तांबे-सोन्याची नांदी

निळसर डोंगर घळीघळीतुन धूर धुक्याचा निघत असे
खेड्यामध्ये गांव पुरातन तसा वसविला मला दिसे

खडकसांधणी परी नदीचे वळण पुलातुन निघे पुढे
पारदर्शनी पाण्याखालून माशांचाही जीव रडे

हातामध्ये रिक्त कमंडलु, तहान गळ्यावर घे जोगी
गावापासुन दूर अरण्ये वणवा वणव्याच्या जागी

अग्नीशी संगनमत सोडूनिया वाराही ईकडेच फिरे
पंथ सोडुनी जशी प्रणाली एकट कवितेतून झरे

मनगट उसवी लख्ख तांबडे कडे चमकते की जळते
जळते तांबे कनकदिप्तीवर खरेच का सोने होते?

वाळुवरुनी पाय उचलिता गुडघे कोपर झांझरती
मेंदुमधुनी शिळा अहिल्या झर्रकन ये चरणावरती

इथे मेघ झरण्याच्या पुर्वी वाकुन बघतो रे खाली
पात्र नदीचे किती भयंकर किती तळाची रे खोली?

उडे कावळा चिमण्यांनीही भुर्रकन अंगण सावरले
खेड्यामधले गावामधले लोक भाबडे बावरले


कवी - ग्रेस
संता कॉलेजमधे प्रोफेस्रर म्हणुन लागला आणि सामान्य ज्ञानाचा पेपर काही अशा पध्द्तीने तयार केला. सगळे प्रश्न सोडवणे गरजेचे आहेत, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर एकच असावे.
१. चीन कुठल्या देशात आहे?
२. 15 ऑगस्ट कुठल्या तारखेला येतो.
३. टमाटरला हिंदीत काय म्हणतात
४. मुमताजच्या कबरीमध्ये कोण दफन आहे
५.हिरवा रंग कुठल्या रंगाचा असतो 

रमेशचा मुलगा गण्या एकदा परीक्षेत नापास होतो

रमेश - इतके कमी गुण ?दोन
कानाखाली मारायला पाहिजेत .

गण्या - चला पप्पा मी त्या मास्तरड्याचं
घरपण बघून ठेवलयं .

खरा तो एकची धर्म

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे

जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे

समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे

कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे

प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे

असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे

भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे

असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे


कवी - साने गुरुजी

डॉक्टर डॉक्टर ….

माझे डॉक्टर फारच चांगले आहेत
तुम्हाला वेगळा सल्ला (सेकंड ओपीनियन) हवा असला तर …
ते बाहेर जाऊन परत येतील (आणि तो सांगतील)

त्यांनी एका स्त्रीला पिवळ्या आजारासाठी तीन वर्षे उपचार केल्यानंतर त्यांना समजले ….
की ती बाई चिनी आहे

आणखी एकाला त्यांनी फक्त सहा महिने आय़ुष्य उरले असल्याचे सांगितले होते. सहा महिने झाले तेंव्हा त्याची फी मिळाली नाही ….
डॉक्टरांनी त्याला आणखी सहा महिने बहाल केले

नर्सने येऊन त्यांना सांगितले,”बाहेरचा रोगी म्हणतो आहे की त्याला गायब झाल्यासारखे वाटते आहे.” डॉक्टर म्हणाले, “त्याला सांग की मी त्याला पाहू शकत नाही.”

आणखी एका माणसाने ओरडत सांगितले,”माझ्या मुलाने फिल्म गिळून टाकली आहे” डॉक्टर म्हणाले,”ठीक आहे, तिला डेव्हलप झाल्यावर पाहू”

एका रोग्याने सांगितले,”मला काही आठवत नाही”. डॉक्टरांनी विचारले,”केंव्हापासून?”
रोग्याने विचारले,”केंव्हापासून काय?”

मी डॉक्टरांना सांगितले,”माझ्या कानात (फोनच्या) घंटेचा आवाज येतो. डॉक्टर म्हणाले,”मग तू उचलू नकोस”"

एकाने त्यांना सांगितले, “मला घंटी असल्यासारखे वाटते” त्याला डॉक्टरांनी सांगितले,”या गोळ्या खा, त्या लागू पडल्या नाहीत तर मला रिंग कर

आणखी एकाने सांगतले,”मी पत्त्याचा गठ्ठा झालो आहे” डॉक्टर म्हणाले,”तिथे बस, मी तुला नंतर डील करेन”

मी डॉक्टरांना सांगितले, “माझे तंगडे २ ठिकाणी मोडले आहे”. ते म्हणाले,”पुन्हा त्या ठिकाणी जाऊ नकोस”

चाफ्याच्या झाडा....

चाफ्याच्या झाडा....
का बरे आलास आज स्वप्नात?
तेव्हाच तर आपले नव्हते का ठरले?
दु:ख नाही उरलं आता मनात

फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा
रंग तुझा रंगतोय माझ्या मनात
केसात राखडी पण पायात फुगडी
मी वेडी भाबडी तुझ्या मनात

चाफ्याच्या झाडा....
नको ना रे पाणी डोळ्यात आणू
ओळख़ीच्या सुरात, ओळखीच्या तालात
हादग्याची गाणी नको म्हणू

तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात
एक पाय मळ्यात खेळलोय ना
जसे काही घोड्यावर
तुझ्याच फांद्यांवर बसून
आभाळात हिंडलोय ना

चाफ्याच्या झाडा.... चाफ्याच्या झाडा....
पानात, मनात खुपतंय ना
काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय
तुलाही कळतंय.... कळतंय ना....

चाफ्याच्या झाडा.... चाफ्याच्या झाडा
हसून सजवायचं ठरलय ना
कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं
फुलांनी ओंजळ भरलीये ना

कवियत्री - पद्मा गोळे.
बाबा : झम्पू जरा तुझा मोबाईल दे रे….

झम्प्या : एक मिनिट हा बाबा स्विच ऑन करून देतो

(झम्प्या सुमडित आयटमचे फोटो उडवतो,

सर्व मुलींचे मेसेज आणि नंबर डिलीट करतो,

आलेले कॉल डिलीट करतो,

मेमरी कार्ड फॉर्मेट मारतो)….

हा बाबा हा घ्या आता…

बाबा : आभारी आहे….

काही नाही रे घड्याल बंद पडले ना…

फ़क्त टाइम बघायचा होता….