♦️ मनाची अवस्था ♦️

एकदा  धनाढ्य व्यक्तीने एका गुरुजींना  निमंत्रित केले परंतु एकादशीचा उपवास होता म्हणून गुरुजी जाऊ शकले नाहीत परंतु गुरुजींनी आपल्या दोन शिष्यांना त्या व्यक्ती कडे भोजन करण्यासाठी पाठवून दिले.


परंतु जेव्हा दोन शिष्य परत आले तेव्हा त्यातला एक शिष्य दुःखी आणि दुसरा प्रसन्न होता.


गुरुजींना त्यांना बघून  आश्चर्य वाटले म्हणून गुरुजींनी एका शिष्याला विचारले,"बाळा दुःखी का आहेस. मालकाने भोजनात काही फरक केला का ?"


"नाही गुरुजी"


मालकाने बसण्यात फरक केला का ?


"नाही गुरुजी"


मालकाने दक्षिणेमध्ये फरक केला का ?


"नाही गुरुजी, दक्षिणा बरोबर २ रुपये मला व  आणि २ रुपये दुसऱ्याला " दिली


आता तर गुरुजींना अजूनच आश्चर्य झाले आणि विचारले मग कारण काय आहे ? जो तू दुःखी आहेस ?


तेव्हा दुःखी शिष्य बोलला, "गुरुजी, मी तर विचार करायचो की, ती व्यक्ती खूप श्रीमंत आहे. कमीत कमी १० रुपये दक्षिणा देईल  परंतु त्यांनी २ रुपये दिले म्हणून मी दुःखी आहे.


गुरुजींनी  दुसऱ्याला विचारले तू का प्रसन्न आहेस ?


तेव्हा दुसरा म्हणाला, गुरुजी मला माहित होते की ती धनाढ्य व्यक्ती खुप कंजूष  आहे. आठाण्यापेक्षा जास्त दक्षिणा देणार नाही परंतु त्यांनी २ रुपये दिले म्हणून मी प्रसन्न आहे.


हीच आपल्या मनाची अवस्था आहे. संसारात घटना या समान रुपी घडतात परंतु कोणी त्या घटनांद्वारे सुख प्राप्त करतात तर कोणी दुःखी होते. परंतु खरंतर दुःख अथवा सुख, हे आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून आहे!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा