माझा हा विठोबा येईल गे केव्हां । जेवीन मी तेव्हां गोणाबाई ॥१॥
जाउनी राउळा तयासी तूं पाहें । लवकरी बाहे भोजनासी ॥२॥
भरलिया रागें क्रोध त्याचा साहे । लवकरी बाहे भोजनासी ॥३॥
ज्ञानेश्वराघरीं असेल बैसला । जाउनी विठ्ठला पाहें तेथें ॥४॥
जनी म्हणे देवा चला पुरुषोत्तमा । खोळंबला नामा भोजनासी ॥५॥
रचना -संत जनाबाई

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा