ? मला नाही जमत.. सकाळी सकाळी उठायला… डबा बनवायला..
मम्मी - आता हा डबा कुठे आला मध्येच ?
मुलगी - अग, मी जेवणाचा डबा बनवून देत नाही म्हणून तर तो…
मम्मी - तुला हे बोलवतं तरी कसं ? एवढ्याश्या कारणांमुळे तो दुसर्‍या बायकांकडे जातो आणि तू…
मुलगी - अग मीच सांगितल त्याला. जा म्हणून.
मम्मी - तू ?
मुलगी - घरगुती जेवण असतं त्या बायकांकडे. पण याला काही स्वतःची अक्कल आहे की नाही ? रोज रोज ती करी, बिरयाणी कशाला खायची ? असलं चमचमीत खाल्ल्यावर होणारच ना अ‍ॅसिडीटी.
मम्मी - तू काय बोलतेयस हेच मला कळत नाही.
मुलगी - अग, असं उठसुठ बाहेर खाल्ल तर मग दुसरं काय होणार ?
मम्मी - याला तू बाहेरख्यालीपणा म्हणतेस ?
मुलगी - असं काय करतेस ? तुझं मराठी एकदम विक झालय बघ. बाहेर खाण्याला हाच शब्द आहे मराठीत.
मम्मी - कळलं तुझ ज्ञान. एक काम कर, रोज त्याला दुध देत जा.
मुलगी - चल…. काहीतरीच काय ? दुध प्यायला तो काय कुक्कुलं बाळ आहे ?
मम्मी - अगं, माझ्या बाये, थंड दुध देत जा. त्याने अ‍ॅसिडीटी कमी होईल. अजून काही प्रोब्लेम नाही ना ?
मुलगी - नाही कसा ? हल्ली फारच आंबटशौकीन झालय तो.
मम्मी - अरे देवा, हे आता काय नवीन ?
मुलगी - हो ना. परवा कैर्‍या घेऊन आला, काल आवळे आणि आज लिंबू आणणार आहे म्हणे. लोणचं कर म्हणतो ? मला कुठे येतय ते ?आंबटशौकीन कुठचा !
मम्मी - माझ्याकडे पाठव.
मुलगी - त्याला ?
मम्मी - गधडे, कैर्‍या, आवळे माझ्याकडे पाठव. मी देईन लोणचं बनवून.
मुलगी - तुला कुठे येतं लोणचं बनवायला ? आपल्याकडे तर जेवणसुद्धा बाबाच बनवतात. लोणचं बनवायला शिकले की काय ते ?
मम्मी - बाबा ? अग तुझे बाबा जाऊन चार वर्षे झाली ? विसरलीस की काय ? तू मधूराच बोलतेयस ना ?
मुलगी - नाही. मी माधूरी…. अय्या, राँग नंबर लागला वाटतं. सॉरी हें… मधुराच्या मम्मी..
परवा पुराण-प्रसिद्ध पखवाज पंडित पुरोहित पंतांची पिवळी पगडी पुरंदरच्या पंधराशेव्या
पायरीवरून पुण्यात पर्वतीच्या पाचव्या पायरीपाशी पर्णकुटीपासून पंधरा पावलांवर पहुडलेल्या
पंकजच्या पोटावर पटकन पडली. पगडी पडलेली पाहताच पंत पुरंदरच्या पायथ्याशी पोलिसठाण्यात
पळाले. पुरंदरच्या पोलिसांनी पंतांना पुण्याच्या पोलिसांकडे पाठवले.

पंत पुण्यात पोहोचताच पोलिसांवर पेटले. पंत पेटल्यामुळे पोलिस पटकन पर्वतीकडे पळाले. पांढर्‍या
पोषाखातल्या पोलिसांना पाहून पंकज पर्वतीच्या पलिकडे पळाला. पोलिसांनी पंकजचा पिच्छा
पुरवला.

पळता पळता पंकज पाण्याच्या पाँडमध्ये पडला. पंतांनीच पाण्यात पोहून पंकजला पकडले. पिवळी
पगडी पण पकडली. पोलिसांनी पंकजला पोलिसठाण्याकडे पिटाळले. पकडणारा पोलिस पदपथावर
पाय पसरून पडला. पोलिस पडलेला पाहून पंकज पाठीवर पांघरूण पांघरून पळाला.

पंतांनी पुरंदरला पोहोचताच पगडीत पंकजचे पैशांचे पाकिट पाहिले. पाकिटातले पुष्कळ पैसे पंतांनी
पनवेलला पुत्राला पोस्टाने पाठवले. पंतांच्या पाजी पुत्राने पैशांच्या प्राप्तीतून पोटात पंजाबी
पदार्थ पचवले.

पंतांना परमेश्वरच पावला!
पंकजला पकडण्यासाठी पंतांसोबत पुण्यात पोहोचलेली पंतांची पोरगी प्राची पंकजला पहिल्यांदा
पाहताच पंकजच्या प्रेमात पडली. प्राचीने पंकज, पोलिसांची पकडा पकडी पाहिली. पंकजचा
पदपथावरून पोबाराही पाहिला. पानशेतच्या पुराच्या पाण्यामुळे पुनर्वसित पंकज परत पर्णकुटीत
पोहोचला.

पित्यासमवेत प्राची पुरंदरला परतली, पण पंतांनी पंकजच्या पाकिटातल्या पैशांबाबत पंक्ति-प्रपंच
पाळला. पुष्कळ पैसे पुत्राला पाठवले. पंतांच्या पुन्हा पुन्हा पिडणार्‍या पुराणांच्या पोपटपंचीमुळे
प्राची पेटली.

पंकजच्या प्रेमाखातर प्राची पुण्यास परतली. प्राचीनेच पंकजवरच्या पोलिसांच्या पंचनाम्याला
पाने पुसली. पंकजला पहायला प्राची परत पर्णकुटीपाशी पोहोचली. पण पर्णकुटीत पहुडलेल्या
पंकजचे पाय पळून पळून पांढरे पडलेले! प्राचीने पंकजच्या पायावर पिवळे पुरळही पाहिले.

पंकजची परिस्थिती पाहून प्राण पिळवटलेल्या प्राचीने पदर पाण्यात पिळून पंकजचे पाय पुसले.
प्राचीचा प्रथमोपचार पाहून पंकजला पोरगी पसंत पडली. पंकजने प्राचीला पर्णकुटीतच पटवले.

पर्णकुटीतील प्रेम-प्रकरण पाहून पर्णकुटीच्या पायर्‍यांवर पत्ते पिसणारी पोरे पूर्व-पश्चिमेला
पांगली. प्राचीने पंकजचे पाकिट पैशांविनाच परतवले. परंतू प्रेमात पारंगत पंकजने प्राचीस पाच
पाप्या परतवल्या.

पंतांना परमेश्वर पावला, पण पंकजला पंतांची पायाळू पोर पावली.
केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर
कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत
कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये '
कजरारे-कजरारे' कवितेवर कोळीनृत्य केले.
काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे
कुळकुळीत केस कात्रीने कराकरा कापले. काका काय करताहेत काकूंना कळेनाच! काकूंनी कर्कश्श
किंचाळून कलकलाट केला.
काका काकूंची कसली काळजी करणार! काकांना कामाची काळजी. काकूंच्या कर्णकर्कश्श
कोलाहलातही, केशवाने कचऱ्यात कोंबलेले कागदाचे कपटेन कपटे काढून काकांनी कचेरीकडे कूच केले.
कचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर कसली. कागदाच्या कापलेल्या कपट्यांचे काकांनी 'कोलाज'
करून कामकाज कार्यान्वयित केले. केशवाचे कारनामे कळताच काकांनी काट्यानेच काटा काढला.
काकांनी केशवालाच कोलाजचे काम करण्यासाठी कुथवला. कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा
कांगावा करून कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे केशवाला कामावरून काढले.
कासावीस काकूंनी कालच्या कडू कारल्याची कोशिंबीर कटाप करून काकांसाठी कच्च्या कैरीचे कोय
काढून कालवण केले. काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले.
केळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच. कर्तव्यदक्ष काकांच्या
कार्यकाळात कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्तिशिखर काबीज केले.
कामावरून काढलेल्या केशवाने कितीतरी काबाडकष्ट काढल्यावर कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर
कॉलेजने केशवाला कबड्डीचा कर्णधार केला. क्रिडापटू केशवाने कबड्डीतच करियर केले. कालच्या
कागाळीखोर केशवाला काळानेच केला 'कबड्डीतल्या किचकट कसरतींचा कर्ता'!

कथासार:-
क्रियेविण करिता कथन, किंवा कोरडेची कीर्तन,
कितीक किताब कष्टाविण, काय कामाचे

फेसबुक वरील व्यक्ती तितक्या प्रवूत्ती


१. फेसबुक कोंबडा : यांना वाटते किरोज सकाळी ,”गुड मोर्निंग”ची पोस्ट टाकावी आणि लोकांना गुड मोर्निंग म्हणायला भाग पाडावे.

२. फेसबुक सिलीब्रीटी : हे फेसबुक ने दिलेली ५००० ची लिमिट पूर्णवापरतात आणि खूप सारे अनोळखी लोकाना अँड्ड करत सुटतात.

३. फेसबुक बाबा : हे फक्त देवाच्या पोस्ट टाकणार आणि प्रवचन करत सुटणार .

 ४.फेसबुक चोर : हे लोक दुसर्यांचे स्टेटस किवा पोस्ट चोरी करून, पटकन आपल्या नावावर टाकतात.

५ . फेसबुक देवदास : हे लोक नेहमी वेदनामय आणि निराशेच्या पोस्ट आणि कविता टाकतात. आणि आपले दुख जगाला दाखवून लोकांना पण दुखी करतात.
६. फेसबुक न्वूज रीडर : जागत काय चालू, ह्या न्‍युज हे त्यांच्या स्टेटस मध्ये टाकून लोकांना न्‍युज सांगत सुटतात.

७. फेसबुक टीकाकार : हे स्वता तर कधी पोस्ट करणार नाही, पण दुस-यांच्या चांगल्या पोस्ट जावून टीका करत सुटतात. जसे पोस्ट जुनी आहे, पोस्ट जमली नाही वगैरे वगैरे.

८. फेसबुक विदुषक : हे लोक त्यांच्या आयुष्यात किती पण दुख असले तरी सर्वांना कमेंट आणि पोस्ट मधून हसवत असतात.

९. फेसबुक लाईकर : हे लोक गुपचूप पोस्ट वाचून लाईक करतात. पण कमेंटकरायला कधी येत नाही.

१०. फेसबुक कमेंटर : यांना कोणती पण पोस्ट असो पण आपण कमेंट मारली पाहिजे असे वाटत असते. आणि कमेंट मास्तर असतात.

११. फेसबुक विचारक : हे लोक चांगले चागले विचार आपल्यापोस्ट मधून लोकापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतात.

१२. फेसबुक कवी आणि कवियित्री : याना कविता सोडली तर दुसरे काहीच जमत नाही. हे कविता टाकून लोकांना बोर करत असतात.
१३. फेसबुक टपोरी : हे लोक फेसबुक वर येतातच मुली पटवायला. दिसली मुलगी कि उठ सुठ फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असतात. आणि कमेंट करत असतात. आणि मुलींच्या मागे लागतात.

१४. फेसबुक द्वेषी : ह्या लोकांना फेसबुक वर कोणाचीच प्रशंसा करणे जमत नाही. हे फक्त लोकांचा द्वेष करतात आणि दुसर्या लोकांना त्रास देतात.

१५. फेसबुक च्याटर : यांना फेसबुक वर च्याट शिवाय काहीच सुचत नाही आणि जमत पण नाही,

१६. फेसबुक भिकारी : या लोकांची फ्रेंड रिक्वेस्ट ब्लोक असते म्हणून उठ सुठ मला अड्ड करा म्हणून लोकांना भिक मागत फिरत असतात.

१७ . फेसबुक लिंग परिवर्तक : हे लोकवेगळ्या लिंगाचे प्रोफाईल काढून फिरत असतात. मुल मुलीचे प्रोफाईल काढतात आणि मुली मुलाचे प्रोफाईल काढतात.

१८. फेसबुक खेळाडू : हे लोक दिवसभर फेसबुक वर गेम्स खेळत बसतात.

१९. फेसबुक माकड : हे कमेंट मध्ये काहीच बोलत नाही फक्त हा हा हि हि करत असतात.

२० . फेसबुक कलेक्टर : हे फक्त फेसबुक वर पेज आणि ग्रुप जाईन करतात पण कधी पोस्ट किवा कमेंट करत नाहीत. तर फक्त ग्रुप आणि पेज कलेक्ट करत असतात
 

मराठी Girlfriend ची ठळक वैशिष्ट्ये....

१. जर तिची ओळख तुम्ही "माझी Girlfriend" म्हणून करून दिली तर ती रागावते.
२. चारचौघांसमोर जर तुम्ही तिला मिठी मारली तर ती "जन गण मन" गायला सुरु करते.
३. तिच्या आईला आपण "मावशी" किंवा "काकू" म्हणतो.
४. समजा जर भयंकर जोराचं वादळ सुटलं आणि विजा कडाडल्या, तर हिंदी सिनेमातल्या नायिकेप्रमाणे ती तुम्हाला कधीच मिठी मारणार नाही.
५. तुमच्याबद्दल जर तिला कोणी विचारले तर लाजेने ती लालबुंद होते.
६. ती सहसा जीन्स आणि टाइट टी शर्ट वापरत नाही पण हे मात्र गॄहीत धरून चालते की तिचं करिअर तुमच्या करिअरइतकंच महत्त्त्वाचं आहे.
७. तिला शाळेतल्या सगळ्या कविता आठवतात.
८. ती नेहमी "अमके अमके" सरांबद्दल बोलते.... आणि तुम्ही मनातल्या मनात म्हणता...." काय पकवते आहे".
९. राखी पौर्णिमेच्या दिवशी ती तुम्हाला भेटत नाही.
१०. तिचा भाऊ कधीच तुमचा मित्र नसतो.
११. घरात तुमच्या आवडीचा पदार्थ केलेला असेल तर ती आठवणीने डब्यात घेउन येते.
१२. तुमची DATING कुठल्या तरी रेस्तौरन्त मधे नसून चतुर्थीच्या दिवशी लालबागच्या राजा किंवा सिद्धीविनायकाच्या मंदिराजवळ असते ...
तो- काय खाऊ या?

ती- काहीही चालेल.

तो- पावभाजी आणि व्हेज पुलाव खाऊ या?

ती- शी केव्हढी ऑईली असते. मला पिंपल्स
येतात.

तो- मग काहीतरी नॉन्-व्हेज?

ती- कालच खाल्लंय ना?

तो- मग नुस्तंच चहा-ब्रेड सँडविच?

ती- मला इथं मरणाची भूक लागलीये, अन तू

मला चहा-ब्रेड देणार?
तो- मग तूच सांग काय खायचं?

ती- काहीही चालेल..!!

तो- मग आता आपण काय करू या?

ती- काहीही. तुच ठरव.

तो- पिक्चर बघू या मस्त? बरेच दिवस झलेत?

ती- नको. वेस्ट ऑफ टाईम!

तो- मग बागेत चल, बॅडमिंटन खेळू या.

ती- डोकं फिरलंय का? बाहेर ऊन बघ किती ते..

तो- मग कॉफीशॉपमध्ये तरी जाऊ या.

ती- नको. पुर्ण दिवस झोप येत नाही कॉफी प्याल्यावर.

तो- मग तुच सांग, काय करू या?

ती- काहीही. तुच ठरव..!! ..

तो- जाऊ दे. सरळ घरीच जाऊ या झालं.

ती- काहीही. तुच ठरव.

तो- बसनं जाऊ या?

ती- शी केवढी गर्दी. अन कसकसले वास येतात त्या बसमध्ये.

तो- ठीके. टॅक्सीने जाऊ या मग.

ती- पैसे जास्त झालेत का?
एवढ्याशा अंतरासाठी टॅक्सी?

तो- ठीक. चल मग, चालतच जाऊ.

ती- किती दुष्ट तु?
रिकाम्या पोटी मला चालायला लावतोस?

तो- ठीक. मग आधी जेवू या?

ती- व्हाटेव्हर!

तो- काय खाऊ या?

ती- तुच ठरव.
(या मुली पण ना खरच @!#$@#!)

नारदाचा वारस

नारद मेला; मी रडलो मग;
कोण कळी त्या लाविल नाहक!
शोक कशाला? वदला ईश्वर,
धाडुनि दिधला मी संपादक!

कवी - विंदा करंदीकर