ओलेता गंधीत वारा
आला घेऊन सांगावा
पाझरला आतुर मेघ
त्या दूर अनामिक गावा

मन चातक व्याकुळ वेडा
इतुकेच म्हणे हरखून
येईल मेघ माझाही
जाईल मला भिजवुन

व्याकुळ अशी नक्षत्रे
कोरडीच केवळ जाती
भिजण्याच्या आशेवरती
कोमेजुन गेल्या राती

मिटल्यावर डोळे अजुनी
ऐकते सरींचे साद
त्या तेव्हाच्या भिजण्याचे
अंतरी अजुन पडसाद

- गुरु ठाकूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा