एकदा कॉलेजचे काही मित्र अनेक वर्षानंतर भेटतात.
.
ते सर्वजण आपल्या करियर मध्ये खूप चांगले कार्य करत असतात आणि भरपूर पैसे कमावत असतात.
.
एकमेकांशी बोलत असतांना खूप वेळेनंतर ते त्यांच्या कॉलेजचे सर्वांत आवडते प्रोफेसर यांना भेटण्याचे ठरवतात.
.
प्रोफेसरांच्या घरी गेल्यानंतर ते प्रोफेसर त्या सर्वांचे स्वागत करतात आणि सर्वांना त्यांच्या करियरबद्दल विचारतात.
.
हळुहळूगप्पा रंगतात आणि त्यादरम्यान ते जीवनात येणाऱ्या अडचणी आणि कामात येणारा तणाव याविषयी चर्चा करतात.
.
सर्वजण या मुद्दयाशी सहमत असतात की,जरी आपण आर्थिक स्थितीने मजबूत असलो तरी पण आपण पुर्वीच्या आयुष्यासारखे आता सुखी नाही.
.
ते प्रोफेसर सर्वांचे बोलणे खूप लक्ष देऊन ऐकत असतात...
.
आणि मग ते अचानक किचनमध्ये जातात आणि थोड्या वेळाने परतल्यावर सर्वांना म्हणतात की,
.
मी सर्वांसाठी कॉफी आणली आहे पण तुम्ही किचनमध्ये जाऊन एक-एक कप स्वतःसाठी घेऊन या...
.
सर्वजण किचनमध्ये जातात.तिथे अनेक प्रकारचे कप असतात.
.
आपल्या आवडीप्रमाणे ते सर्वजण कप घेऊन येतात.
.
मग ते प्रोफेसर कॉफी येतात आणि म्हणतात की,
.
"तुम्ही सर्वांनी जो कप किंमतीने महाग आहे तोच चांगला आहे म्हणून निवडला.... आणि.जे कप साधारण आहेत त्या कपांकडे तुम्ही लक्षच दिले नाही.
.
जेव्हा एकीकडे आपण स्वतःसाठी चांगली इच्छा मनात ठेवतो तर दुसरीकडे हीच इच्छा आपल्या जीवनात अडचणी आणि तणाव आणत असते.
.
हे तर निश्चित आहे की,
कॉफीच्या क्वालिटी मध्ये कोणताही बदल होणार नाही.हा तर एक प्रकार आहे की,ज्याच्या माध्यमामधुन आपण कॉफी पित असतो.
.
तुमची खरी इच्छा कॉफी पिण्याची होती,
कपाची नाही.
तरीपण सर्वांनी महागातले महागच कप निवडले.
आणि आपला कप निवडल्या नंतर तुम्ही
दुसऱ्यांच्या कपाकडेच लक्ष दिले.
.
सर्वांनी जरी कोणतेही कप निवडले असते तरी कॉफीची चव बदलली नसती ,ती एकच रहाते !
.
तात्पर्य— आपले जीवन हे कॉफीसारखेच आहे.
....आपली नोकरी,पैसा व परिस्थिती हे सर्व वरवरचे कपांसारखे फक्त जीवन जगण्याचे साधने आहेत खरं जीवन नाही.
.
म्हणून चांगल्या कॉफीची चिंता करा...भारी कपाची नाही.
.
जगातील सर्वांत सुखी माणसे ती नसतात ज्यांच्याकडे सर्व काही इतरांपेक्षा अधिक चांगलं असतं ......तर...... ते सुखी असतात की जे त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीचा चांगला उपयोग करतात व आहे त्यामध्ये आनंदी रहातात...!
.
म्हणून साधेपणाने जगा.
सर्वांशी प्रेमाने वागा.
सर्वांची काळजी घ्या.
सर्वांशी नेहमी संपर्कात रहा व शक्य असल्यास प्रत्येक्ष भेटा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा