संताचे लग्न झाल्यानंतर त्याला अवघ्यात तीन
महिन्यानंतर मुलगा होतो...
संता - तीन महिन्यात मुलगा कसा झाला?
बायको - तुमच्या लग्नाला किती काळ झाला?
संता - तीन महिने
बायको - माझ्या लग्नाला किती झाले?
संता - तीन महिने
बायको - आणि मुलगा किती महिन्यांनंतर
झाला?
संता - तीन महिने
बायको - तर एकूण किती महिने झाले?
संता - ओ तेरी... खरेच नऊ महिन्यानंतर
मुलगा झाला. बघ वेळ कसा जातो समजतच नाही.
दोन मित्र एकाच परीक्षेत दुसऱ्यांदा नापास होतात..
पहिला: जाऊ दे यार चल आत्महत्या करू…….
.
दुसरा: येडा झाला का भावड्या तू..?
.
.
.
.
.
.
पुढच्या जन्मी परत बालवाडी पासून स्टार्ट करावं लागंल.

स्त्रीचा कान

डॉक्टरांनी एका माणसाला प्लास्टिक सर्जरी करून नवीन कान बसवला...
.
.
पेशंट: डॉक्टर तुम्ही मूर्खआहात का??
तुम्ही मला एका स्त्रीचा कान बसवलाय...!!
.
.
डॉक्टर: दोन्ही मध्ये काही फरक नाही...
ऐकू तर येतंय ना...
.
.
पेशंट: फरक आहे...
मला ऐकू तर येतंय पण काही कळत नाहीये...

आई...

दिवसभर कितीही दंगा केला
तरी मला थोपटल्याशिवाय आई कधी झोपली नाही
घरापासुन दूर आता म्हणूनच कदाचित
शांत झोप कधी लागली नाही

कुणी विचारतं ..
"तुला घरी जावसं वाटत नाही?"
कसं सांगू त्यांना, घरातून निघताना
आईला मारलेली मिठी सोडवत नाही

आई, तू सांगायची गरज नाही
तुला माझी आठवण येते
आता माझ्यासाठि डबा करायचा नसतो
तरीहि तू सहा वाजताच उठतेस

तुझ्या हातचा चहा
तुझ्या हातची पोळी
तुझ्या हातची माझी नावडती भाजीही खायला
आता जीभ आसुसली

घरापासून दूर ...
आई जग खूप वेगळं आहे
तुझ्या सावलीत अगदी बिंनधास्त होते
आता रणरणंत ऊन आहे

तू आपल्या पिलांसाठी
सगळं केलंस ...
एक दिवस पिलं म्हणाली, "आई आता आम्हाला जायचंय" ...
आणि तू त्यांना जाऊ दिलंस

पावसाच्या मनातलं.......

पावसाच्या मनातलं मला काही कळत नाही..
तो बरसतोय अन तिची आठवण काही सरत नाही..

त्याला म्हटलं, टळ की लेका,त्रास का देतोस
तुझी रिमझिम तिची चाहूल काही विसरू देत नाही

तो वाफ़ाळता कप, त्या खिडकीतल्या गप्पा
ते ओलेचिंब भिजणे,डोळ्यांना काही हसू देत नाही

म्हणतो आता जादू बघ, अन हसला गडगडाटी
दारावर टकटक झालं अन पाहतॊ तर ती उभी होती
हसली खुदकन अन ओलेतीच येउन बिलगली
आणि ओढतच मला पावसात घेउन गेली

हं, खरंच पावसाचं मला काही कळत नाही
तो सरलाय आता पण तो क्षण काही सरत नाही
तो बरसतोय अन तिची आठवण काही सरत नाही..

व्यथा

खर सांगू , आज काल मी काहीच लिहित नाही
भावनांचा शब्दांशी मेळच जुळत नाही

काहूर आहे मनात अनेक प्रश्नांचे
एकाही प्रश्नाला माझ्या
उत्तरच मिळत नाही

परिस्थिती बदललीय ,
मलाही कळतंय
पण कळलेले सगळेच
अंगी वळत नाही .

आठवांच्या सरींनी
अंग चिंब भिजते
तरीही वास्तव भोवताली जळते
कधी वेळे आधी कधी वेळे नंतर

उमलत्या कळ्या, फुललेली फुले
कुणाला आवडत नाहीत ?
खुडून टाकलेल्या फुलांना मात्र
कुणीच माळत नाही

म्हणूनच आज काल मी काहीच लिहित नाही
म्हणूनच आज काल मी काहीच बोलत नाही


कवी - रसप( रणजीत पराडकर )

माणसं

खोक्यांसारखी माणसं
एकावर एक रचलेली
गंज चढलेले मेंदू
आणि अक्कल पुसलेली

मेंढरांसारखी माणसं
मागे-मागे चालणारी
कंटाळवाणी मंदगती
पडणाऱ्यावर पडणारी..

बगळयांसारखी माणसं
ध्यान लावून बसलेली
दिसतात स्थितप्रज्ञ
मोडता घालण्या टपलेली

गेंड़यांसारखी माणसं
निगरगट्ट बनलेली
सोयर ना सूतक काही
मस्तवाल फुललेली

माणसासारखी माणसं
नावापुरती उरलेली
चिमणीच्या जातीसारखी
दुर्मीळ होत चाललेली.....


कवी - रसप( रणजीत पराडकर )