रव्याचे थालीपीठ

१ कप रवा
एखादी कोवळी काकडी (मोठी असेल तर अर्धी)
१/४ कप बारीक चिरलेला कांदा
२-३ हिरव्या मिरच्या
१/४ कप ओले खोबरे
मुठभर कोथिंबीर चिरुन
चवीप्रमाणे मीठ
पाणी लागेल तसे



कृती -
पाणी वगळून बाकीचे सगळे एकत्र करायचे. लागेल तसे पाणी घालत साधारण भज्याच्या पिठासारखे भिजवायचे. नेहेमीच्या डोश्याच्या पिठाहून हे पीठ घट्ट असते आणि आपल्या भाजणीच्या थालिपीठाहून बरेच सैल असते.
तवा तापत ठेवायचा. त्यावर हाताने साधारण १/४ कप पीठ घालायचे आणि हातानेच पीठ पसरवत थालिपीठासारखे करायचे. गरज लागेल तसे थोडे थोडे पाणी लावत एकसारखे थालीपीठ पसरायचे.
एक बाजू भाजून घ्यायची. उलटवून दुसरी बाजू भाजायची.
गरम गरम थालिपीठ लोण्याबरोबर आणि चटणीबरोबर खायचे.
निस्त्याच्या चटणीबरोबर हे डोसे एकदम भारी लागले.

टीपा -

गरम तव्यावर थालीपीठे लावणे सुरुवातीला थोडे अवघड गेले तरी सवयीने पटापट जमते.
कलिगडाचा पांढरा भाग खिसुन घालायला हरकत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा