क्षीरसागरीचा हरी पाहूं आल्या गोपी । अष्टनायका सोळा सहस्त्र तितक्या आटोपी ॥ध्रु०॥
जशी जिची भावना तसाच त्या रंगा । कोठें वेणी फणी न्हाणी धुणी नीत उठून हाच दंगा ।
तीचा योग जणुं भागिरथी गंगा । कोठें विलास अथवा कोणाघरीं मुनीं ब्रह्मचारी नंगा ।
एकांत लक्ष्मीकांत गेला झोपी । अष्टनायका सोळा सहास्त्र तितक्या आटोपी ॥१॥
करी थट्टा घटाला धक्का फोडी सुगडें । तरतरा पदर फरफरा फेडी लुगडें ।
गोपाळ मित्र नको मनांत लाजूं गडे । हें तुझेंच कवतुक वस्त्राआड उघडें ।
धर सुद दाट दहीं दूध लोणी ओपी । अष्टनायका सोळा सहस्त्र तितक्या आटोपी ॥२॥
वनीं धेनु चारितां कामळ हातीं काठी । माधवा थवा भोताला पशुदाटी ।
न्याहारीच्या बाहारी मग दहीकाला वाटी । खर्कटी बोटें आवडीनें देव चाटी ।
फंदी मूल म्हणे तुझी कळा तुला सोपी । नसे अंत कृतांता क्षणामधें चोपी ।
अष्टनायका सोळा सहस्त्र तितक्या आटोपी । क्षीरसागरीचा हरी पाहूं आल्या गोपी ॥३॥
कवी- सवाईफंदी

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा