भूचक्राची घरघर जिथें ती न ये आयकाया,
आहे ध्यानाभिध रुचिर तो कुंज त्या शांत ठायां,
त्याचे द्वारीं उपवर वधू मूर्तिनाम्नी विराजे
तीचे संगें वर परम तो भावशर्माहि साजे ! १
होती पर्युत्सुक बहुत ती शीघ्र पाणिग्रहाला,
तेथें आत्मा भ्रमत कविचा तो उपाध्याय आला;
स्फूर्तिज्वालेवरि मग तयें होमुनी जीविताला,
लग्नाला त्या शुभकर अशा लाविता तो जहाला ! २
गेलें कुंजीं त्वरित मग तें जोडपें दैवशाली
केली त्यांहीं बहुविध सुखें त्या स्थलीं प्रेम-केली;
झालीं त्यांना बहुत मधुरें बालकें दिव्य फार,
तीं जाणा हीं-सुरस कविच्या क्लृप्ति तैसे विचार ! ३
कवी - केशवसुत
कवितासंग्रह - हरपलें श्रेय
वृत्त - मंदाक्रांता
करमणूक, १६ फेब्रुवारी १८९५

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा