नट धीट अचाट राही नटला सारंगपाणी । पतिव्रता चंद्रावळ भोगिली त्या भगवंतांनीं ॥ध्रु०॥
अप्रतीम चंद्रावळ पाहून भुलले वनमाळी । तिचा नेम असा कीं सूर्य टळेल एक वेळीं ।
परि ती सत्कर्माशीं न टळे, कुकर्मा वेगळी। राहीची धाकुटी बहिण ऐका चंद्रावळी ॥चाल॥
फुल सव्वाशेर भार वजन चंद्रावळ । मृगनयना एक एक डोळा दिसे चंचळ । कुच उरीं हालती दोन्ही मुक्ताफळ ।
अंगीं वीर्य जसें कुपींतील जल निर्मळ । ह्रदयावर जोबन दोन्ही हालती कमळ । वेणींत केवडा सुगंध परिमळ ।
गोरी भुरकी गाला वरता हिरवा तीळ । मंजूल शब्द जशि टाहो करिति कोयाळ । कंठांतुन पिक दिसे अशी वेल्हाळ ।
नार कळसूत्र दिसे बाहुली । नाशीक चोंच राव्याची देह कोमळ । भर सव्वाशेर वजन चंद्रावळ ।
नार फारच हलकी जसें तुंबिनीफळ । हा तिचा नेम कीं राहावें निर्मळ । काय सूर्य टळेल नेमाशीं एक वेळ ।
परि ती न टळे ऐशी चंद्रावळ । त्या चंद्रावळीचा नेम असा असेल । त्या नगरामधीं स्वतां हरी शिन्नळ ।
चंद्रावळ पाहतां न पडे त्याशीं कळ । तेव्हां भगवंतानीं तिथें मांडिला खेळ । राहीचें रुप मग नटले तमाळनिळ ।
अलंकार अंगावर घालुनि तेव्हां भगवंतांनीं । राही झाले भगवान अलंकाराची मांडणी । नट धीट अचाट० ॥१॥
तेव्हां राहीचें रुप नटले ऐका ह्रषिकेशी । अलंकार अंगावर घालुनि तेव्हां त्या समयाशीं ।
जडिताचा शृंगार कोंदणे हिरे जिनसा जिनसी । राही काय त्या पुढें किं नटला श्रीरंगा ऐशी ॥चाल॥
राहीचे रुप मग नटला मुरलीधर । घालुनि मूद राखडी राव माथ्याबर । तिपेड गंगावन वेणी गुंफी पदर ।
मस्तकीं बिजवरा माथ्यावर मासा बोर । नाकामधीं नथ सरज्याची वर बिल्लोर । मोत्यांनीं भरला भांग बहुत सुंदर ।
कर्णफूल शिसफूल तानवडा वर चौफेर । वेल्या, बुगडया, काप पडे प्रकाश गालावर । कानीं धेंडया आणिक वेलबाळया मोत्याचे सर ।
पानबाळ्या तिथे मासबाळ्या मारी लहर । नालबाळ्या अबदागीरबाळ्या तर्कधर । खुंटबाळ्या साध्या बाळ्या त्याजवर ।
मोतीबाळ्या दाळिंबीबाळ्या त्या गंभीर । बोंडबाळ्या कोथिंबिरीबाळ्या बहुत सुंदर । चंद्रबाळ्या आणिक चिंचबाळ्या त्याजवर ।
घोसबाळ्या पर्डीच्या बाळ्या ल्याली सुंदर । झुबुकबाळ्या मखमालीबाळ्या तानोडयावर । खिरणीबाळ्या पोवळ्याच्या बाळ्या तर्कधर ।
हिरी बाळ्या कंगणीबाळ्या मनोहर । नागबाळ्या फणिंद्रबाळ्या हातीं हातसर । मुदबाळ्या पठाडी बाळ्या नथेवर मोर ।
हौदीबाळ्या पतंगीबाळ्या तुटती तार । कुर्डुबाळ्या मंडवीबाळ्या चाले छ्बीदार । फुलवाळ्या बतिसा बाळ्यांचा प्रकार ।
कानीं कुडुक ते बहू सुंदर दिसती । ताईतपेटी दुल्लडी सात पदर । पुतळ्यांची बोरांची जवाची माळ नवसर हार ।
दंडी बाजुबंद गजरानें भरला कर । गुजराथी कांकणें अंगुस्तान न जांहगिर । रत्नजडित पाटल्या पवच्या मनोहर ।
दंडी वेळा वाकडया गुजर्याचा झणत्कार । बसविले नागिना मंगलसूत्रावर । एकदाण्याची खरबुजी तर्हा सादर ।
चितांग चिंचपेटया मारी लहर सुंदर । अणवट बिजवे विरोद्या वरति स्थापिले मोर । हातिं मोतीसर वाक्या साकळ्या घालुनिया चरणीं ।
राही झाले भगवंत श्रृंगार झाला येथुनी । नट धीट अचाट० ॥२॥
चंद्रवळीघरीं गेले श्रीहरी राहीरुप धरुन । परिचारिका सांगती आली बाई तुमची बहिण । दिला बसाया पाट ऐका त्या चंद्रावळिनं ।
चंद्रावळ म्हणे बाई आज तुझें कोणीकडे येणें । चाल । राही म्हणे आजग बाई उदासलें मन । म्यां म्हटलें आज यावें बहिणीला भेटून ।
तेव्हां चंद्रावळ पाहे जरा तिजकडे न्याहाळून । बाई तुझ्या उरावर कांगे दिसेना स्तन । तुझी पुरुषाची आकृति दिसती जाण ।
तेव्हां उराकडे पाहे अवचित नारायण । तेवढीच कळा विसरला मधुसूदन । ह्मणे आतां हें सोंग न्यावें संपादुन ।
पुसूं नको ग सखये माझें दुःख मी जाणें । भाल्याची जखम काय होतें तुला सांगून । एके दिवशीं सत्यभामा मनमोहन ।
दोघे निजलेग मजला खोलिमध्यें कोंडून । त्या काळजीनें हा जीव गेला कर्पुन । पुसूं नको गवळ्या घरिं कष्टाची धन ।
चंद्रावळ ह्मणे बाई आतां तुला न्हाणिन । मी न्हाइना बाई खुण केली वेणिला त्यानं । श्रीकृष्णाची कदर फार दारुण ।
आतां तुलाच न्हाणिन मग घरां जाइन । आतां भ्रतार येईल तुझा बाहेरुन । तो थट्टा करील माझी मेव्हणीच्या नात्यानं ।
तेव्हां ठेवी चुलीवर गुंड पाण्याचा राही तत्क्षणीं । असे हरीचे खेळ देव मग चंद्रावळ न्हाणी । नट धीट अचाट राही० ॥३॥
राही ह्मणे चंद्रावळी उठ बाई मग करी स्नान । पितांबर परिधान चंद्रावळ ठेवी फेडून । चौरंगावर उभी ठाकली चंद्रावळ नग्न ।
राही गंगालयांत पाणी घाली त्या हंडयांतून । चाल । राही घाली ऊन पाणी चंद्रावळीवर दाटून । चंद्रावळ म्हणे बाई पाणी फारच ऊन ।
ऊन पाणी बरें त्यानें जाइल तुझा शीण । ऐसें चंद्रावळीशीं न्हाणिलें राहीनं । त्या चंद्रावळिचा पति आला बाहेरुन ।
त्यानें राही पाहिली करि मग हास्यवदन । आज कोणिकडेग मेहुणी केलें येणं । म्हणे उगीच आलें इला भेटाया कारणं ।
तेव्हां चंद्रावळिनें स्वयंपाक करुन । ह्या पुर्या पोळ्या घावण्या तेथें काय उणें । तेलच्या आणिक फेण्या गुरोळ्या जाण ।
आणिक बुंदीचे लाडू वाढी युक्तीनं । केशरी भात वर केळाचें शिखरण । लोणकढें तूप आणविलें मागून तिनें ।
भोजन करितां पति चंद्रावळिचा म्हणे । तुम्ही दोघी बहिणी निजा महालिं जाउन । आज आम्ही एकटे निजूं बाहेर जाऊन ।
तेव्हां पतिला तोशक दिला दारिं अंथरुन । राही आणि चंद्रावळी दोघी गेल्या निजभुवनीं । नट धीट अचाट राही नटला ॥४॥
बंगल्यामधिं अरास केली त्या चंद्रावळिनं । अबिर बुक्का सुवास आणिला राही कारणं । पलंग तिवाशा लोड जंबुखा टाकून ।
बहुता दिवशीं राही बहिण आली म्हणुन । चौफुला ठेवुन मधीं पानपुडा आणविला । चहूंभोतीं समया मधिं कंदिल लाविला ।
राही म्हणे दिव्यानें झोंप येईना मला । त्या चंद्रावळीनें दिप विझवुन अंधार केला । तेव्हां निद्रा आली त्या चंद्रावळिला ।
अंगाशीं अंग लागतां देव चंचळ झाला । धरि हळू स्तनाला मुखचुंबन रगडिला । जागी झाली चंद्रावळ हरि ऐसा भासला ।
अरे पाप्या दुष्टा भंग तपाचा केला । एक वेळ मीं हांसत होतें चंद्राला । मी पतिव्रता त्वां कसा डाग लाविला ।
जर अशी गोष्ट ही सांगावी भ्रताराला । तो म्हणेल स्त्रीचा पुरुष कैसा झाला । दोहिंकडून आड ना विहीर झाली मला ।
तेव्हां हरी म्हणे इला नवल काय दाखवावें नयनीं । अकस्मात दिवे लाविले तिच्या निजभुवनीं । नट धीट अचाट राही नटला सारंगपाणी ॥५॥
विष्णुदुताला आज्ञा केली पहा भगवंतानं । स्वर्गाहुन विमान आणिलें तत्क्षणीं जाण ।
देवानें चंद्रावळ विमानांत बसवून एकवीस स्वर्गें चंद्रावळिला दाखविलीं जाण । श्रीहरीनें चंद्रावळ नेली मोक्षपदाशीं ।
सृष्टीची घडमोड यमपुरी दाखवी तिशीं । सदाशिव दाखविला कैलासासी । खालीं उतरुनिया आणिली समुद्रापाशीं ।
खांबाची द्वारका दाखवी चंद्रावळीसीं । तेव्हां देव ठसला चंद्रावळिसीं । घाली लोटांगण तेव्हां हरिचरणाशीं ।
नाहिं झाला भोग तुम्ही फेडून घ्या असोशी । देवानें आड धरिलें सुदर्शनासि ।
केलि सहा महिन्यांची रात्र त्या समयासी प्रीतिनें भोगिलें दिलें अलिंगन तिशीं । चंद्रावळ म्हणे देवा नको अंतर देऊं मशीं ।
तेव्हां देव बोलले त्या चंद्रावळीशीं । जेव्हां स्मरशिल तेव्हां आहें तुजपाशीं । फंदिमलिकचा ठिकाण पोखरिशी ।
करि अभंग लावण्या धाक पडे वैर्याशीं । फंदि अनंतची लपेट झपेट ही विकट बिकट धरणी ।
रतिरती समजुन कसली पहा ब्राह्मण राणी । नट धीट अचाट राही नटला सारंगपाणी ॥६॥
कवी - अनंत फंदी

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा