मन्याच्या घरचे, पोरगी बघायला गेले,
पोरगी  पसंत पडली

पंडीतजी बोलले, ३६ चे ३६ गुण जुळले 😊

मन्याचे घरवाले उठून जाऊ  लागले

पंडितजी बोलले : काय झालं हो  ???

मन्याचे घरवाले  :- पोर तर नालायक आहे, सुन बी तशीच आणायची का ?
डाटा वापरासाठी मराठी एकक.

KB, MB, GB
या शब्दांची उत्पत्ती मराठीतूनच झाली आहे .



KB - कण भर
MB - मण भर
GB - गांव भर.
या दोन कथा आहेत, दोन्ही कथा वाचल्या तर आपल्या लक्षात येईल की आपण आज जे काही करतो त्याचा पुढील पिढीवर परिणाम कसा होतो !!!

पहिली कथा

आपल्याला अल कॅपिनो माहीत असेलच, एके काळचा शिकागोचा सर्वात मोठा डॉन. त्याने अक्षरशः शिकागो वर राज्य केले आहे. दरोडे असो कि खून किंवा जुगार किंवा वेश्यागृहे, तुम्ही ज्या कुठल्या गुन्ह्याची कल्पना करू शकाल ते सगळे गुन्हे अल कॅपिनोनी केले होते. "इझी ऐडी" असे टोपण नाव असणाऱ्या आणि कायद्याला वाट्टेल तसं वाकवू शकणाऱ्या वकिलाच्या मदतीने कायद्याच्या कचाट्यातून हा माणूस मात्र नेहमीच सुटत आला. या बदल्यात इझी ऐडीला अल कॅपिनोनी जबर पैसा, मोठे घर वगरेसगळ दिलं. इझी ऐडीच घर एखाद्या नगराएवढे मोठे होते. संपूर्ण सुरक्षा होती. नोकरचाकर देखील होते दिमतीला. या ऐडीचा जीव मात्र एकुलत्या एका पोरात होता. गुन्हेगारी विश्वाचा एवढा मोठा वकील पण त्याने आपल्या पोराला मात्र या सगळ्यापासून दूर ठेवले. सत्य असत्याची जाण करुन दिली. ऐडीला नेहमी वाटायचं की आपला मुलगा मोठा झाला की त्याला समाजात आदरयुक्त स्थान असावे. इतकी प्रचंड संपत्तीअसून ऐडी मात्र आपल्या मुलाला न चांगले नाव देवू शकत होता न चांगलीउदाहरणे. एका दिवशी ऐडीला ही घुसमट पेलवेना आणि त्याने अल कॅपिनोची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. त्याला याची किंमत माहीत होती. अक्ख्या शिकागोवर राज्य करणार्या डॉनच्या विरुद्ध तो उभा होता. पोलिसांना आणि कर अधिकार्यांना त्याने अल कॅपिनो विरुद्ध सगळी माहिती आणि पुरावे दिले. परिणाम भीषण झाला. एका दिवशी भर रस्त्यात त्याची हत्या झाली. पण त्याने त्याच्या मुलासाठी मात्र एक उदाहरण निर्माण केले होते. सत्यासाठी जीवही जाऊ शकतो. राह कठीन है मगर अंतिम जीत सत्य कीही होती है !!! पोराला हे शिकवण्यासाठी त्याने सर्वोच्च बलिदान दिले होते !! पोलिसाना ऐडीच्या खिश्यात रोझरी आणि एक कविता सापडली

The poem read: The clock of life is wound but once, and no man has power to tell just when the hands will stop At, later or early hour Now is the only time you own. Live, love, toil with a will Place no faith in time For the clock may soon be still


 दुसरी कथा

दुसऱ्या महायुद्धाने जगाला अनेक हिरो दिले. असाच एक साहसी योद्धा होता Butch O'Hare. फायटर पायलट असलेला बुच विमानवाहक युद्धनौका Lexington वर होता या महायुद्धात. साऊथ पैसीफिक या महासागरात ही युद्धनौका तैनात होती. एका दिवशी अख्ख्या स्क्वाड्रनला एका मिशन वर पाठवण्यात आले, आकाशात उडाल्यावर बुचच्या लक्षात आले कि त्याच्या विमानात पुरेसे इंधन नाही आहे. बेसकॅम्पनी त्याला परतण्याचा आदेश दिला. खट्टू मनानी बुचनी फॉरमेशन सोडले आणि परत यायला निघाला. परत निघालेल्या बुचला रक्त गोठवणारे दृश्य दिसले. मोठं जपानी स्क्वाड्रन बुचच्या युद्धनौकेवर चाल करून येत होते. अमेरिकन स्क्वाड्रन सोर्टीवर निघाले होते आणि त्यांनी युद्धनौका अक्षरशः हतबल होणार होती. बचाव करायला नौकेवर एकही विमान नव्हते आणि बुचच्या विमानात पुरेसे इंधन पण नसल्यामुळे तो अमेरिकन स्वाड्रनला परत आणू शकणार नव्हता. जपानी स्क्वाड्रनशी लढणे हा एकाच पर्याय बुचला दिसला आणि तो बेभानपणे जपानी फॉरमेशन मध्ये घुसला. असेल नसेल तो सगळा दारुगोळा त्याने वापरून काही जपानी विमानांना घायाळ केले. दारुगोळा संपल्यावर विमानाचे पंख त्याने शस्त्र म्हणून वापरायला सुरवात केली. जपानी स्वाड्रनची पाच विमाने त्याने पाडली होती आणि उरलेल्या जपानी स्क्वाड्रननी माघारघेतली. आपल्या अतिशय नुकसान झालेल्या विमानाला बुचने कसे बसे युद्धनौकेवर उतरवले. विमानात असलेल्या कॅमेराने बुचचा भीम पराक्रम रेकॉर्ड केला होता. बुचच्या या पराक्रमाची सगळ्यांनी दाद दिली. आसमंतात ऐकू जातील इतक्या जोऱ्यात टाळ्या वाजवण्यात आल्या. २० फेब्रुवारी १९४२ ला केलेल्या या पराक्रमासाठी बुच नौसेनेचा FIRST ACE OF WWII झाला आणि शौर्यपदकांनी त्याचा सन्मान करण्यात आला. मात्र या अवघा २९ वर्षाचा महान योद्धा पुढील वर्षी एका हवाई कारवाईत मारल्या गेला. त्याच मूळ शहर त्याला विसरू शकणार नव्हते. त्याच्या शहराने त्या शहरातील विमानतळाला त्याचे नाव दिले. आपण कधी शिकागोला गेलात तर O'Hare आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचा पुतळा बघा. टर्मिनल १ आणि २ च्या मध्ये हा या वीराचा पुतळा !!!!

आता तुम्ही म्हणाल कि या दोन कथांचा एकमेकांशी काय संबंध... Butch O'Hare हा ईझी ऐडीचा मुलगा होता !!

कालबाह्य परंपरा

मित्रांनो, वैज्ञानिकांनी एक प्रयोग केला, तो याप्रमाणे...
एका खोली मध्ये 8-10 माकडांना ठेवण्यात आले.
त्या खोलीच्या मध्यभागी एक शिडी सरळ उभी ठेवली आणि त्या शिडीच्या वर 🍌🍌 केळीचा एक घड लटकत ठेवण्यात आला.
थोड्याच वेळात एका माकडाचे लक्ष त्या केळीच्या 🍌🍌🍌 घडाकडे जाते
आणि
ते माकड शिडी चढून केळीकड़े जाण्याच्या प्रयत्न करते .
तोच त्याच्या अंगावर गरमा-गरम पाणी पड़ते व इतर
उरलेल्या माकडांवर सुद्धा पड़ते
आणि
शिडी चढ़ण्याचा प्रयत्न करणारे माकड खाली परत येतं.
दुसऱ्या दिवशी दुसरे एक माकड असाच प्रयत्न करते , तेंव्हा सुद्धा त्याच्या अंगावर आणि इतर सर्व माकडांच्या अंगावर गरमा-गरम पाणी पड़ते.
असे सतत 3-4 दिवस घडते, त्यामुळे याचे कारण माकडांच्या लक्षात येते की, केळीकड़े धाव घेतल्यामुळे आपल्यासोबत असे होत आहे.
मग पाचव्या दिवशी जेंव्हा पुन्हा एक माकड केळीसाठी शिडी चढ़ण्याचा प्रयत्न करते
तेंव्हा
इतर सर्व माकडे मिळून त्याला झोडतात त्यामुळे ते माकड परत येउन कोपर्‍यात जाऊन बसते.
यामुळे त्या दिवशी कोणावरही पाणी पडत नाही.
पुढील 3-4 दिवस असे सतत घडते.
कोणी माकड शिडीकडे वळले की इतर सर्व माकडे मिळून त्याला मारायचे.
अशाप्रकारे सर्व त्या माकडांपैकी कोणीही केळीकड़े बघायला सुद्धा तयार नाही.
तेंव्हा मग वैज्ञानिकांनी गरम पाणी घालणेच बंद केले.
मग वैज्ञानिकांनी त्या माकडांपैकी एक माकड बाहेर काढले
आणि
दुसरे एक नवीन माकड आत टाकले.
या नवीन माकडाने केळी 🍌 नजरेत पडताच शिडी चढ़ण्याचा प्रयत्न केला तोच जुनी सर्व माकडं मिळून त्या नवीन माकडाला झोडू लागलीत.
दुसर्‍या दिवशी वैज्ञानिक जुन्या माकडांपैकी आणखी एक माकड बाहेर काढून नवीन एक माकड आत टाकतात.
हे दुसरे नवीन माकड देखील केळी बघून शिडी चढ़ण्याचा प्रयत्न करताच इतर सर्व माकडं त्याला झोड़तात.
पण यात विशेष हे असते की काल आलेले नविन माकड सुद्धा या झोडणाऱ्या माकडात सामील असते ज्याच्या अंगावर कधीही गरम पाणी पडलेले नसते.
आता मारणाऱ्याला माहीत नाही
आपण का मारत आहोत?
आणि
मार खाणाऱ्याला माहीत नाही आपण का मार खात आहोत?
या नंतर वैज्ञानिक दररोज जुने माकड काढून नवीन माकड आत घालतात.
आणि
रोज तोच प्रकार घडतो.
नवीन माकड केळीसाठी शिडीकड़े वळले की,
उर्वरित सर्व माकडं त्याला मारतात.
मारणार्‍या माकडांमध्ये जुनी माकडं ज्यांना माहीत होतं की आपण का मारत आहोत आणी
त्यांच्यासोबतच नवीन माकडं ही सामील होती ज्यांनी कधीही गरमा-गरम पाणी अंगावर झेलले नव्हते.
अशा प्रकारे दररोज एक एक करून सर्व जुनी माकडं बाहेर काढून नवीन माकडं आत घालण्यात येतात.
प्रत्येक नवीन येणाऱ्या माकडाला शिडी चढण्याचा प्रयत्न केल्यास मार पडत असतो .
आता मात्र खोलीमध्ये सर्व नवीन माकडं असतात ज्यांनी कधीही त्या खोलीत अंगावर गरम पाणी पडण्याचा प्रकार पाहिलेला नसतो.
पण जर कोण्या एखाद्या माकडाने शिडी चढ़ण्याचा प्रयत्न केला की, इतर सर्व माकडं त्याला मारतात.
कारण आता ही प्रथा तिथे रूढ़ झालेली असते,
आपण का मारत आहोत याचे मूळ कारण माहीत नसून सुद्धा, फ़क्त कोणी त्या शिडीकड़े वळला की त्याला मारायचे बस्स एवढेच सर्वाना माहीत !!!

बोध:-
माणसांचे ही असेच आहे, आपण अनेक रुढी परंपरा मानतो.
पण आपल्याला त्यांचे मूळ कारण माहीतच नसते.
कारण त्या रुढी परंपरा सुरु झाल्या तेव्हा आपण नव्हतो , म्हणून आपण इतर लोकं करतात म्हणून करतो.
त्यामागची कारणे हेतू आम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही.
बरं , जी कारणे आम्हाला सांगण्यात येतात ती ही निसर्ग नियमानुसार , विज्ञानाच्या नियमानुसार पटणारी नसतात, शिवाय तर्काधिष्टित तर अजिबात नसतात. तरी सुद्धा आम्ही त्या माकडांसारखे "अंधानुकरण" करतो आणि स्वतःला 21व्या शतकातील , विज्ञान युगातील सुशिक्षित व्यक्ती समजतो.
म्हणून कोणतीही गोष्ट, रुढी, परंपरा यांच्या मागचे कारण नीट समजून, ते वैज्ञानिकदृष्टया, तार्किकदृष्टया खरे आहे किंवा नाही हे जाणून घेतल्याशिवाय त्यावर विश्वास करू नये.
फ़क्त इतर लोक असे करतात म्हणून आपण ही करतो , तर मग काही अर्थच नाही आपण घेतलेल्या शिक्षणाचा...!!!!!
सर्व सुशिक्षित ज्ञानी लोकांना समर्पित
मित्र- यावर्षी वॅकेशनचा काय प्लॅन आहे?

मी- काही विशेष नाही..
गेल्यावर्षी युरोपला नव्हतो गेलो.....
आता यावर्षी अमेरिकेला नाही जाणार..
कधी कधी मित्रांवरच केस टाकावी असे वाटते
.
.
.
.
.
.
.
.
.
.

.
निदान तारखेच्या निमित्ताने भेटतील तरी  कोर्टात

▪ " महाराष्ट्रा "बाबत माहिती▪

👉 स्थापना-  01 मे 1960
👉राजधानी - मुंबई
👉 राज्यभाषा - मराठी
👉🏼एकूण जिल्हे - 36
👉 एकूण तालुके-  355
( मुंबई उपनगर मधील अंधेरी बोरीवली कुर्ला ही फक्त शासकीय कामासाठी केलेली 3 तालुके मिळुन 358
 (355 + 3 = 358)
👉🏼 ग्राम पंचायत -  28,813
👉 पंचायत समित्या 355
👉 एकूण जिल्हा परिषद- 34
👉 आमदार विधानसभा  288
👉 आमदार विधानपरीषद 78
👉 महाराष्ट्र लोकसभा सदस्य 48
👉 सुमद्रकिनारा- 720 किमी
👉 नगरपालिका- 226
👉 महानगरपालिका- 27
27 वी मनपा पनवेल 1oct 2016
👉 शहरी भाग - 45.2 %
👉 ग्रामीण भाग 55 .8 %
👉 लोकसंख्या बाबतीत 2 रा क्रमांक
👉 क्षेत्रफळात 3 रा क्रमांक
महाराष्ट्राने देशाचा 9.36 % प्रदेश व्यापला आहे
👉🏼 महाराष्ट्राची घनता 365
 👉🏼देशातील 9.29% लोकसंख्या महाराष्ट्रात राहते.
👉🏼 महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या - पुणे  ( 94.3 लाख )
👉 महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा - सिंधुदुर्ग (8.50 लाख)
👉 संपुर्ण साक्षर 1ला जिल्हा सिंधुदुर्ग
👉 सर्वात कमी साक्षर जिल्हा
जनगणना 2011नुसार नंदूरबार 64.4 %
2014  पासुन पालघर 57.14 %
👉🏼MH लिंग गुणोत्तर  - 929
👉🏼सर्वाधिक रत्नागिरी - 1122
👉🏼MH बाल लिंग गुणोत्तर - 894
👉🏼सर्वाधिक पालघर - 967
👉🏼 महाराष्ट्रातील सर्वात जास्त निरक्षर लोक पुणे जिल्ह्यात  (10.71लाख ) आहेत.

👉🏼 अनुसुचित जाती पुणे प्रथम क्रमांकावर
👉🏼 अनुसुचित जमाती नाशिक प्रथम क्रमांकावर

👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा - गडचिरोली
👉 महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा - बीड
👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा - नंदूरबार
👉 महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा - गोंदिया
👉 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा - अहमदनगर
👉 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा - मुंबई शहर
👉 महाराष्ट्रातील उंच शिखर  कळसूबाई (1646मी)
👉 महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी - गोदावरी
👉 महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग - न्हावाशेवा पळस्पे 27 किमी
👉 महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपालिका - रहिमतपूर ( सांगली )
👉 पहिले मातीचे धरण गोदावरी - (गंगापूर) नदीवर
👉🏼 महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा - रत्नागिरी
👉 जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ - नागपूर
👉 भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई
👉 पहिला संपूर्ण डिजीटल     जिल्हा - नागपुर
(Oct 2016)