विरुपिका

तरुणपणी त्याने एकदा दर्यामध्ये
लघवी केली.

आणि आपले उर्वरित आयुष्य
त्यामुळे
दर्याची उंची किती वाढली
हे मोजण्यात खर्ची घातले.


कवी - विंदा करंदीकर

रचना

स्वप्नामध्ये रचिल्या ओळी
यमक मला नच सापडले!
अर्थ चालला अंबारीतुन
शब्द बिचारे धडपडले;

प्रतिमा आल्या उंटावरुनी;
नजर तयांची पण वेडी;
शब्द बिथरले त्यांना; भ्याले
स्वप्नांची चढण्या माडी!

थरथरली भावना मुक्याने
तिला न त्यांनी सावरले;
स्वप्नामध्ये रचिल्या ओळी
यमक मला नच सापडले!


कवी - विंदा करंदीकर

रेबिज

डॉक्टर : सांगायला वाईट वाटते कि तुम्हाला पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे रेबिज हा रोग झाला आहे. तुम्ही यातुन बरे व्हायची शक्यता फार कमी आहे.

पेशंट : डॉक्टर मला एक कागद व पेन देता का ?

डॉक्टर : कागद व पेन कशासाठी ?

पेशंट : यादी तयार करतो. कुणा कुणाला चावायच आहे अशा लोकांची.

सगळ्यात जुना प्राणी

गणपुले सर : सांगा पाहू सगळ्यात जुना प्राणी कोणता?

मंजू : झेब्रा.

गणपुले सर : असं का बरं?

मंजू : कारण तो ब्लॅक अॅण्ड व्हाईट असतो ना

देव

संपोजीराव : डॉक्टर मला सारखं वाटतंय की मी देव आहे.

सायकोलॉजिस्ट : असं कधीपासून वाटतंय तुम्हाला?

संपोजीराव : जेव्हा पासून मी हे विश्व घडवलं ना अगदी तेव्हापासून.

एक पोट्टी

एक पोट्टी रोज माह्या
सपनामंधी येते
हिचक विचक खाता पेता
उचकी देऊन जाते
थयथय नाचे मनामंधी
मोरनी हाय जशी
येड लावुन जाते
तिचे नखरे बावनमिशी

एक दिवस अशी अचानक
माह्यासमोर आली
पाहुन मले काय सांगु
खुदकन हसुन गेली
म्या म्हनलं काय ती
हिच पोट्टी हाय
कोनबी असुदे यार
पन हिले तोड नाय

सपनामंधली पोट्टी पुन्हा
दिवसा दिसुन जाते
कं दिवसा पाह्यलेली पोट्टी
पुन्हा सपनामंधी येते
काय करु चायला
पुरता लोचा झाला
माह्या मनाच्या डुगडुगीचा
चक्का जाम झाला

एक वाटे सुंदरा मले
एक वाटे अप्सरा
चायला सपनातल्या पोट्टीचं
रुप दिवसा आठवत नाही
तिच्या नांदी दिवसाच्या पोट्टीचं
रुप मनी साठवत नाही
डोये खुल्ले तवा माह्या
ध्यानामंधी आलं
दिवसाढवळ्या सपन पाहुन
कोनाचं भलं झालं....

हरकत नाही...

"अक्षर छान आलंय यात !"
माझी कविता वाचताना
मान तिरकी करत
ती एवढंच म्हणते...

डोळ्यांत तुडुंब भरलेली झोप,
कपाळावर पेंगत बसलेले काही भुरटे केस,
निसटून गेलेली एक चुकार जांभई,
आणि नंतर...
वाचता वाचता मध्येच
आपसूक मिटलेले तुझे डोळे,
कलंडलेली मान,
आणि हातातून अशीच कधीतरी निसटलेली,
जमिनीवर पडलेली
माझी कवितांची वही...

हरकर नाही, हरकत नाही;
कविता म्हणजे तरी आणखी काय असतं !!


कवी - संदीप खरे

आफ्रिकन आणि पोपट

एक आफ्रिकन निग्रो एका गोंडस पोपटाला आपल्या खांद्यावर बसवून बारमधे घुसला.

'' अरे वा ... ही एवढी मजेदार गोष्ट तू कुठून आणलीस?'' बार टेंडरने विचारले.

'' आफ्रिकेवरुन'' पोपटाने उत्तर दिले.

मग विमान घेऊन ये!

एक दारूडा रस्त्यावरून जात असताना तिकडून एक व्यक्ती येत असते. तेव्हा तो

दारूडा - अरे, माझ्यासाठी टॅक्सी घेऊन ये?

ती व्यक्ती- मी काही तुझा नोकर नाही.

दारूडा- मग कोण आहेस?

ती व्यक्ती- एअर कमांडर!

दारूडा- मग विमान घेऊन ये!

गर्लफ्रेंड

१० वर्षाचा मुलगा आईला : आई, गर्लफ्रेंड म्हणजे काय ग ?

आई : आता नाही कळणार तुला ,

तू जेव्हा मोठा होऊन चांगलामुलगा बनशील तेव्हा तुला पण १ मिळेल .

मुलगा : आणि चांगला नाही बनलो तर ??

आई : तर मग भरपूर मिळतील

मोबाइल कुणाचा?

चार मित्र दारू पीत बसलेले असतात.....
एवढ्यात टेबल वर ठेवलेला मोबाइल वाजतो....
पिंटू - हेलो.
पलीकडचा आवाज - जानू, मी शॉपिंग ला आले आहे.
पिंटू - मग?
... ......मी पंचवीस हजाराचा नेकलेस घेऊ का?
पिंटू - ठीक आहे घे....
.....आणि मला एक दहा हजाराची साडी पण आवडली आहे....
पिंटू - अग मग एक का? चांगल्या तीन चार साड्या घे की.
.....जानु, तुम्ही किती चांगले आहात? मी तुमच्या क्रेडिट कार्ड वरुन खरेदी करत आहे....
पिंटू - ठीक आहे. अजुन जे आवडेल ते घे डार्लिंग....
.....जानु आय लव यू...
पिंटू - सेम टू यू डार्लिंग....... .

मित्र हैराण होऊन विचारतात, अरे तुला काय वेड लागले आहे का? तुझी बायको इतके पैसे खर्च करत आहे आणि तू हो हो काय म्हणत आहेस?
पिंटू - ते जाउ द्या..... आधी सांगा, हा मोबाइल कुणाचा आहे?

आजीचे घड्याळ

आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक,
देई ठेवुनि तें कुठे अजुनि हे नाही कुणा ठाउक;
त्याची टिक टिक चालते न कधिही, आहे मुके वाटते,
किल्ली देई न त्यास ती कधि, तरी ते सारखे चालते

"अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी,"
जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे रात्री बिछान्यावरी
साडेपाचही वाजतात न कुठे तो हाक ये नेमकी
"बाळा झांजर जाहले, अरवला तो कोंबडा, उठ की !"

ताईची करण्यास जम्मत, तसे बाबूसवे भांडता
जाई संपुनियां सकाळ न मुळी पत्त कधी लागता !
"आली ओटिवरी उन्हे बघ!" म्हणे आजी, "दहा वाजले !
जा जा लौकर !" कानि तो घणघणा घंटाध्वनी आदळे.

खेळाच्या अगदी भरांत गढुनी जाता अम्ही अंगणी
हो केव्हा तिनिसांज ते न समजे ! आजी परी आंतुनी
बोले, "खेळ पुरे, घरांत परता ! झाली दिवेलागण,
ओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येउन !"

आजीला बिलगून ऐकत बसू जेव्हा भुतांच्या कथा
जाई झोप उडून, रात्र किती हो ध्यानी न ये ऐकता !
"अर्धी रात्र कि रे" म्हणे उलटली, "गोष्टी पुरे ! जा पडा !'
लागे तो धिडधांग पर्वतिवरी वाजावया चौघडा

सांगे वेळ, तशाच वार-तिथीही आजी घड्याळातुनी
थंडी पाऊस ऊनही कळतसे सारें तिला त्यांतुनी
मौजेचे असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले?
गाठोडे फडताळ शोधुनि तिचे आलो ! तरी ना मिळे !


कवी - केशवकुमार

दु:ख ना आनंदही

दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन आजही.

मी तसा प्रत्यक्ष नाही, ना विदेशी मी जसा,
मी नव्हे की बिंब माझें, मी न माझा आरसा.

एकला मी नाहि जैसा, नाहि नाहि मी दुणा,
मी नव्हें स्वामीहि माझा, मी न माझा पाहुणा.

प्रश्न की उद्गार नाही, अधिक नाही वा उणा,
जीवनाला ऐल नाही, पैल, तैसा मध्य ना.

याद नाही, साद नाही, ना सखी वा सोबती,
नाद आहे या घड्याला अन घड्याच्या भोवती.

सांध्यछाया आणि काया जोडुनी यांचा दुवा
नाव आहे चाललेली, दूरची हाले हवा.

दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन आजही.


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

साधन मदिरा

व्यथा वेदना विसरायाचे साधन मदिरा
स्वतः स्वतःला फसवायाचे साधन मदिरा

गतकाळाच्या रंगमहाली मैफल सजते
भणंग स्वप्ने सजवायाचे साधन मदिरा

बंद उसासे , बंद हुंदके , बंद ओठही
दोन आसवे ढाळायाचे साधन मदिरा

जी काही नासाडी होते ती देहाची
झुरणारे मन रिझवायाचे साधन मदिरा

आनंदोत्सव असेल अथवा असो दुखवटा
झुलवायाचे फुलवायाचे साधन मदिरा

कुरतडणार्‍या कातरणार्‍या कातरवेळी
एकाकीपण रिचवायाचे साधन मदिरा

तुटले फुटले कुस्करले वा जरी चिरडले
सारे काही सांधायाचे साधन मदिरा

रोखुन धरलेल्या श्वासासम कितीक गोष्टी
बंद कवाडे उघडायाचे साधन मदिरा

उजाड झाल्या नगरामध्ये पुन्हा एकदा
नवीन इमले बांधायाचे साधन मदिरा

जे काही कोरले " इलाही" ह्रुदयावरती
पुसण्यासाठी गिरवायाचे साधन मदिरा

- इलाही जमादार

ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता

ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता
स्थितप्रज्ञ काळ्या दगडावर,
- मला वाटते क्षणभर फुटतो
दगडाला इच्छेचा अंकुर.

ऊन हिवाळ्यांतिल हळदीचे
किरिट घालते वृद्धा वडावर !
- मला वाटते तळ्यांत पाहुन
हात फिरवितो तो दाढीवर!

ऊन हिवाळ्यांतिल कुडकुडते,
कुशीत शिरते दिसतां डोंगर;
-मला वाटते त्यालाही मग
गरम झऱ्याचा फुटतो पाझर.

ऊन हिवाळ्यांतिल भुळभुळते
आजीच्या उघड्या पाठीवर;
- तिच्या भ्रमाला गमते आपण
पुन्हा जरीचा ल्यालो परकर.

ऊन हिवाळ्यांतिल हिरमुसते;
रुसते; अन माळावर बसते;
- मला वाटते त्यालाही पण
असेच भलते वाटत असते.


कवी - विंदा करंदीकर

जगण्यामध्ये ब्रम्हानंद

बरगड्यांच्या तुरुंगातून
मी हृदयाला मुक्त केले;
जिथे जिथे धमनी आहे
तिथे माझे रक्त गेले.

दिक्कालाच्या जबड्यामधील
लवलवणारी जीभ मी;
आसक्तीच्या गर्भामधील
धगधगणारे बीज मी.

माझ्या हातात महायंत्र;
माझ्या मुखात महामंत्र.

सगळे मिळून सगळ्यांसाठी
मरण्यातही मौज आहे;
सगळे मिळून सगळ्यांसाठी
जगण्यामध्ये ब्रम्हानंद.


कवी - विंदा करंदीकर
कवितासंग्रह - स्वेदगंगा

प्रेम

सत्य युगाच्या अखेर झाली
प्रेम-द्वेष यांच्यात लढाई
द्वेषच होई विजयी आणि,
प्रेम लपे आईच्या हृदयी!

कवी - विंदा करंदीकर

पेर्ते व्हा

पेरनी पेरनी
आले पावसाचे वारे
बोलला पोपया
पेर्ते व्हा रे, पेर्ते व्हा रे!

पेरनी पेरनी
आभायात गडगड,
बरस बरस
माझ्या उरी धडधड!

पेरनी पेरनी
आता मिरुग बी सरे.
बोलेना पोपया
पेर्ते व्हा रे, पेर्ते व्हा रे!

पेरनी पेरनी
अवघ्या जगाच्या कारनी.
ढोराच्या चारनी,
कोटी पोटाची भरनी


कवियत्री - बहीणाबाई चौधरी

असं.. कधी वाटलंच नव्हतं..

जीवनातून तू.. एवढं सहज दूर जाशील..
अनोळखी नजरेनं अशा.. माझ्याकडे पाहशील..
पाहून नंतर.. हळूच मनाशी हसशील..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

मनाच्या बागेत, भावनेचं रोपटं..
एवढ्या खोलवर जाईल..
मुळापासून उखडलं तरी..
थोडी आठवण शिल्लक राहील..
ती आठवण सुद्धा वेदनाच देईल..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

तुझी निरागसता संपून..
निष्ठुरता डोळ्यांत उरेल..
माझ्या डोळ्यांत मात्र..
काकुळतीने.. पाणी तरेल..
भयाण हे स्वप्न, कधी वास्तवातही उतरेल..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

ठसठसणारी वेदना..
तुझीच आठवण करुन देईल..
वेडं.. मनाचं पाखरु..
पुन्हा तुलाच शोधत राहील..
अवघड प्रयत्नानं त्याचा मात्र जीव जाईल..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

मी सुद्धा.. अडखळत..
पुन्हा उभा राहीन..
तुझ्या पलीकडे असणाऱ्या..
अंतिम ध्येयाला पाहीन..
आयुष्य पुढचे, त्याच्या चरणांवर वाहीन..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

आयुष्याच्या पानांवर पुढे..
प्रेमाचं पर्व अधुरंच राहील..
तुझ्या उल्लेखाशिवाय माझं जीवनसुद्धा..
अपुरंच जाईल..
मरताना सुद्धा ओठांवर तुझंच नाव घेत जाईन..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..


~ आशिष

प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ.....!

!..प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ..!

प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ...!!१!!
दोन मनाचा फक्त शब्दांचा मेळ,
दोन हृदयाचा फक्त तालमेल,
दोन भावनांचा फक्त फक्त मेळ,
प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ....!

प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ.....!!२!!
दूर असून सुद्धा जवळ असण्याचा मेळ,
फक्त अवाजावारून दुःख ओळखन्याचा मेळ,
ती नाराजी ओळखन्याची खेळ,
ती वेळ साधून प्रेम करण्याचा खेळ,
सारा सारा फक्त भावनांचा खेळ,
प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ.....!!३!!

प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ.....!

किडनॅपर सरदार

चार सरदारांनी एका छोट्या पोराला किडनॅप केले. पोराला सांगितले, घरी जाऊन आपल्या बापाकडून ५ लाख रुपये बर्‍या बोलाने घेऊन ये, नाहीतर तुला जीवे मारू..!
.
तो मुलगा घरी गेला, आणि त्याच्या बापाने पैसेही दिले... का बरे?????
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कारण बाप पण सरदारच होता ना...
जंगलातून एक हत्ती चे पिल्लू चालले होते. उंदराने बिळातून पहिले.
मनाशी म्हणाला " बराच मोठा दिसतोय ! "
तरीही त्याने तोंड बाहेर काढून
हत्तीच्या पिल्लला विचारले "तुझे वय काय?"
हत्ती म्हणाला , " सहा महिने
"हात्तीने विचारले  "तुझे वय काय? "
उंदीर म्हणाला , "माझेही वय सहा महिने च आहे, पण मी सारखा आजारी असतो."

खात्रीचा माल

एक दुकानदार पॅरॅशूट विक्रीचा व्यवसाय करायचं ठरवतो.

एक ग्राहक त्याच्याकडे पॅरॅशूट घेण्यासाठी येतो.

ग्राहक : (शंका येऊन) अहो, हे पॅरॅशूट चांगल्या प्रतीचं आहे ना? उडी मारल्यावर बटन दाबताच उघडेल ना?

दुकानदार : हो नक्कीच. अगदी खात्रीचा माल आहे.

ग्राहक : आणि नाही उघडलं तर?

दुकानदार : तुमचे पैसे परत. अगदी खात्रीचा माल आहे.

20 वर्ष

बंडू आणि चिंगी च्या लग्नाचा 20 वा वाढदिवस असतो, पण बंडू फार शांत बसलेला असतो तेवढ्यात चिंगी विचारते

चिंगी: काय झाल ....? एवढ शांत का बसलायस

बंडू: काही नाही ग तुला आठवत 20 वर्षापूर्वी आपण एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो ...
आपण चोरून भेटायचो ....

चिंगी : हो किती छान दिवस होते ते ...:)

बंडू: तुला आठवत तुझ्या बाबानी आपल्याला पकडल होत आणि माझ्या डोक्याला पिस्तोल लावून मला धमकावल होत की माझ्या मुलीशी

लग्न केल नाहीस तर मी तुला 20 वर्षा साठी खडी फोडायला जेल मधे पाठविन .....

चिंगी :,..... बर त्याच अत्ता काय आल

बंडू: काही नाही ग आज मी जेल मधून सुटलो असतो .........
रेल्वे इंटरव्यू...
इंटरव्युअर - समजा एकाच रुळावरून २ ट्रेन येत असतील
तर काय करशील.
चम्प्या - मी रेड सिग्नलदाखवेल..
इंटरव्युअर - आणि सिग्नल नसेल तर?
चम्प्या - मी टोर्च दाखवेल..
इंटरव्युअर - आणि टोर्च नसेल तर?
चम्प्या - मी माझा लाल शर्ट काढून दाखवेल..
इंटरव्युअर - आणि शर्ट जर लाल नसेल तर?
चम्प्या - मी माझ्या मामांच्या मुलीला बोलवेल..
इंटरव्युअर - हाय? मामाच्या मुलीला? ते कशासाठी?
.
.
.
.
चम्प्या - तिने कधी २ ट्रेनची टक्कर पाहिली नाहीये...:
एक मंत्री भाषण देत असतो. त्यामध्ये ते एक गोष्ट सांगतात .
.
एका व्यक्तीला ३ मुले असतात. त्याने तिघांना १००-१०० रुपये दिले
आणि अशी वस्तू आणायला सांगितली कि त्या वस्तूने खोली पूर्ण भरली पाहिजे .
.
पहिला मुलगा १०० रुपयाचे घास आणतो ...
पण खोली पूर्ण भरत नाही ..
.
दुसरा मुलगा १०० रुपयाचा कापूस आणतो..
तरी पण खोली पूर्ण भरत नाही ..
.
तिसरा मुलगा १ रुपयाची मेणबत्ती आणतो ..
आणि त्याने सर्व खोली प्रकाशमय होते .
.
पुढे तो मंत्री म्हणतो आपले राहुल गांधी त्या तिसर्या मुलासारखे आहेत ..
ज्या दिवशी ते राजनीतीत आले तेव्हापासून आपला देश प्रकाशमय आणी समृद्धीपूर्ण झाला आहे ..
.
.
.
.
.
.
.
तेवढ्यात मागून आपले अन्ना हजारे यांचा आवाज येतो .
"बाकीचे ९९ रुपये कुठे आहेत"...??
अमेरिकेतील एक इंजिनीअर
पुण्यात आप्पा बळवंत चौकात
येतो ...
रस्त्यावर एक पुस्तक
पाहून
तो चक्कर येवून
पडतो ,
पुस्तकाचे नाव असते ,
.
.

.
.
'३० दिवसात इंजिनीअर बना'
एक ६० वर्षांचे गृहस्थ डॉक्टरकडे जातात आणि म्हणतात,"डॉ, माझी बायको १८ वर्षांची आहे आणि ती गरोदर आहे.. तुमचं काय मत आहे??"

डॉ:- मी तुम्हाला १ गोष्ट
सांगतो,"एकदा एक शिकारी अगदी घाईघाईत
शिकारीला जायला निघतो घाईत तो बंदुकीऐवजी छत्री घेतो आणि शिकारीला जातो.
... जंगलात गेल्यावर त्याला १ सिंह दिसतो.

शिकारी सिंहाच्या समोर जातो...
छत्री काढतो.....हँडल खेचतो
आणि
सिंह मरून पडतो....!!"

माणूस - हे अशक्य आहे.. सिंहाला दुसरंच कोणीतरी मारलं असेल.....!!

डॉ. (शांतपणे):- माझंही हेच मत आहे...

फायर ब्रिगेड

संता फायर ब्रिगेडमध्ये नुकताच रुजु होतो आणि एक फोन येतो...

कॉलर - लवकर या माझ्या घरात आग लागली आहे..

संता - आग विझवण्यासाठी पहिले पाणी टाका.

कॉलर - मी टाकल होत पण नाही विझली.

संता - मग आम्ही येउन काय करणार , आम्ही पण पाणीच टाकणार ना
झंप्या रिक्ष्यावाल्याला :
ओ रिक्ष्यावले काका हनुमान मंदिर जाणार का ?
.
.
.
.
.
रिक्षावाला : हो जाणार ना
.
.
.
.
.
झंप्या : ठीक आहे मग येताना प्रसाद घेऊन या

कारण

पत्नी : तू तुझ्या मित्रांना असं का सांगितलंस की, मी खूप चांगला स्वयंपाक
करते?

पती : तुझ्याशी लग्न करण्याचं काही तरी कारण त्यांना सांगायला हवं होतं ना!

काळ

आम्ही जेंव्हा लहान होतो तेंव्हा आम्हाला मोठ्यांचा आदर करण्यास सांगण्यात आले.

आता मोठे झाल्यावर आम्हाला तरुणांच ऎकाव अस सांगतात.

याला म्हणतात नशिब. 
एकदा शाळेत बाई "Best Friend" निबंध लिहायला सांगतात....
.
.
.
.
आपला गण्या उभा राहतो आणि बाईना म्हणतो :-
"बाई.... 'फुकनीच्या'ला इंग्लिश शब्द काय आहे हो..??"

सर्वाधिक बर्फ

एकदा एक फॉरेनर भारतात येतो.... तो सांताला विचारतो...
फॉरेनर - भारतात सर्वाधिक बर्फ कुठे पडतो.
सांता - आठपर्यंत काश्मिरमध्ये आणि आठनंतर दारुच्या ग्लासमध्ये.....

ट्रेनर

एका प्रसिद्ध मासिकासाठी काम करणार्‍या फोटोग्राफरला एकदा जंगलात लागलेल्या आगीचा चांगला फोटो काढायचा होता. त्याने बराच प्रयत्न केल्यावरही चांगला फोटो मिळेना, प्रत्येक फोटोत आग दिसण्या ऎवजी धुरच दिसायचा, तेंव्हा त्याने आपल्या संपादकांना फोनवरुन कळवले कि जंगलात आग लागली आहे व आगीचा फोटो विमानातुनच काढणे शक्य आहे तर लौकरात लौकर विमानाची व्यवस्था करा.
संपादक म्हणाले लगेच करतो तु विमानतळावर जा.
फोटोग्राफरला घाई झाल्याने त्याने विमानतळावर पोहोचल्यावर सोपस्कार पूर्ण केले व एका लहान विमानात जाऊन बसला व पायलटच्या जागेवर बसलेल्याला म्हणाला चल लगेच उडूया.
पायलटने विमान आकाशात नेल्यावर त्यांनी आगीच्या दिशेने ते वळवले.
फोटोग्राफर म्हणाल चल आता विमान जरा खाली घेऊन ३ ते ४ फेर्‍या मार.
पायलट म्हणाला," का ?"
फोटोग्राफर," मी फोटोग्राफर आहे, मला या आगीचे जवळून फोटो काढायचे आहेत."
"अरे बापरे, मला वाटले तुम्ही नविन ट्रेनर आहात व मला आज विमान कसे उतरवायचे हे शिकवणार आहात.", 

लग्नापूर्वी-लग्नानंतर...

लग्नाआधी 'तो' आणि 'ती' लग्नानंतर 'तो' आणि 'ती'
लग्नाआधीचे 'तो' आणि 'ती' लग्नानंतरही तेच असतात, पण लग्नानंतर
त्यांच्यातला संवाद बदलतो... कसा?... असा...
लग्नापू वी र्...
तो : हुश्श! किती वाट पाहात होतो मी या क्षणाची.
ती : मी जाऊ का निघून?
तो : छे गं! तसा विचारसुद्धा मनात आणू नकोस.
ती : तुझं प्रेम आहे माझ्यावर?
तो : अर्थातच!
ती : तू कधी माझी फसवणूक तर नाहीस ना केलेली?
तो : नो, नेव्हर! असा विचार तरी तुझ्या मनात कसा येतो?
ती : तू माझं चुंबन घेशील?
तो : हो तर.
ती : तू मला मारहाण करशील?
तो : अजिबात नाही. मी त्या प्रकारचा पुरुष नाही.
ती : मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकते का?
तो : हो.
लग्नानंतर...

लग्नानंतर काय होते हे जाणून घेण्यासाठी नवा संवाद लिहिण्याची गरज नाही...
फक्त हाच संवाद खालून वर वाचत जा!

ओळख

बसमध्ये सुरेश सारखा त्या मुलीशी बोलण्याचा व काही ओळख निघते का ते पाहण्याचा प्रयत्न करत होता.

“तुम्हाला कुठं तरी पाहिलयं, पण नक्की आठवत नाही…..आपले वडील काय करतात ?

“ते डॉक्टर आहेत”,

वैतागून मुलगी म्हणाली.

“तरीच………..”,

सुरेशचा धीर वाढला, “…..आता मला आठवल,

मी एकदा आजारीपडलो, तेव्हा त्यांनी औषध दिलं होतं”.

“शक्य आहे”,

ती मुलगी म्हणाली,”

ते जनावरांचे डॉक्टर आहेत”.

टाळ्या वाजवा, वाघ घालवा

एकदा एक माणुस जोर जोरात टाळ्या वाजवत होता.

मित्र ते पाहुन म्हणाला, "का हो असे टाळ्या का वाजवत आहात?"

पहिला म्हणाला कि "टाळ्या वाजवल्या तर वाघ जवळ येत नाहि."

मित्र "पण ईथे कुठे वाघ आहे?"

"येइलच कसा? मी टाळ्या वाजवतो आहे ना!" पहिला उत्तरला.

लॉटरीचे तिकीट

स्थळ : सदाशिव पेठ, पुणे........

जोशीकाका : काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात ! काय झालं ?

तात्या : अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना १ लाख रुपयाची लॉटरी लागलीये!

जोशीकाका : मग तुम्हाला का इतका आनंद झालाये ?...

तात्या : त्याला आता तिकिट सापडत नाहीये !
मुलगा : आई, तुझा जन्म कुठे झाला ?

आई : पंढरपुरलां

मुलगा : बाबांचां?

आई : नागपुरला .

मुलगा : माझा आणि ताईचा ?आई : तुझा पुण्याला , ताईचा ठाण्याला .

मुलगा : मग आपण सगळे एकञ कसे आलो ?

लग्न २५ शीतच

दोन मैत्रिणींच्या लग्नाविषयी गप्पा सुरु होत्या

पहिली दुसरीला - माझा निर्णय झाला आहे...
दुसरी - कसला?

पहिली - लग्नाचा... मी २५ वर्षांची झाल्यानंतरच लग्न करणार आहे.

दुसरी - मी पण निर्णय केला आहे...

जो पर्यंत लग्न करणार नाही तोर्यंत २५ वर्षांची होणार नाही.

मुंग्यांची पावडर

एकदा एक बाई दुकानात जाऊंन मुंग्यांची पावडर मागते,
शेजारी उभी असणारी बाई तिला म्हणते,
"अहो मुन्ग्यांचे एवढे लाड करू नका,
आज पावडर मागितली उद्या लिपस्टिक मागतील"

इंग्लिश विन्ग्लीश

मन्या लंगडत लंगडत शाळेत ऊशीरा पोचला.

इंग्रजीचे सर ओरडले."व्हाय आर यू लेट?
"इंग्रजीत सुमार मन्या म्हणाला, "सर रस्त्यावर चिख्खल झाला होता आणि तिथे उभ्या बैलाने ढुशी मारली. माझा पाय मोडला. म्हणून ऊशीर झाला.

"सर पुन्हा ओरडले, "टॉक इन इंग्लिश!"...

हजरजबाबी मन्याने म्हटले,"सर देयर वॉज चिखलीपिकेशन ऑन रोड. काऊज हसबण्ड केम. .हि  मारिंग मी शींगडा मेड मी लंगडा. सो आय कम लेट!
जुली फणकारतच बॉसच्या केबिन बाहेर आली,

रिसेप्शनिस्ट : का ग? काय झाल?

जुली : बॉस ने विचारला " आज ऑफिस अवर्स नंतर फ्री आहेस का? मी म्हटल हो......
...
रिसेप्शनिस्ट : वॉव, मग?

जुली : कसलं वॉव आणि कसलं काय, हि ५० पान दिली टाइप करायला...

वाघाचा सिनेमा

कायमच खेड्यात राहिलेले छगनराव एकदा शहरात आले.
घरी सर्वांनी एक सिनेमा बघायच ठरवल.
सिनेमा सुरु झाला, सर्वच मजा घेत होते.




आणि



सिनेमात एक वाघ प्रेक्षकांच्या दिशेने येत आहे असा सीन आला.
वाघ प्रेक्षकांकडे येत आहे हे बघुन छगनराव जोरजोरात किंचाळायला लागले.
छगनरावांना सांगण्यात आल घाबरु नका हा सिनेमा आहे.

छगनराव म्हणाले," होय, मला माहित आहे. पण त्या वाघाला माहित आहे का ?"
बंड्या : चंदू.. वेड्या.. तू त्या मुलीसाठी सिगारेट सोडलीस?

चंदू : हो.

बंड्या : वर दारूही सोडलीस लेका?
...
चंदू : होय रे बाबा..

बंड्या : असं? मग तिच्याशी लग्न का नाही केलंस?

चंदू : तू वेडा आहेस. आता इतका सुधारलोय मी. मग आता मला तिच्यापेक्षा आणखी चांगली कोणीतरी मिळेल की रे.

दिल्लीचे तख्त

इतिहासाच्या तासाला पुरंदरे मास्तरांनी झोपलेल्या राजुला ऊठवुन विचारलं
"काय रे! दिल्लीचे तख्त कोणी फोडले ?"

राजु खडबडुन जागा होत " देवाशप्पथ सांगतो सर ! मी नाही फोडले "

पुरंदरे मास्तरांनी हा किस्सा दुपारी शिक्षकांच्या खोलीत सांगितला
तेव्हा जोशी बाई सोडुन सगळे हसले. जोशी बाई  मात्र गंभीरपणे बोलल्या " कोण राजु ना ? एक नंबरचा वाह्यात मुलगा आहे. त्यानेच  फोडले असेल.

हाय जॅक

विमानात एकजण अचानक उठून उभा राहिला आणि ओरडला, ''हाय जॅक!''

... तत्क्षणी हवाई संुदरीच्या हातातला ट्रे खाली पडला आणि ती थरथरू लागली, पर्सरसह निम्म्याहून अधिक प्रवाशांनी हात वर केले आणि उरलेले भयव्याकुळ होऊन रडू लागले...

... तेवढ्यात समोरून एक प्रवासी उठून उभा राहिला आणि पहिल्या प्रवाशाला पाहून ओरडला, ''हाय टॉम!!!!!''

रामायण


हवालदार जेलरला : साहेब, काल सगळे कैदी रामायण करत होते.
जेलर : व्वा ! छान सुधारताहेत तर आपले कैदी.
हवालदार : नाही साहेब.
जेलर : नाही ? काय झाले.
हवालदार : साहेब, हनुमान झालेला कैदी काल संजीवनी बुटी आणायला गेला होता. तो आतापर्यंत परत आलेला नाही.

मेल्यानंतरची काळजी !

खमक्या मालतीबाई पेंटर पुढे बसल्या होत्या व पेंटर त्यांचे चित्र काढत होता. मधेच त्या पेंटरला म्हणाल्या ,"हे बघा, माझ्या चित्रात छान हिर्‍याची अंगठी, सुंदर नेक्लेस, अप्रतीम सुंदर मंगळसुत्र व अजुन काही दागीने दाखवता अलेत तर दाखवा."

"पण तुम्ही यातल कहिच घातलेल नाही." पेंटर म्हणाला.

मालतीबाई," तरिही दाखवा. मला माहितेय मी मेल्यावर हे नक्किच दुसर लग्न करणार तेंव्हा माझा हा फोटो बघुन ती यांना सुखाने जगु देणार नाही."