धांव घाली विठू आता चालू नको मंद। बडवे मज मारिति ऐसा काही तरि अपराध ॥१॥

विठोबाचा हार तुझे कंठीं कैसा आला। शिव्या देती म्हणती महारा देव बाटविला ॥२॥

अहोजी महाराज तुमचे द्वारींचा कुतरा। नकाजी मोकलू चक्रपाणि जिमेदारा ॥३॥

जोडुनिया कर चोखा विनवितो देवा। बोलिला उतरी परि राग नसावा ॥४॥


  -  संत चोखामेळा
सुखाचें हें नाम आवडीनें गावें । वाचे आळवावें विठोबासी ॥१॥

संसार सुखाचा होईल निर्धार । नामाचा गजर सर्वकाळ ॥२॥

कामक्रोधांचें न चलेचि कांही । आशा मनशा पाहीं दूर होती ॥३॥

आवडी धरोनी वाचें म्हणे हरिहरि । म्हणतसे महारी चोखियाची ॥४ ॥


  -  संत चोखामेळा
सुख अनुपम संतांचे चरणीं । प्रत्यक्ष अलका भुवनी नांदत असे ॥१॥

तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली । जेणें निगमावली प्रगट केली ॥२॥

संसारी आसक्‍त माया-मोह रत । ऐसे जे पतीत तारावया ॥३॥

चोखा म्हणें तेच ज्ञानदेवी ग्रंथ । वाचिता सनाथ जीव होती ॥४॥


   -  संत चोखामेळा
चोखा माझा जीव चोखा माझा भाव।
कुलधर्म देव चोखा माझा।।

काय त्याची भक्ति काय त्याची शक्ति।
मोही आलो व्यक्ति तयासाठी।।

माझ्या चोखियाचे करिती जे ध्यान।
तया कधी विघ्न पडो नदी।।

नामदेवे अस्थि आणिल्या पारखोनी।
घेत चक्रपाणी पितांबर।।


   -  संत नामदेव
श्रीमुखाची शोभा कस्तुरी मळवट ।
उभा असे नीट विटेवर ॥१॥

कर दोनीं कटीं कुंडल झळकती ।
तेज हे फाकती दशदिशां ॥२॥

वैजयंती माळा चंदनाची उटी ।
टिळक लल्लाटीं कस्तुरीचा ॥३॥

चोखा म्हणे माझ्या जीवींचा जीवनु ।
पाहतां तनु मनु भुलोनी जाय ॥४॥

    -  संत चोखामेळा

पंढरीमहिमा

अनादि निर्मळ वेदाचें जें मूळ ।
परब्रह्म सोज्वळ विटेवरी ॥१॥

कर दोन्ही कटीं राहिलासे उभा ।
नीळवर्ण प्रभा फांकतसे ॥२॥

आनंदाचा कंद पाउलें साजिरीं ।
चोखा म्हणे हरी पंढरीये ॥३॥


    -  संत चोखामेळा
जर कोणती स्त्री तुमची गोष्ट किंवा सांगणं 5 मिनिटात ऐकते , तर ती तुमची आई आहे। 👵

जर 15 मिनिटात ऐकते, तर ती तुमची बहिण आहे।👩

जर ती 30 मिनिटात ऐकते, तर ती तुमची मुलगी आहे👧

पण जर ती वारंवार बोलून, सांगून देखील ऐकत नसेल तर , ती...🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔



🤔




🤔




🤔


🤔



🤔




ती बहीरी आहे।😵

प्रत्येक वेळी 'बायकोच' कशी गृहीत धरता !!!

😳😳😃😃😲😲😜😜🤣