एक सरदार आपल्या घरासमोर आपल्या कंपाऊंडमध्ये झाडांना पाणी देत होता. तेवढ्यात तिथे बाईकवर एक पोलीस आला. सरदारजीच्या घरासमोर गाडीवरुन उतरला. सरदारजीच्या घरापासून 40-50 फुट पळतच समोर गेला आणि थोड्या वेळाने सरदारजीच्या घरासमोर परत आला. नंतर तो दुसऱ्या बाजुला 30-40 फुट पळत गेला आणी थोड्या वेळाने पुन्हा परत आला. झाडांना पाणी देणारा सरदारजी हे सगळं पाहतच होता. सरदारजीच्या लक्षात आलेकी कदाचित पोलीस कुण्या गुन्हेगाराला शोधत असावा.
''काय साहेब ... कुणाला शोधताय?'' सरदारजीने विचारले.
पोलिस सरदारजीजवळ गेला. त्याने खिशातून एक फोटो काढला आणि सरदारजीला दाखवित म्हणाला,
'' हा एका अट्टल गुन्हेगाराचा फोटो आहे... मी त्यालाच शोधत आहे... तुम्ही याला एवढ्यात इथून जातांना बघितले तर नाही? '' पोलिसाने विचारले.
सरदारजीने फोटो हातात घेतला आणि निरखुन त्या फोटोकडे पाहाले. फोटो पोलिसाला परत करीत सरदारजी म्हणाला, '' नाही ... मी नाही बघितलं ''
पोलिस फोटो परत घेवून तिथून जावू लागला. थोड्या अंतरावर गेल्यावर सरदारजीने आवाज दिला, '' साहेब एक मिनिट''
पोलिस वळून पुन्हा सरदारजीजवळ आला.
'' जरा तो फोटो तर दाखवा ''
पोलिसाने पुन्हा तो फोटो सरदारजीकडे दिला.
सरदारजीने थोडा वेळ त्या फोटोकडे पुन्हा निरखून बघितले आणि म्हटले,
'' मला एक गोष्ट कळत नाही ... जर हा एवढा अट्टल गुन्हेगार होता तर त्याचा फोटो काढला तेव्हाच त्याला का पकडलं नाही ?''
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा