*_व पु एक विचार_* 


माणसं मनातली......


मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला, शरीराला प्रसन्न करून जातो.

सहवासातील माणसाचं देखील असंच असतं.


काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडतात, आपली होऊन जातात.

तर, काही कितीही सहवासात राहिली, तरी त्यांची आतून ओढ नसतेच...


चेहरा बघण्यापेक्षा नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं. शोधूनही तिथं माणूसपण सापडत नसेल, तर त्याचं सुंदर दिसणंही मग किळसवाणं वाटतं...


शरीराची सुंदरता वया बरोबर संपते, तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहाते. शरीराला वय असतं, मनाला ते कधीच नसतं...


शेवटी काय, आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो, शरीर तर निमित्त मात्र असतं.

माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा, आणि विनयशीलता असेल, तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते...


म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची सुंदर आरास असूनही, देवघरातील समईच्या तेजापुढं आपण नतमस्तक होतो...


आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं!!


आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं, ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई...

ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही.


आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे?

नशिबानं कधी भेटलीच तर हळुवार जतन करून ठेवावीत...

 

 कदाचित, पुन्हा भेटतील ,न भेटतील?


✍️व.पु.काळे

 सासू : सुनबाई हात मोकळे...

चांगलं नाही वाटत...


सून : मोबाइल चार्जिंगला लावला आहे आई...


सासू : अग भवाने मी बांगड्या बद्दल विचारते आहे।  🤦🏻‍♂



🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

 एक पुरुष बसमध्ये एका सुंदर महिलेच्या शेजारी बसला होता.


बोलायला विषय हवा म्हणून त्यानं तिच्या परफ्युमच्या सुगंधाचं कौतुक सुरू केलं..


'तुम्ही लावलेल्या परफ्युमचा सुगंध अतिशय छान आहे. मला त्याचं नाव समजेल का..? मला तो माझ्या पत्नीला गिफ्ट देता येईल'


ती सुंदर महिला या पुरुषापेक्षा हुशार निघाली. तिनं लगेचच उत्तर दिलं.


'हा परफ्युम तुम्ही तुमच्या पत्नीला अजिबात देऊ नका..

अन्यथा काही चालू पुरुषांना तिच्याशी संवाद साधण्याचा बहाणा मिळेल..'


🙆‍♂😅😂😃😜😝🤦‍♂️🥳

 बायको – नेहमी माझं अर्ध डोकं दुखत असते…. डॉक्टरांना दाखवावं म्हणतेय.




नवरा – त्यात काय डॉक्टरांना दाखवायचं? जितकं आहे तितकेच दुखणार ना?


 


तेव्हापासून नवऱ्याचं सगळं अंग दुखतेय….🤕😂🤣🤣

 मी बायकोला म्हणालो ,,,  तिळगुळ घ्या गोडगोड बोला   तर म्हणते


ह्यांच आपलं काहीतरीच .... 😊😊😊


म्हणे *तिळगुळ घ्या गोडगोड बोला* 😢


तिळगुळ म्हणजे काय डायमंडचा सेट आहे का, मिळालं की लगेच गोड बोलायला .....

😆😆😆

 😀  मालवणी तडका 😀


बाई : अरे एवढे दिवस खय होतस रे शाळेत नाय इलस तो?


पक्या : बाई माका बर्ड फ्लू झालो हुतो ना ! म्हणून मी इलय नाय शाळेत.


बाई : पण यो तं पक्ष्यांका होता ना, तुका कसो झालो रे?


पक्या : गे तु कधी माका माणसात मोजलस ? बगुचा तेव्हा माका कोंबडो  बनवुन बाहेर उभी करतस.. 


🐔🐔

एक ब्राह्मण दुपारी भिक्षा मागण्याकरीता एका दारात उभा राहीला , ''ॐभवती भिक्षांदेहि " अशी गर्जना केली.


घरात एकटीच म्हातारी होती, ती म्हणाली, "महाराज ! मी एकटीच आहे, घरात आमटी भात तयार आहे, चार घरात भिक्षा मागण्या पेक्षा आज इथेच जेवा."ब्राह्मण "हो" म्हणाला.ब्राम्हणाचे पोटभर जेवण झाले ब्राम्हणाने ताक मागीतले.


*भोजनांते तक्रं पिबेत*  

*अस म्हणतात.नेमकं म्हातारीच्या घरात त्या दिवशी ताक नव्हते.ती म्हणाली, "थांबा महाराज मी आत्ता शेजारणी कडून ताक घेवुन येते."तिने शेजारणीला ताक मागीतले ,शेजारणीने भांडभर ताक दिलेआजीने ब्राम्हणाच्या भातावर ताक घातले , ब्राम्हणाने भुरका मारला तो शेवटचाच.ब्राह्मण तडकाफडकी मेला.*

    *चित्रगुप्त आणि यमधर्माला प्रश्न पडला की, या कर्माचा भागीदार कोण?कारण ब्राम्हणाने आत्महत्या केली नव्हती.*

*म्हातारीने अतिथीधर्म पाळला होता तिने ब्राम्हणाला मारले नव्हते,दारात आलेल्या अतिथ्याला पोटभर जेवण दिले होते.*

*शेजारणीने शेजारधर्म पाळला होता कोणी दारात मागायला आले तर नाही म्हणू नये म्हणून तिने ताक दिले होते. आणि ताक पिवुन ब्राह्मण मेला होता कारण त्या ताकात विष होते आणि हे विष एका नागाच्या तोंडातून ताकात पडले होते.यमधर्माने नागाला जाब विचारला, नाग म्हणाला यात माझा काय दोष ? घार मला पकडून आकाशमार्गे चालली होती,माझे तोंड खाली झाले होते त्यामुळे माझ्या तोंडातील गरळ त्या ताकात पडली म्हणून ब्राह्मण मेला.*

      *यमाने घारीला जाब विचारला , घार म्हणाली यात माझा काय दोष ? सापाला पकडून खाणं हा माझा धर्म आहे.*

     *प्रत्येकाने आपला धर्म पाळला होता मग आता कर्माचा भागीदार कोण ? कोणाच्या माथी मारायचे हे कर्म ?*

     *चित्रगुप्त यमाला म्हणाला, "चला माझ्याबरोबर या कर्माचे भागीदार मी तुम्हाला दाखवतो."दोघेही गुप्तरूपाने ब्राम्हण मरून पडला होता तिथे आले.*

 *हा!हा! म्हणता संपूर्ण गावात बातमी पसरली की, म्हातारीच्या घरी ब्राह्मण जेवता जेवता मेला. हळुहळु आळीतल्या बायका तिथं जमल्या.शांताबाई उज्वला ताईना म्हणाल्या, "काय हो उज्वलाताई ब्राम्हण कसा मेला कळले का हो ?"उज्वलाताई म्हणाल्या, "नाही हो"*

       *तेंव्हा शांताबाई म्हणाल्या, "आहो कसं सांगु s s s तुम्हाला , या ब्राम्हणाकडे भरपूर द्रव्य होते , म्हातारीने भोजनात विष घालून त्याला ठार मारले व त्याचे द्रव्य हडप केले."*

            *चित्रगुप्त यमाला म्हणाला पहिल्या क्रमांकावर हिचे नाव लिहा.आणि तिथे जे जे या घटनेबद्दल बोलत होते त्यांची नावे रजिस्टर मधे लिहुन त्यांच्या माथी मारले गेले.*

        *थोडक्यात कर्माचा इतका सूक्ष्म विचार केला आहे. एखाद्या घटने बद्दल सत्य माहीत नसताना बोलणे हे सुद्धा पाप आहे.*

       *म्हणून आजचा सुबोध दिला आहे.प्रत्येकाच्या कानात आणि डोळ्यात देवाने चार बोटाचे अंतर ठेवले आहे.*


 *तात्पर्य - जोपर्यंत एखादी घटना तुम्ही प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही तो पर्यंत कोणाच्या तरी तोंडून निघालेली बातमी कानाने ऐकून तुमच्या तोंडाने बोलू नका हे सुद्धा एक प्रकारचे पापच आहे.*