मेट्रीक पास झालो तेंव्हा


नंबर पेपरात घावला

अन सारा गांव कसा

माह्या स्वागताले धावला


कोनं केला सेकहेंड

कोन घेतला मुका

सार्याईन पोटात घातल्या

माह्यावाल्या चुका


गांवची मरीमाय

तवाच मले पावली

मामाची एक पोरगी

मह्यावर भावली


एका हाती हेंडल

एका हाती पेपर

सायकवर निंघाला

गांवातला टॉपर


मी पुळे अन माग पोट्टे

अशी निघाली वरात

पेलता पेलेना गर्दी

होती माह्या घरात


पास झालो तवा

सहावी सप्लीमेंट्री

होनार होती आता

कॉलेजात एंट्री


तवाच गर्दीतुन

नम्या आला हापत

मी चरकलो मनात

आनली काय आफत


नम्या म्हने पेपरात

जांगळबुत्ता झाला

पासच्या यादीत तुवा

चुकुन नंबर आला


~~सतीष देशमुख,पणज

९६०४९१२३५१

माणूस होशील का ?

ज्ञानपीठ विजेत्या लेखिका कै. महाश्वेता देवी यांची एक सुंदर कविता. कुणीतरी भल्यामाणसाने त्याचं केलेलं अतिशय सुरेख मराठीत भाषांतर. 

✒️✒️

आलास..?

ये, दार उघडंच आहे ...आत ये.

पण क्षणभर थांब....!!


दारातील पायपुसण्यावर 

अहंकार झटकून ये...!!


भिंतीला बिलगून वर चढलेल्या 

मधुमालतीच्या वेलावर

नाराजी सोडून ये...!!


तुळशीपाशी मनाचे सारे ताप सोडून ये,

बाहेरच्या खुंटीला सारे व्याप टांगून ये...!!


पायातल्या चपलांबरोबर 

मनातली नकारात्मकताही काढून ठेव ..!!


बाहेर खेळणाऱ्या मुलांकडून

थोडा खेळकरपणा मागून आण,

गुलाबाच्या कुंडीतलं थोडं हसू

चेहेऱ्याला लावून आण...!!


ये...


तुझी सारी दुःखं, सारे प्रश्न 

माझ्यावर सोपव.

तुझ्या दमल्या-भागल्या जीवाला

प्रेमाच्या चार गोड शब्दांचे विंझणवारे घालते...!!


ही बघ....


तुझ्यासाठीच ही संध्याकाळ अंथरली आहे मी.

सूर्य क्षितिजाला बांधलाय आणि 

आकाशी गुलालाची उधळण केलीयं...


अन्


प्रेम आणि विश्वासाच्या मंदाग्नीवर

चहा उकळत ठेवलाय.

तो घोट घोट घे....


ऐक ना ...

इतकंही अवघड नाहीये रे जगणं !          

फक्त, तू *माणूस* बनून ये...!!


*_पूर्वीचा काळ बाबा,_*

*_खरंच होता चांगला,_*

*_साधे घरं साधी माणसं,_*

*_कुठे होता बंगला ?_*


                     *घरं जरी साधेच पण,*

                     *माणसं होती मायाळू,* 

                     *साधी राहणी चटणी भाकरी,* 

                     *देवभोळी अन श्रद्धाळू.*


*_सख्खे काय चुलत काय,_* 

*_सगळेच आपले वाटायचे,_*

*_सुख असो दुःख असो,_* 

*_आपुलकीने भेटायचे._*


                    *पाहुणा दारात दिसला की,* 

                    *खूपच आनंद व्हायचा हो,*

                    *हसून खेळून गप्पा मारून,*

                    *शीण निघून जायचा हो.*


*_श्रीमंती जरी नसली तरी,_*

*_एकट कधी वाटलं नाही,_*

*_खिसे फाटके असले तरीही,_*

*_कोणतंच काम रुकलं नाही._*


                    *उसनं पासनं करायचे पण,* 

                    *पोटभर खाऊ घालायचे,*

                    *पैसे आडके नव्हते तरीही,*

                    *मन मोकळं बोलायचे.*


*_कणकेच्या उपम्या सोबत,_* 

*_गुळाचा शिरा हटायचा,_*

*_पत्रावळ जरी असली तरी,_*

*_पाट , तांब्या मिळायचा._* 


                    *लपाछपी पळापळी,* 

                    *बिन पैशाचे खेळ हो,*

                    *कुणीच कुठे busy नव्हते,*

                    *होता वेळच वेळ हो.* 


*_चिरेबंदी वाडे सुद्धा,_*

*_खळखळून हसायचे,_*

*_निवांत गप्पा मारीत माणसं,_* 

*_ओसरीवर  बसायचे._*


                    *सुख शांती समाधान " ते "*

                    *आता कुठे दिसते का ?*

                    *पॉश पॉश घरा मधे,*

                    *" तशी " मैफिल सजते का ?*


*_नाते गोते घट्ट होते,_*

*_किंमत होती माणसाला,_*

*_प्रेमामुळे चव होती,_*

*_अंगणातल्या फणसाला._* 


                    *तुम्हीच सांगा नात्या मध्ये,*

                    *राहिला आहे का राम ?*

                    *भावाकडे बहिणीचा हो,* 

                    *असतो का मुक्काम  ?*


*_सख्खे भाऊ सख्ख्या बहिणी,_* 

*_कुणीच कुणाला बोलत नाही,_*

*_मृदंगाच्या ताला वरती,_*

*_गाव आता का डोलत नाही._* 


                    *प्रेम , माया , आपुलकी हे,*

                    *शब्द आम्हाला गावतील का ?*

                    *बैठकीतल्या सतरंजीवर,*

                    *पुन्हा पाहुणे मावतील का ?*


*_तुटक तुसडे वागण्यामुळे,_*

*_मजा आता कमी झाली,_*

*_श्रीकृष्णाच्या महाला मधुनी,_*

*_सुदामाची सुट्टी झाली._* 


                    *हॉल किचन बेड मधे,*

                    *प्रदर्शन असतं वस्तूंचं,*

                    *का बरं विसर्जन झालं,* 

                    *चांगुलपणाच्या अस्थीचं ???*

🙏🏻🙏🏻🙏🏻

ब्रेक्स

एकदा फिजिक्सच्या टिचरने मुलांना प्रश्न विचारला,

" कारमधे *ब्रेक्स* का लावलेले असतात ? "


त्यावर निरनिराळी उत्तरे आली,

*थांबण्यासाठी*


*वेग कमी करण्यासाठी*


*अपघात टाळण्यासाठी*


परंतू सर्वात चांगले उत्तर होते,

*"जास्त वेगाने जाता येण्यासाठी..!!"*


गोंधळले असाल ना अशा उत्तराने..... मग असे कसे..? जरा विचार करा.....!


जर तुमच्या कारमधे *ब्रेकच* नसते तर तुम्ही जास्तीत जास्त किती वेगाने गाडी चालवाल..?

कारला *ब्रेक* आहेत म्हणूनच तुम्ही वेगाने गाडी चालवण्याचे धाडस करू शकता, तुमच्या इच्छित स्थळी पोहोचू शकता.


      जीवनातही तुम्हाला *आई* *वडील, सासु सासरे* , *कुटुंब* इ. रूपात *ब्रेक्स* मिळतात. तुम्हाला वाटते की, ते तुम्हाला वेळोवेळी टोकतात , अडवतात, शंका कुशंका उभ्या करतात, तुमच्या मार्गात अडथळे आणण्याचे काम करतात. म्हणून तुम्ही त्यांच्याविषयी चिडचिडे होतात.


परंतु लक्षात ठेवा, जीवनात वेळोवेळी आलेल्या अशा *ब्रेक्समुळेच* तुम्ही आज आहे ते स्थान मिळवू शकला आहात. असे *ब्रेक्स* नसते तर तुम्ही कुठतरी भरकटला असता, अपघातात किंवा संकटात सापडला असता.


म्हणूनच जीवनात अधुनमधून येणाऱ्या अशा *" ब्रेक्सची "* जाण ठेवा.....

 हाडे गोठवून टाकणाऱ्या एका कडाक्याच्या थंडीच्या रात्री, एक अब्जाधीश रस्त्यावर एका वृद्ध गरीब माणसाला भेटला. त्याने त्याला विचारले, " तुम्हाला बाहेर थंडी वाटत नाही का? तूम्ही तर थंडीचे स्वेटरही घातलेले नाहीये?"


तेव्हा त्या गरीब म्हाताऱ्याने उत्तर दिले, "माझ्याकडे गरम स्वेटर नाही परंतु मला थंडीची सवय आहे." अब्जाधीश म्हणाला, "थांबा मी आता घरी जातो आणि तुमच्यासाठी एक चांगले गरम स्वेटर घेऊन येतो"


थंडीपासून संरक्षण देणारे स्वेटर मिळणार या विचाराने तो गरीब म्हातारा खूप आनंदित झाला आणि म्हणाला की "साहेब खूप उपकार होतील " अब्जाधीश घरी गेल्यावर काही तरी कामात स्वेटर चे विसरून गेला.


सकाळी त्याला त्या गरीब म्हातार्‍याची आठवण .झाल्यावर तो स्वेटर घेऊन तो म्हातारा रात्री ज्या जागी भेटला तिथे गेला. परंतु म्हातारा जीवघेण्या थंडीने कडकडून मरण पावला होता.


अब्जाधीश माणसाला त्याच्या प्रेताजवळ एक चिट्ठी दिसली. त्याने ती चिठ्ठी वाचली. त्यात लिहिले होते, “ साहेब जेव्हा माझ्याजवळ गरम कपडे, स्वेटर नव्हते तेव्हा माझ्याकडे थंडीविरुद्ध लढण्याचे मानसिक शक्ती होती. परंतु जेव्हा तुम्ही मला गरम स्वेटर देण्याचे आश्वासन दिले तेव्हा आता थंडी पासुन संरक्षणासाठी एक छान गरम स्वेटर मिळणार या आशेने माझी थंडी विरुद्ध लढण्याची मानसिक शक्ती संपली"


तात्पर्य: 

 जर आपण एखाद्याला दिलेला शब्द, आश्वासन, वचन पाळू शकत नसू तर ते देऊ नका. दिलेला शब्द आपल्यासाठी जरी महत्वाचा नसला तरी तो दुसर्‍या एखाद्या गरीब, लाचार व्यक्तीसाठी बरंच काही असू शकतो.

..🙏🏻

सपन


       येक दिवस सपनात मी

       झालो गावचा सरपंच

       झोपीतच माह्यी राज्या

       छाती फुगली दोन इंच


        ग्रामपंचायतच्या अंदर

        सभा माह्यी थाटली 

        सरपंचाची सभा मले

        इंद्रा सारखी वाटली


        मी कपडे घालो भारी

        रेमंड कंपनीचा कोट

        मले सरपंच पाहुन

        काई लोकाइचं दुखे पोट


        माह्या बुढा म्हने मले

        तु हिसोबात राय बाबु

        कोनतीही असो योजना

        सारा पैसा आपुनच दाबु


        कागदावरचा कारभार

        खराखुरा पाह्याचा

        भाताच्या पयले बाबु

        गुई नाही खायाचा


         वरून रायजो चांगला

         अंदरून करजो बिगाळ

         ठेकेदारासंग लावजो

         कमिशनचं जुगाळ


         ठेकेदारासंग बाबु तु

         पैशाचं बोल कडक

         पयले करजो आपल्या

         घरा पुढची सडक


         पुढच्या पाच वर्षात 

         मुश्किल हाये येनं

         म्हणुन म्हनतो बाबु 

         आपलं सरकं करून घेनं


         मिटींगीत म्हन फक्त

         पैसा विकासाले लावु

         तुमच्या येटायातला रोड

         दुसर्या टप्पयात पावु


         कागद दाखोजो खरा

         बाकी चालू दे खोटं

         आपलं जुनं घर पाळुन

         तथी मकान बांधु मोठं


         ग्रामसेवकाच्या सल्ल्यानं

         माह्यी बाजु झाली दमदार

         मले घरी येवुन भेटत

         खासदार अन् आमदार


         झोपीतच राज्या म्या

         बुलेट गाळी काळ्ळी

         गाळीले किका मारू मारू

         आंगावरची सातरी म्या 

         फाळ्ळी


        सपनात मी वसनावलो

        पावला आपल्याले देव

        मुत्यासाठी झोपीतुन मले

        येकदम आला चेव


        झोपीतुन उठल्या बरोबर

        बायको मले भेटली

        खरंखुरं सांगा म्हने

        सातरी कशी फाटली


        सरपंचाच्या नांदात मले

        सपन दिसलं भेसुर 

        झोपीत सातरी फाटली

        त्यात माह्या काय कसुर


        बायकोसंग बोलुन म्या

        कसतरी निपटलं

        बुढ्यानं माह्ये पाय धरून

        खाली मले आपटलं


        बुढा राज्या माह्या 

        लयच् होता तापड

        कानाखाली देली माह्या

        उलट्या हाताची झ्यापड


        इनाकारन मले तु

        दाखु नोको पावर

        सरपंचाच्या नांदात लेका

        इकुन बसला वावर


        त्या दिवसा पासुन म्या

        दोनी कान धरले हाती

        चुकूनही सरपंचाच सपन

        मले दिसु नोको राती

        चुकुनही सरपंचाचं सपन

        मले दिसु नोको राती

 *आजचा विचार*

           (व.पु.काळे)

-----------------------------


आयुष्यात ठेचा लागल्याच पाहिजेत, अक्षरशः रक्तबंबाळ व्हावं इतक्या !!

जवळची माणसे तिऱ्हाईतासारखी वागली पाहिजेत, गरज असताना सोडून गेली पाहिजेत, कुठल्यातरी क्षणी भीतीने गाळण व्हावी, सगळ्यांच्यात असून एकटेपणाची भावना यावी, एकाचवेळी सगळी संकटे यावीत आणि इतकी फाटावी की त्या क्षणी असं वाटावं की आता सगळंच संपलं!


परिस्थितीसमोर गुडघे टेकायची वेळ यावी, कधीतरी घोर अपमान व्हावा, कुठेतरी स्वाभिमान दुखावला जावा. कधी तरी कुणाच्या पाया पडायला लागावं, गरज नसताना सुद्धा कुणाची तरी हजारवेळा माफी मागायला लागावी, कित्येक रात्री ह्या त्रासांनी निद्रेचा नाश व्हावा, अक्षरशः सगळं सोडून जावं की काय असं वाटावं.!!

अन् मग बघावं ह्या वेदनांतून तावून सुलाखून निघाल्यावर उभं राहतं ते एक वेगळंच अजब रसायन.!!


"ज्याला कुणाच्या असण्या-नसण्याचा काही फरकच पडत नाही. तो जगतो फक्त "आलात तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्याशिवाय" या एकाच तत्वावर.!!"

भीतीने फाटली, अपमान पदरी आला, फसवणूक झाली तरी हारण्याच्या, मागे हटण्याच्या विचारांना जो कधीच भीक घालत नाही.!!


ज्याचा विश्वास असतो फक्त स्वतःवर आणि तो बिंबवून घेतो "साला कुछ भी होने दे मगर हम हटेंगे नहीं!!" और हटनेका भी नहीं !!

पण कसंये एवढं सगळं होण्यासाठी आधी ठेचा लागाव्याच लागतात. जीवनाचा एक अध्याय... एकाची समाप्ती तर दुसऱ्या अध्यायाचा आरंभ.!!

त्यातूनच तर माणूस शिकत असतो, आणि घडतही असतो.