एक प्रेयसी पाहिजे

एक प्रेयसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी;
अन मलाही तिच्यासोबत, भिजायला लावणारी.

एक प्रेयसी पाहिजे, फुलपाखरांमागे धावणारी;
फुलांचे सारे रंग उधळत, झाडांमागे लपणारी.

एक प्रेयसी पाहिजे, मुग्धपणे हसणारी;
माझ्या बाहूपाशात, अलगद येऊन बसणारी.

एक प्रेयसी पाहिजे, कशीही दिसणारी;
पण मनाने मात्र, अप्रतिम सुंदर असणारी.

एक प्रेयसी पाहिजे, जिवलग मैत्रीण असणारी;
आमच्या नाजुक नात्याला, हळुवारपणे जपणारी.

एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जाणणारी;
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी.

एक प्रेयसी पाहीजे, प्रेमाला प्रेम समजणारी;
सुखा-दुःखात माझ्या, तन्मयतेने साथ देणारी.

एक प्रेयसी पाहीजे........ मिळेल का अशी?

२ टिप्पण्या:

  1. सकाळ
    सकाळची प्रभात देवासारखी
    पक्षी गुणगुणती आकाशामध्ये
    चिव ची करत निघून जाती
    आणि सूर्य किरणे येती घरा घरात .......
    नवीन एक पहाट घेवून येती
    फुल फुलांमध्ये आनंद घेवून
    सकाळची प्रभात देवासारखी ..............
    घालुनी आली ती केशरी साडी
    जशी सोनेरी पंखाची
    रंग केशरी गाणी सुंदर
    चहू दिशांना पसरून आला वारा
    सकाळची प्रभात देवासारखी ......


    प्रियांका एकनाथ मढवी (जव्हार )

    सकाळची

    उत्तर द्याहटवा
  2. सकाळ
    सकाळची पहाट देवासारखी .....
    पक्षी गुणगुणती आकाशामध्ये
    चिव चिव करत निघून जाती
    आणि सूर्य किरणे येती घरा घरात
    सकाळची पहाट देवासारखी ......
    नवीन एक पहाट घेवून येती
    फुल फुलांमध्ये आनंद घेवून
    सकाळची पहाट देवासारखी .......
    घालुनी आली ती केशरी साडी
    जशी सोनेरी पंखाची
    रंग केशरी आणि सुंदर
    चहू दिशांना पसरुनी आला वारा
    सकाळची पहाट देवासारखी .....
    फुला फुलांमध्ये सुगंध घेवून
    सर्वांमध्ये आनंदाची प्रेमळ पहाट घेवून
    सकाळची पहाट देवासारखी .....


    कुमारी-प्रियंका एकनाथ मढवी
    (मु-जव्हार )

    उत्तर द्याहटवा