नशाबंदी

एक चित्ता सिगरेट पिणारच असतो, तेवढ्यात एक उंदीर समोर येतो आणि चित्त्याला म्हणतो ........

"मित्रा चित्त्या , माझ्या बांधवा, सोड हि नशा, बघ हे जग किती सुंदर आहे, चाल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा,

चित्ता थोडा वेळ विचार करतो आणि उन्द्रासोबत चालायला लागतो........
... ...
पुढे हत्ती दृग्स घेत बसलेला असतो, त्याला सुद्धा पाहून उंदीर म्हणतो,

"मित्रा हत्ती, माझ्या बांधवा, सोड हि नशा, बघ हे जग किती सुंदर आहे, चाल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा,

हत्ती सुद्धा थोडा वेळ विचार करतो आणि उन्द्रासोबत चालायला लागतो........

थोडं पुढे गेल्यावर एक सिंह विस्की चा पेग भरत असतो............

त्यला हि पाहून न घाबरता उंदीर त्याला म्हणतो......

"मित्रा सिंहा, माझ्या बांधवा, सोड हि नशा, बघ हे जग किती सुंदर आहे, चाल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा,

सिंह त्याचा ग्लास बाजूला ठेवतो आणि उंदराच्या कानाखाली ७ ८ वेळा जाळ काढतो........

हे पाहून हत्ती सिंहाला म्हणतो "अरे सिंहा उंदीर चांगले सांगतो, का मारतोस त्याला"

सिंह म्हणतो "ह्याच्या सोबत ४ वेळा पूर्ण जंगल फिरून आलोय. हा हरामखोर जेव्हा भंग पितो तेव्हा असाच बोलतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा