भाषा

अर्थ शब्दांचे कसे "नाही" म्हणावे
जे तुझे आहे कसे "नाही" म्हणावे
मी तुझ्यापाशी न आलो मागण्याला
लाभले जे ते कसे "नाही" म्हणावे
संपुनी गेला जरी सहवास अपुला
श्वास दरवळते कसे "नाही" म्हणावे
कोवळीशी भेट त्या कवळ्या क्षणांची
तन कवळले ते कसे "नाही" म्हणावे

कालची भाषा जरी वरवर समजली
खोलवर घुसले कसे "नाही" म्हणावे
गात आहे मी मनोमन गीत नामा
दाटले सारे कसे "नाही" म्हणावे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा