आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

इन्द्र्धनुष्याचे रंग आहेत आणि पारिजातकाचा वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

मी म्हणजे जीवन आणि तु म्हणजे श्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

संकटांची नाही भिती, तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

कधी वाटते फक्त तुझी मैत्री सच्ची, बाकी दुनिया नुसता आभास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

हवे काय अजुनी त्याला, मित्र तुझ्यासम ज्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

ओढ तुझ्या सावलीची माझिया रस्त्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

असो वा नसो कुणी आपल्या संगे, पर्वा त्याची कुणास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

माझ्या चुकांवरही मित्रा पांघरूण तुझे हमखास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

तुझ्याबरोबर ऐन उन्हाळा ही मजला मधुमास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

आयुष्याच्या पटलावरती तुझ्या मैत्रीची आरास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

कधी निखळ चर्चा, आणि कधीतरी उपहास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे
संताने घराचा दरवाजा तोडला आणि तो खांद्यावर घेऊन बाजारात निघाला .

रस्त्यात त्याला एका माणसाने विचारले, दरवाजा विकायला निघालास का?

संता- नाही, मित्रा कुलूप उघडायचे आहे.

हल्ली कविताच सुचत नाही....!!!

शब्दांच्या या दुनियेत, मन माझे रमत नाही
कविता करायला, हल्ली कविताच सुचत नाही....!!!

शब्दांच्या प्रवासात
ओळ काही मिळत नाही,
वेचली अनेक शब्द फुले
पण शब्द शब्दाला जुळत नाही

खेळ हा शब्दांचा, मनाला कळत नाही,
कविता करायला, हल्ली कविताच सुचत नाही....!!!

रचल्या शब्दांच्या ओळी,
पण यमक काही जुळत नाही,
लिहिलेल्या कवितांना मग
अर्थ काही उरत नाही,

कशी आहे हि वेळ, सरता सरत नाही,
कविता करायला, हल्ली कविताच सुचत नाही....!!!

आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय ....

आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय...
आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय...
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय

नसतो कुठला होमवर्क न असतो कुठला त्रास
ऑफिस मधुन आल्यावर नसतो कुठला क्लास
घरी येउन आरामात टी . व्ही . पहात रहायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय ...

सगळे असतात फ़्रेंड आणि टिचर कुणीच नसतात
चॉकलेट देणार् या काकानां बाबा बॉस म्हणतात
छान छान बॉस कडुन रोज चॉकलेट खायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय ...

कॉमप्यूटरवर बसुन कसल काम करतात ?
कॉमप्यूटरवर तर नुसतेच गेम असतात
रोज रोज गेम खेळुन टॉप स्कोरर व्हायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय ...

ऑफिसमध्ये जाउन भरपूर मज्जा करतात
तरीच बरं नसल तरी ऑफिसला जातात
ऑफिसला जाउन मला पण खेळायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय ...

ऑफिसच्या रिसेस मध्ये हॉटेल मध्ये जातात
हॉटेल मध्ये जाउन मस्त चमचमीत खातात
बरगर , पिज्झा , फ़्राईस आणि आईसफ्रूट खायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय ...

महिन्याच्या शेवटी ह्यांना केवढे पैसे मिळतात !
देव जाणो येवढ्या पैशांच हे काय करतात ?
मला तर महिन्याला फक्त एकच खेळण घ्यायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय ...

आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय ....

आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय ....

भष्टाचाराचे घड्याळ

एकदा राबडीदेवी ( लालू यादवची पत्नी ) स्वर्गात गेली. तिथे तिला अनेक घड्याळे दिसली. तिने कुतूहलाने यमाला विचारलं, "ही एवढी घड्याळं इथे का लावली आहेत?"

यम म्हणाला, "त्याचं काय आहे, हे प्रत्येक घड्याळ पृथ्वीवरील एकेका माणसासाठी आहे. जेव्हा पृथ्वीवर एखादा माणूस भ्रष्टाचार करतो, तेव्हा त्याचं घड्याळ एका मिनिटाने पुढे जातं"

राबडीने विचारलं, "मग यातलं लालूंचं घड्याळ कोणतं?"

यम म्हणाला, "ते घड्याळ इथे नाही. ते वर आमच्या ऑफिसमध्ये आहे." राबडीचा ऊर अभिमानाने भरून आला. तिने विचारलं, "का?"

यम म्हणाला, "त्याचा आम्ही पंखा म्हणून वापर करतो !!!!!"

प्रेमपत्र !!

प्रिय झंप्या,
          जेव्हा पासून तुझ्याशी नाते तोडले आहे....
तेव्हापासून एक दिवसही सुखाने गेला नाही,
रात्रभर तळमळत असते, 
माझ्या चुकीची जाणीव मला झाली आहे, 
तू खरच चांगला मित्र आहे,
मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे,
अणि हो जाता जाता,
तुला १ कोटीची लॉटरी लागल्याबद्दल अभिनन्दन.