असेनही किंवा दिसेनही


असेनही किंवा दिसेनही
तुझियासवे नसेनही ॥ धृ॥

शब्द तुझे आठवतीलही
शब्द काही विसरतीलही
आता मन कोरा कागद
तुझ्यासामोरी असेलही ॥१॥

म्हणे कोणी दिलेल्याची
करू नये वाच्यता
म्हणे कोणॊ घेतल्याची
करू नये उपेक्षा ॥२॥

वळताना या वळणावरती
रिक्त हस्त असेनही
किंवा माझ्या मनातली
भावना मी जपेनही ॥३॥

हा आला सामोरी
काव्य सत्याचा आरसा
त्यात माझी प्रतिमा
कदाचित मी पाहीनही ॥४॥

ओळखीचे वा अनोळखी
असतील ते कोणीही
वार त्यांचे झेललेले
माफी किंवा परतवेनही ॥५॥

प्रेम , वात्सल्य , ममता
तुझिया सवे अनुभवले
तटस्थ मागे बघताना
गुणदोषांना मी दाखवेनही ॥६॥

पाहिजे मज स्पष्ट्ता
मन आणि विचारातही
दोन मुखांनी बोलताना
खंजीर काही खुपसतीलही ॥७॥

मी ना अवखळबाला
ना मी पदभिकारी
समजून असे चालताती
मुक्त त्यांना करेनही ॥८॥

गुंत्यात मी गुंतलेही
फसले किंवा फसवलेही
नीजधामी मम जाताना
आत्म अवलोकन करेनही ॥९॥

तो नियंता जाणतोही
मम आत्मा ना ऋणी
आत्मजा मम म्हणताना
"आदिमाया" मी असेनही ॥१०॥

सोनाली - आदिमाया

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा