अनंत चतुदर्शीस अनंता का? तुझे विसर्जन व्हावे
पुढील वर्षा परत ये असे जनतेने का? म्हणावे||धृ||
कोणी जरी ठरविले तरी तु आहेस चराचरात
कशास! एवढा अवडंबर ह्या पृथ्वीवरी मानवात
दिवस थोडे, सोंग फार ,घडतंय तुच बघावे
पुढील वर्षा परत ये असे जनतेने का? म्हणावे||1||
नको तो धांगडधिंगा, नको दारूडे अफाट
पैशाची असे दैंना, तरी खर्च भरमसाठ
तुला पूजण्या काही लागत नाही, सर्वत्र तू हे त्यासी कळावे
पुढील वर्षा परत ये असे जनतेने का? म्हणावे||2||
दृष्टांत देऊनी तू सांग सर्वास एवढे
तुझ्या प्रती माझे मत मी आहे मांडले
सकलांचा तुच त्राता, तुझे गोडवे सर्वांनी गावे
पुढील वर्षा परत ये असे जनतेने ना! म्हणावे ||3||
घरात असावी पूजा, नका विसर्जन करू माझे आता
कोणत्याही धातूच्या मुर्त्यांनी मखरात ठेवा आता
विसर्जन नको, सुचविले मी तुला, तू सर्वां हे सांगावे
पुढील वर्षा परत ये असे जनतेने ना! म्हणावे
- रागिणी जोशी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा