गेलों विदूषक जरी ठरुनी सुहास,

दान्ते-नि-शेक्सपिअर-संगत आसपास

कोठे तरी स्वमरणोत्तर भाग्यकालीं -!

हाही विचार न कमी मज शांतिदायी.

 जातेस तरि सुखाने । जा आपुल्याच ठायां;

हृदयांत साठलेलें । गेलें न रूप वाया.

ही एक मुग्ध कलिका । ताऱ्यास वेड लावी,

परि तत्प्रभात-अश्रू । हृदयी डुजीच ठेवी,

आधार या तरूचा । वरती चढावयाला,

आलिंगणें लतेने । स्नेहें वरी दुजाला.

ही रीत काय नाहीं । येथील कोमलांची,

अपवाद त्यास कैशी । होशील एक तूंची !


रेताड जीवनांत । भवितव्यता-किनारीं,

अति तीव्र वेदनांनी । व्याकूळतां जिव्हारीं,

सौंदर्यरूप ईशा । भावें बघून हृदयीं,

मम पोळल्या जिवाला । लाभेल दिव्य शांती.


तारुण्य-रूप जातां । बघशील बावरून,

शांती अशांततेची । तूतें न तीहि जाण.

 मन वाचनिं आज ना रमे; स्मृति होते तव एकसारखी;

हुरहूर भरून ये हृदीं; भर संध्या करि त्यांत आणखी.

बसलों म्हणुनीच येउनी — जग-कोलाहल लांब मागुती —

दगडावर त्याच, ज्यावरी गतकालीं तव स्निग्ध संगती.


पसरे लहरींत वायुच्या मधु छायार्णव सांध्य भोवती;

निमिषांत नभावरी निळ्या किति नानाविध रंग फाकती.

अति संथ समीर-गारवा सुटुनी वाटसरास सांगतो,

“जरि वाट कितीहि चाललां, नच आता तरि अध्व-खेद तो.”

विहरून नभांत स्वैरसें घरटयाला निज शेवटीं त्वरें,

चिंवचींवित सांज-माधुरी बघ हीं जात सुखांत पाखरें.

मिटणार फुलाफुलांतुनी, प्रतिपानावर कंप पावुनी,

लहरीलहरींतुनी जलीं, प्रतिमेघावर गोड रंगुनी,

श्रुतिशांत दिनांत-गीत ये श्रवणीं, “श्रांत जिवा विसाव घे !”

मज हाय कुठे न आसरा; करिती पारध हे विचार गे.

हळुवार सुहास, रात्र ही मखमाली पसरीत हात ये;

अपघात घडून देह हा पडला एक रुळावर इथे,

बघुनी क्षण शांति मन्मनीं न कळे कां परि खास वाटली,

कुठुनी तरि शक्ति ;…………………

 प्रीतीची दुनिया सुहास, हसते वाऱ्यावरी भाबडी;

स्वानंदें रमते समुत्सुक जनीं निर्हेतुका बापुडी;

अद्वैतांतिल मंजु गीत-रव तो आलापुनी गुंजनीं,

राही मग्न अशीच गोड अपुल्या स्वप्नांत रात्रंदिनीं.

आशांची बकुलावली विकसली मंदस्मितें भोवती;

ईषत्कंपितकल्पनाकिसलयीं निष्काम डोलेल ती !

चाखावा मकरंद त्यांतिल जरा; जावें, झुलावें जरा;

शंकाही नच की कधी वठुनि हा जाईल गे मोगरा.

सौख्याभाव नि सौख्य एकच इथे संवेदनाजीवनीं;

नीती आणि अनीति संभ्रम फिटे स्नेहार्द्र संभावनीं;

संध्यादेवि उषेसह प्रगटते आकाल निलांबरीं;

येई गे, अजरामत्व मरुनी निर्वेध ताऱ्यांपरी.


नाही हें नशिबीं ! — नसोच ! — मिटती जागेपणीं पापण्या;

आई ! येत म्हणून मस्तक तुझ्या अंकावरी ठेवण्या.

 सचिंत पारध गोड तत्वतः

सोडुनि देतों अता सुखाने !


सावज मागे, पुढे शिकारी !

गति-धुंदी ही भरे शरीरी;

नसानसातुंन वेग चढे शिरिं;

वळुनी बघणें आता कसले !


पाय लागले डोंगर-माथां,

गतिमत्वाने एकतानता,

प्रभू-पावलें लांब तेजतां –

अंधुक, पारध तिथे संपणें

 चंद्रकिरणांनो, तुम्हां

वाजते का कधी थंडी

स्वतःची ? मध्यरात्री

हिवाळ्यांत हुडहुडी !


नाही ना ? मीं म्हणुनीच

लांबवले मरणाला;

गारठून जाल जेव्हा –

चिता हवी शेगोटीला.



आई म्हणजे आई असते

आई म्हणजे आई असते

जगा वेगळी बाई असते.....


तिची हक़ म्हणजे
मन हराव्नरी असते......
तिची प्रेमळ बोली
मनाला जिंकणारी असते.....
आई म्हणजे आई असते
जगा वेगळी बाई असते.....

घरातली तुलस तिच्या
मायेने वाढत असते....
बगिच्यातला निशिगंधा....
तिच्या हसण्याने फुलत असते....
आई म्हणजे आई असते
जगा वेगळी बाई असते.....

तिच्या सुरांवर
घर रमत असते.......
तिच्या तलवार
घर चालत असते...
आई म्हणजे आई असते
जगा वेगळी बाई असते.....

आपल्या बलाचे आश्रू पुसयला
ती सतत तयार असते....
आपल्या बलाला सुखाचे क्षण मिलावे.......
म्हणुन ती सतत तलमलत असते...
आई म्हणजे आई असते
जगा वेगळी बाई असते.....