तुमचा कुत्रा चावतो का?

नाही.

मग खातो कसा?

-एक अतिचिकित्सक पुणेरी

W

W

दारूचा उपवास

एक महाशय वारले, आणी डायरेक्ट स्वर्गात गेले,
त्यांना आश्चर्य वाटले कि, मी जीवनात सर्व खोटी कामे केलीत, आणि आयुष्यभर दारू पिऊन झोपून राहिलो, तरी मला स्वर्गात जागा कशी ?

2-3 दिवसांनंतर त्यांनी थेट  यमराजालाच विचारले, प्रभू.. मी आयुष्यभर एकही चांगले काम केले नाही, तरी मला स्वर्ग, आणि इतर भल्या माणसांना नर्क, असे का ?

यमराजांनी हसून उत्तर दिले...

बाळा, त्याचे असे आहे कि, तु बहूतेकवेळा दारू 🍻🥂🥃🍺पितांना शेंगदाणे खायचा,पिल्यानंतर न जेवता झोपायचा, आणि हे सर्व उपवासात मोजले जाते.... म्हणून तुला स्वर्ग 
कपाटातून सापडली लहानपणाची खेळणी, माझ्या डोळ्यातील उदासी पाहून मला बोलली...




"खुप हौस होती ना मोठे होण्याची..."
पूर्वीच्या बायका मुली सकाळी सकाळी ठिपके जोडून रांगोळ्या काढायच्या ,
आणि आता  सकाळीच  ठिपके जोडून मोबाईल चा पॅटर्न लॉक उघडतात ....

"क्रांती" यालाच म्हणतात बहुतेक
मला एकदा एका इंग्रजाळलेल्या माणसाने हिणवण्याच्या स्वरात म्हटलं "अरे काय त्या मराठीत टाइप करता रे तुम्ही...
किती वेळ लागतो...
बोअरिंग काम... 
इंग्रजित कसं पटापट
टाईप होतं...
तुमचं मराठी म्हणजे......"

मी त्याला सांगितलं,
"अरे बाबा श्रीमंत आणि
गरिबामध्ये तेवढा फरक असणारच".

तो खुश होऊन म्हणाला
"चला म्हणजे मराठी गरीब
हे तू मान्य केलंस तर"??

मी म्हटलं 
"मित्रा चुकतोयस तू.. 

इंग्रजी भाषेत वर्णाक्षरं किती..?"

तो म्हणाला २६..

मी म्हटलं 

"मराठीत याच्या दुप्पट

५२ आहेत..

इंग्रजिच्या दुप्पट मालमत्ता
आहे आमची..

आता सांग,
कोण गरीब आणि
कोण श्रीमंत?

केवळ जीन्स घालून बाहेर
पडणारी स्त्री पटकन
तयार होऊ शकते..

पण भरजरी कपडे घालून
सर्व दागदागिने धालून
बाहेर पडणारी स्त्री
जास्त वेळ घेणारच..

आमची मराठी भाषा काना, मात्रा, वेलांट्या, उकार यांचे दागदागिने लेऊन समोर येते..

म्हणुनच ती समोर आल्यावर तिला यायला लागणारा वेळ कोणी बघत नाही,
तिचं सौंदर्य बघून सर्व धन्य होतात."
गण्या रागाच्या भरात डॉक्टर कडे गेला....
.
.
.
गण्या -  माझ्या वरच्या दातात कीडा होता मग तुम्ही खालचा दात का काढला ????
.
.
डॉक्टर -  तो कीडा खालच्या दातावर उभा राहून वरचा दात कोरत होता,
.
.
आता बघू कुठे उभा राहतो