.....पण विषय सापडत नाही चांगला


बऱ्याच दिवसातून कविता करावी म्हणतोय पण विषय सापडत नाही चांगला |

प्रेमावर करावी म्हणतोय पण प्रेमिकेला राग यायचा म्हणून तो सोडला |

दारुडयावर करावी म्हटले तर च्यामारी तिथे तिचा बाप बेवडा निघला |

देवदासावर करावी म्हटले तर नेमका तिच्याच भावाला पोरीने सोडला |

कुत्र्यावर करावी म्हटले तर तिच्याच आईने काल अल्सेसिअन आणला |

बोक्यावर करावी म्हटले तर तिच्या मांजरीनेच काल बोका मारला |

च्यामारी विषय शोधत शोधत माझ्या डोक्याचा भेजा फ्राय बनला |

शेवटी काय करणार राव मग विडंबन हाच एक धंदा उरला |

बऱ्याच दिवसातून कविता करावी म्हणतोय पण विषय सापडत नाही चांगला |


- अशोक खेडकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा