(दोहा)
जोर मणगटांतला पुरा
घाल घाल खर्ची;
हाण टोमणा, चळ न जरा
अचुक मार बर्ची ! १
दे टोले जोंवरी असे
तप्त लाल लोखंड;
येईल आकारास कसें
झाल्यावर ते थंड ? २
उंच घाट हा चढूनियां
जाणें अवघड फार;
परि धीर मनीं धरुनियां
न हो कधीं बेजार ! ३
यत्न निश्चयें करुनी तूं,
पाउल चढतें ठेव;
मग शिखराला पोंचुनि तूं,
दिसशिल जगासि देव ! ४
ढळूं कधींही देउं नको
हृदयाचा निर्धार;
मग भय तुजला मुळीं नको,
सिद्धि खास येणार ! ५
झटणें हें या जगण्याचें
तत्त्व मनीं तूं जाण;
म्हणून उद्यम सोडूं नको,
जोंवरि देही प्राण ! ६
कवी - केशवसुत
कवितासंग्रह - हरपलें श्रेय
- विद्यार्थीमित्र, वर्ष १, अंक ७, मार्च १८९५
जोर मणगटांतला पुरा
घाल घाल खर्ची;
हाण टोमणा, चळ न जरा
अचुक मार बर्ची ! १
दे टोले जोंवरी असे
तप्त लाल लोखंड;
येईल आकारास कसें
झाल्यावर ते थंड ? २
उंच घाट हा चढूनियां
जाणें अवघड फार;
परि धीर मनीं धरुनियां
न हो कधीं बेजार ! ३
यत्न निश्चयें करुनी तूं,
पाउल चढतें ठेव;
मग शिखराला पोंचुनि तूं,
दिसशिल जगासि देव ! ४
ढळूं कधींही देउं नको
हृदयाचा निर्धार;
मग भय तुजला मुळीं नको,
सिद्धि खास येणार ! ५
झटणें हें या जगण्याचें
तत्त्व मनीं तूं जाण;
म्हणून उद्यम सोडूं नको,
जोंवरि देही प्राण ! ६
कवी - केशवसुत
कवितासंग्रह - हरपलें श्रेय
- विद्यार्थीमित्र, वर्ष १, अंक ७, मार्च १८९५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा