“एक अतिशय हुशार ग्राहक”
सकाळी 3 वाजता हॉटेलच्या क्लार्कला एका पिलेल्या ग्राहकाचा हॉटेलमधूनच इंटरकॉमवर फोन आला,

'' बार केव्हा उघडतो?'' त्याने विचारले.

'' दूपारी'' क्लार्कने उत्तर दिले.

जवळ जवळ एका तासाने पुन्हा त्याच ग्राहकाने अजुन पिल्यासारख्या आवाजात क्लार्कला फोनवर विचारले,

'' बार किती वाजता उघडेल?''

'' मी आधी सांगितल्याप्रमाणे ... दूपारी '' क्लार्कने उत्तर दिले.

पुन्हा एका तासाने त्याच ग्राहकाने आता जरा जास्तच पिलेल्या आवाजात क्लार्कला फोनवर विचारले,

'' बार किती वाजता उघडेल?''

क्लार्कने उत्तर दिले,

''सर... बार बरोबर दुपारी 1 वाजता उघडतो. पण तुम्ही जर बारमध्ये जाण्यासाठी एवढंही थांबू शकत नसाल तर मी रुम सर्विसद्वारे तुम्हाला काही मद्य लागल्यास पाठवू शकतो...'' क्लार्क म्हणाला.

'' मी बारमध्ये जाण्यासाठी नाही... बारमधून बाहेर येण्यासाठी विचारतोय'' तो पिलेला ग्राहक म्हणाला.

रस्त्यात पडलेल नाणं उचलताना एकाचा गाडीखाली येऊन मृत्यू झाला.

पंचनाम्यात नैसर्गिक मृत्यु अशी नोंद होती.

पुढे खटला चालविल्यावर तपासात ते नाणं नसून थंडपेयाचं चकाकणारं झाकण असल्याचं निष्पन्न झालं.

तेव्हा अहवाल देण्यात आला, "मानसिक धक्क्याने मृत्यु."

काही मजेशीर व्याख्या


अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका
मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखीहोतो
शेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो
सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा
वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे
लेखक - चार पानात लिहून संपणाऱ्यागोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा
फॅशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका
पासबुक - जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव
गॅलरी - मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा
लेखणी - एकाच वेळी असंख्य लोकांचागळा कापण्याचे साधन
छत्री - एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ
कॉलेज - शाळा आणि लग्न यामधील काळ घालवण्याचे मुलींचे एक साधन
परीक्षा - ज्ञान तपासून घेण्याचे एक 'हातयंत्र'
परीक्षा - पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ
विश्वशांती - दोन महायुद्धांच्यामधला काळ
दाढी - 'कुरुपपणा' लपवण्याचे' रुबाबदार' साधन
थाप - आजकाल १००% लोक हि फुकटात एकमेकांना देतात
काटकसर - कंजूषपणाचे एक 'गोंडस' नाव
नृत्य - पद्धतशीरपणे लाथा झाडण्याची कला
घोरणे - नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचाबदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी
मन - नेहमी चोरीस जाणारी वस्तू
ब्रह्मचर्य - कुठेच न जुळल्याने स्वीकारायचा मार्ग
विवाहित माणूस - जन्मठेपेचा कैदी
विधुर - जन्मठेपेतून सूट मिळालेला कैदी
श्रीमंत नवरा - चालतं बोलतं ATM कार्ड
श्रीमंत बायको - अचानक लागलेली लॉटरी
IT वाला - सतत काहीतरी काम करण्याचे सोंग करणारा इसम
IT वाली - श्रीमंत नवरा मिळावा म्हणून स्पेशल ट्रेनिंग घेतलेली स्त्री
बुद्धिवादी - ज्याच्या बुद्धीविषयी चारचौघात वाद आहे असा
स्कार्फ - बॉयफ्रेंड बरोबर बाईक वरून फिरताना कोणी ओळखू नये म्हणून थोबाड लपवायचे मुलींचे एकसाधन
चुंबन - रेशनकार्डाशिवाय मिळणारीसाखर
लग्नाचा हॉल - दोन जिवांच वेल्डिंग करणारा कारखाना

पांडूला गर्ल्स हॉस्टेल मध्ये नौकरी मिळाली...
.
.
2 महिन्यांनंतर हॉस्टेल च्या मालकाने पांडूला बोलावले,
आणि विचारले ,'तू पगार घ्यायला का येत नाहीस???'
.
.
.
पांडू : च्यामारी......प गार बी मिळणार व्हय????
रजनीकांत: लहानपणी माझ्या घरात लाईट नव्हती,
म्हणून मी"अगरबत्ती लाऊन अभ्यास केला..!
.
मक्या : हो का ? आमच्याकडे पण लोड शेडींग असायचं,
नि अगरबत्ती पण नव्हती,
मग काय माझं एक दोस्त व्हता,
'प्रकाश'नावाचा,
त्याला सोबत बसून अभ्यास केला,.
.
 पण पुढे तो पावसात भिजला नि विझला...

रजनीकांत: मग काय केलं?. . . . . ...
.
.
.
.
.
..
.
..मक्या : काय नाय, एक मैत्रीण पण होतो....
'ज्योती'नावाची.


एक कॉलेजची विद्यार्थीनी, एकदा क्लासमधे लेट आली.

शिक्षक : तु आज लेट का आलीस?
.
.

.
मुलगी : सर, एक मुलगा माझ्या मागेमागे येत होता..
.
.
शिक्षक : पण त्यामुळे तर तू लवकर यायला पाहिजे, मग लेट का झालीस.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगी : सर तो मुलगा फारच हळू हळूचालत होता...

चहूंकडे देवा दाटला वणवा । कां न ये कनवा तुजलागीं ॥१॥
सांपडलें संधी संसाराचे अंगी । सोडवी लगबगी मायबापा ॥२॥
आशा मनशा तृष्णा बहू या वोढाळ । लाविलासे चाळा येणें मज ॥३॥
निर्मळा म्हणे जीवीच्या जीवना । येऊं द्या करूणा देवराया ॥४॥


 - संत निर्मळा